UPSC Success Story : विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी; दुसऱ्याच प्रयत्नात बनली IAS; भारतात मिळवली 6 वी रॅंक

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये (UPSC Success Story) घेतलेल्या परीक्षेमध्ये गेहना नव्या जेम्सने संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाने ती भारावून गेली आहे. हे यश मिळवताना तिने तिच्या काकांकडून प्रेरणा घेतल्याचे ती आवर्जून सांगते.

UPSC Success Story of Gahana James

गेहना केरळची रहिवासी आहे. तिचे वडील प्रोफेसर सी. के. जेम्स थॉमस कॉलेजमधून निवृत्त झाले आहेत. जपानमधील भारतीय राजदूत IFS अधिकारी सिबी जॉर्ज हे गेहनाचे काका (UPSC Success Story) आहेत. नागरी सेवेत जाण्यासाठी आपल्याला काकांकडून प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. देशात सर्वात कठीण समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना गेहनाने कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. सेल्फ स्टडीच्या जोरावरच ती ही परीक्षा पास झाली आहे.

UPSC Success Story of Gahana James

वर्तमानपत्र वाचण्याची सवय उपयोगी ठरली (UPSC Success Story)
गेहना जेम्स सांगते; “परीक्षेची तयारी करत असताना माहिती गोळा करत असताना मी जास्त करुन वर्तमानपत्र आणि इंटरनेटवर अवलंबून होते. दररोज नियमाने वर्तमानपत्र वाचण्याची सवय मला फायदेशीर ठरली. मी लहानपणापासून वर्तमानपत्र वाचत आले आहे. माझा (UPSC Success Story) पहिल्यापासूनच सेल्फ स्टडीवर विश्वास आहे. त्यामुळे मी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वतःवरील विश्वासामुळे मी UPSCची परीक्षा देताना अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे. याबरोबरच माझे काका सिबी जॉर्ज, ग्रॅज्युएशन करत असलेला माझा धाकटा भाऊ हे दोघे मला सतत प्रोत्साहन देत होते. त्यामुळे अभ्यास करताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं”

UPSC Success Story of Gahana James

परिणामांचा विचार न करता मी पुढे सरकत राहिले
गेहना सांगते; “नागरी सेवक बणण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. इतिहास या विषयात पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर मी महात्मा गांधी (UPSC Success Story) विद्यापीठातून पीएचडी केली. मी नेहमी परीक्षेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि निकालाचा विचार कधीच केला नाही. यावेळीही मी तेच केले. परिणामांचा विचार न करता मी पुढे सरकत राहिले आणि यात मी यशस्वी झाले याचा मला खूप आनंद आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com