UPSC Success Story : कॉर्पोरेटच्या नोकरीत मन रमलं नाही म्हणून UPSC दिली; कोण आहे ही ‘लेडी सिंघम’?

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी मंझील सैनी यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून (UPSC Success Story) ओळखले जाते. IPS मंझील सैनी सध्या NSG च्या DIG आहेत. त्यांनी खासगी नोकरी सोडून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि केवळ सेल्फ स्टडी करुन पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच IPS मंझील सैनी या किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करून प्रकाशझोतात आल्या होत्या. एका रात्री धाडस दाखवत त्यांनी मेरठ आणि नोएडाच्या रुग्णालयांवर छापे टाकले होते. या धाडसी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

धडाकेबाज पोलीस अधिकारी
मंझील सैनी, एक धडाकेबाज यूपी कॅडर पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. ज्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. जेव्हा भारत सरकारने त्यांना त्यांच्या शौर्य आणि विशिष्ट सेवेबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या चर्चेत आल्या.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेट फर्ममध्ये केली नोकरी (UPSC Success Story)
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतलेल्या मंझिल सैनी (Manzil Saini) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कॉर्पोरेट फर्ममध्ये तीन वर्षं काम केलं. पण त्यांना असं वाटायचं की आपला जन्म इथे नोकरी करण्यासाठी झाला नाही. या नोकरीत त्यांचं समाधान होत नव्हतं. यासाठी त्यांनी कॉर्पोरेटची नोकरी सोडून यूपीएससीचा (UPSC) मार्ग निवडला.

सेल्फ स्टडीच्या जोरावर UPSC परिक्षेत मारली बाजी
मंझिल सैनी 2005 बॅचच्या आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. नागरी सेवा परीक्षेत त्यांनी दैदीप्यमान यश मिळवलं आहे. नोकरी सोडण्याची रिस्क घेवून त्यांनी सरकारी (UPSC Success Story) सेवेत सामील होण्याचा निर्धार केला. मेहनतीच्या जोरावर UPSC च्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे त्यांनी कोणताही कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

दोन मुलांची आई आहे मंझील सैनी
IPS बनण्यापूर्वी ऑफिसर मंझिल सैनी यांचा 2000 साली जसपाल देहल यांच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. हे दोघे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना चांगले वर्गमित्र होते. मंझील सैनी आणि जसपाल देहल यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कारकीर्दीतील उत्कृष्ठ कामगिरी
मंझिल यांनी लखनऊ आणि रामपूरच्या एसएसपी (SSP)पदाची जबाबदारी पार पाडली आहे. मंझिल यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इथल्या नागरिकांनी त्यांना स्मरणात ठेवले आहे. विशेष म्हणजे मंझील सैनी या लखनऊच्या एसएसपी पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी इटावामध्येही उत्कृष्ट काम केलं आहे. एवढेच नाही तर प्रसिद्ध अमित कुमार किडनी रॅकेट प्रकरणाच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मंझील सैनी यांच्या धडाकेबाज कारवाया
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच IPS मंझील सैनी या किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करून प्रकाशझोतात आल्या होत्या. एका रात्री धाडस दाखवत त्यांनी मेरठ आणि नोएडाच्या रुग्णालयांवर छापे टाकले होते.
जुलै 2017 मध्ये मेट्रो हार्ट अँड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. श्रीकांत गौर यांचे अपहरण करून खंडणीखोरांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दिवसाढवळ्या (UPSC Success Story) झालेल्या या अपहरणाची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यानंतर इनपुटच्या आधारे गुन्हेगारांचे लोकेशन ट्रेस केले गेले. त्या काळात मेरठमध्ये कंवर मेळा शिगेला पोहोचला होता; अशा परिस्थितीत डॉक्टर श्रीकांतला धाडसी चकमकीनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, त्याबद्दल अधिकारी प्रशांत कुमार आणि पोलीस अधिकारी मंझील सैनी यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com