UPSC Success Story : यंदाचा UPSC टॉपर आदित्य श्रीवास्तव आहे तरी कोण? जाणून घेवूया…

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम (UPSC Success Story) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव (IAS Aaditya Shrivastava) हा देशात पहिला आला आहे, तर अनिमेश प्रधानने (IAS Animesh Pradhan) दुसरे स्थान पटकावले आहे. अनन्या रेड्डी (IAS Ananya Reddy) हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पीके सिद्धार्थ राजकुमार यादव (IAS Sidhdarth Yadav) यास चौथी रँक मिळाली आहे. यावर्षी, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1016 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. सध्या युपीएससीचा टॉपर आदित्य श्रीवास्तव याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आदित्य श्रीवास्तव आहे तरी कोण? जाणून घेऊया…

कोण आहे आदित्य श्रीवास्तव? ज्याने UPSC परीक्षेत केलं आहे टॉप
युपीएससी 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव हा लखनऊचा रहिवासी आहे. लखनऊच्या आयआयएम रोडवर असलेल्या एडिलको सिटीमध्ये आदित्यचे घर आहे. प्राथमिक शिक्षण (UPSC Success Story) लखनऊमधून झाल्यानंतर आदित्यने आयआयटी कानपूरमधून (IIT Kanpur) उच्च शिक्षण घेत बी.टेक. केलं. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूरमधूनच एम.टेक. देखील पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्याने कॉर्पोरेटमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेटमधली नोकरी आदित्यला रुचत नव्हती म्हणून त्याने इथे 15 महिने काम केल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला अन् युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली.

क्रिकेटची आहे प्रचंड आवड (UPSC Success Story)
आदित्यला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. याबरोबरच त्याने युपीएससी (UPSC) करण्याचा ठाम निश्चय केला होता. सततची मेहनत, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक मानसिकता या तीन गोष्टींवर भर देत आदित्यने युपीएससी क्रॅक केली. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने त्याला घरातून चांगला पाठिंबा मिळाला. या पाठिंब्यामुळे लक्ष विचलित होऊ न देता त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आलं. आदित्यचे वडील अजय श्रीवास्तव कॅगमध्ये ऑडिटर आहेत तर आई गृहिणी आहे.

अशी मिळवली AIR 1
आदित्यने गेल्या वर्षी दुसरी परीक्षा पास केली होती. यावेळी त्याने AIR 226 रॅंक मिळवली होती. त्यानंतर त्याला आयपीएस (IPS) पद मिळालं होतं. पण आयएस होण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्याने पुन्हा युपीएससीचा फॉर्म भरला. यावेळी कमालच झाली. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला पूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आदित्यने हे यश मिळवलं आहे. आदित्यने निश्चित ध्येय गाठलं आहे. स्वत:वर विश्वास असेल तर मोठे निर्णय घेता येतात हे आदित्यच्या कहाणीतून पहायला मिळतंय.

यूपीएससी टॉपर आदित्य श्रीवास्तव सध्या (UPSC Success Story) पश्चिम बंगालमध्ये अंडर ट्रेनिंग IPS पदावर आहे. त्याचे वडील अजय श्रीवास्तव हे केंद्रीय लेखापरीक्षण विभागात AAO पदावर आहेत. तर, एक लहान बहीण नवी दिल्लीतून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे. आदित्यची आई आभा श्रीवास्तव गृहिणी आहे.

दृढ निश्चय अशक्य गोष्ट शक्य करते
क्रिकेटची आवड असलेला आदित्य त्याच्या यशाचे श्रेय मेहनतीमधील सातत्य, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिकता या गोष्टींना देतो. आदित्यने त्याच्या (UPSC Success Story) पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आदित्य श्रीवास्तवचा प्रवास त्याच्या चिकाटी आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. त्याच्या स्पष्ट आणि प्रामाणिकपणामुळे आणि परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची कथा देशभरातील युवा वर्गासाठी प्रेरणास्थान बनली आहे. समर्पण, चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने काहीही शक्य होते; असे आदित्य सांगतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com