UPSC Success Story : 8 वर्षाच्या दीर्घ मेहनतीचे फळ मिळाले; सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा UPSC तून झाला अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । प्रशांत सुरेश भोजने हा 32 वर्षीय (UPSC Success Story) तरुण. याने UPSC 2023 परीक्षेत विशेष कामगिरी केली आहे. प्रशांतची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. प्रशांतसाठी, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करणे हे नेहमीच स्वप्न होते आणि शेवटी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सर्व अडचणींना तोंड दिले. काही दिवसापूर्वी जाहीर झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 च्या अंतिम निकालात प्रशांतने संपूर्ण भारतातून 849 वा क्रमांक मिळवत ही परीक्षा पास केली आहे.

8 वर्षापासून करत होता तयारी
प्रशांतने 2015 मध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास (UPSC Success Story) सुरू केला. जेव्हा तो पहिल्यांदा परीक्षेला बसला तेव्हा त्याला अपयशाचा सामना करावा लागला. त्याला या परीक्षेत 8 वेळा अपयश आले; मात्र नवव्या प्रयत्नात तो पास झाला. त्याच्या या कामगिरीमुळे खार्तन रोड स्वीपर्स कॉलनीतील लोक आनंदाने भारावून गेले आहेत.

आई आहे सफाई कर्मचारी (UPSC Success Story)
प्रशांतची आई ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते, तर त्याचे वडील नागरी संस्थेत 4 थ्या श्रेणीचे कर्मचारी आहेत. प्रशांतने अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आहे परंतु आयएएस (IAS) अधिकारी बनण्याचे त्याचे नेहमीच स्वप्न असल्याने इतर कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास त्याला रस वाटत नव्हता. प्रशांतने सांगितले की; UPSC परीक्षा देताना त्याने 2020 मध्ये दिल्लीतील स्पर्धात्मक परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जिथे त्याला विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट तपासण्याचे काम देण्यात आले होते.

शिक्षण घेताना पैसे कमवायला केली सुरुवात
प्रशांत अभ्यास करण्याबरोबरच नोकरी करत होता. त्याचे (UPSC Success Story) पालक त्याला परीक्षा देण्याचे थांबवून घरी परत जाण्यास सांगत होते. पण त्याला विश्वास होता की तो एक दिवस आपले ध्येय साध्य करेल. प्रशांत म्हणाला, “जेव्हा मी UPSC परीक्षेला बसलो होतो, तेव्हा माझ्या पालकांनी शांतपणे त्रास सहन केला होता, पण आता त्यांच्या त्रासाची भरपाई झाली आहे.” आपला मुलगा यूपीएससी (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पाहून त्यांना खूप आनंद होत आहे; असे प्रशांतचे वडील सुरेश भोजने यांनी सांगितले.

मुलाने घेतलेला निर्णय योग्यच ठरला
प्रशांतचे वडील म्हणतात, “पूर्वी मला माझ्या मुलाने नोकरी करावी असं वाटत होतं, पण आता आम्हाला वाटते की त्याने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता.” अनेक महापालिका संस्थांमधील कामगार (UPSC Success Story) संघटनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘श्रमिक जनता संघ’चे सरचिटणीस जगदीश कैरालिया म्हणाले की, “प्रशांतची यशोगाथा परिसरातील प्रत्येक घरात साजरी झाली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कमी लेखू नये कारण त्यांच्या मुलांमध्येही प्रतिभा आहे; आणि या मुलाने ते सिद्ध करून दाखवले आहे; याचा आम्हाला सरठ अभिमान वाटतो. कॉलनीतील अबालवृध्दांसाठी प्रशांत आदर्श ठरला आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com