UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता शेतकऱ्याची लेक झाली कलेक्टर; दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली 23 वी रॅंक

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करुनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी जोरदार बनतो. यातूनही मार्ग काढणारे उमेदवार समाजासाठी आदर्श ठरतात. असंच काही घडलंय मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या शेतकऱ्याची मुलगी तपस्या परिहार यांच्या बाबतीत. तपस्या यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासोबतच संपूर्ण भारतात 23 वा क्रमांक मिळवून टॉपर्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

UPSC Success Story of IAS Tapasya Parihar

असा होता शैक्षणिक प्रवास (UPSC Success Story)

मूळ मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील जोवा गावात 22 नोव्हेंबर 1992 रोजी तपस्या यांचा जन्म झाला. तपस्या यांनी त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर इंडियन लॉ सोसायटीच्या लॉ कॉलेज, पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले.

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर घेतला UPSC चा निर्णय

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तपस्या परिहार यांनी UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच प्रयत्नात त्या प्रिलिम परिक्षेत नापास झाल्या. पहिल्या प्रयत्नात अपयश (UPSC Success Story) आल्यानंतर तपस्या यांनी दुसऱ्या प्रयत्नात आणखी मेहनत घेण्याचे ठरवले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

UPSC Success Story of IAS Tapasya Parihar

नमूना प्रश्नपत्रिका सोडवण्यावर दिला भर

पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशानंतर न डगमगता तपस्या यांनी UPSC ची परीक्षा पुन्हा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. जास्तीत जास्त नोट्स बनवणे आणि मॉडेल प्रश्नपत्रिका सोडवणे या गोष्टींवर त्यांनी भर दिला. IAS अधिकारी होण्यासाठी कठोर (UPSC Success Story) परिश्रम सुरु होते. या दरम्यान कोणतेही कोचिंग क्लास लावण्यास त्यांनी नकार दिला आणि सेल्फ स्टडीवर जोर दिला. अखेरीस, या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2017 मध्ये त्यांनी संपूर्ण भारतातून 23 वा क्रमांक पटकावला.

UPSC Success Story of tapasya parihar

अन् शेतकऱ्याची कन्या IAS झाली (UPSC Success Story)

तपस्याचे वडील विश्वास परिहार हे शेतकरी आहेत. जेव्हा तपस्या यांनी IAS होण्याची इच्छा कुटुंबातील सदस्यांना सांगितली तेव्हा संपूर्ण कुटुंब ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यांच्या यशात कुटुंबाचे योगदान मोठे आहे. IAS अधिकारी पद सांभाळत असताना 2021 मध्ये तपस्या परिहारने IFS अधिकारी गरवीत गंगवारशी लग्न केले. तपस्या आणि गरवीत यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com