UPSC Success Story : स्वप्न होतं IAS बनण्याचं; स्वित्झर्लंडच्या नोकरीला केला गुडबाय; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

करिअरनामा ऑनलाईन । अंबिका रैना.. जम्मू आणि काश्मीरमधील (UPSC Success Story) रहिवासी. तिने UPSC मध्ये करिअर करण्यासाठी बड्या नोकरीची ऑफर नाकारली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. तिचे वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. त्यांच्यामुळे अंबिकामध्ये शिस्त आणि दृढनिश्चयाची भावना निर्माण झाली. तिने आयुष्यात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. आज आपण अंबिका रैनाच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी इथे तिने अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे. या टिप्स निश्चितच तुम्हाला उपयुक्त ठरतील.

स्वित्झर्लंडमधील नोकरीची ऑफर नाकारली
अंबिकाचे वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. नोकरीमुळे तिच्या वडिलांची सतत बदली होत असल्याने या गोष्टीचा  तिच्या आयुषयवर खूप प्रभाव पडला, त्यामुळे तिला भारतातील विविध राज्यांमध्ये तिला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अहमदाबाद, गुजरात येथील CEPT विद्यापीठातून तिने आर्किटेक्चरमध्ये पदवी मिळवली आहे. यानंतर तिला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर तसेच झुरिच, स्वित्झर्लंडमधील कंपनीकडून इंटर्नशिपची ऑफर मिळाली होती. पण या आकर्षक संधी मिळूनही अंबिकाने यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

अंबिका सांगते.. ‘अशी करा नागरी सेवा परीक्षांची तयारी’
एका मुलाखतीत अंबिकाने तिच्या UPSC स्ट्रॅटेजीबद्दल माहिती दिली. ती सांगते; “परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नात ती पास होऊ शकली नाही तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. मी अपयशाची कारणे शोधली. त्या मागील कारणांचे विश्लेषण केले. मॉक टेस्ट पेपर्सचे महत्त्व समजून घेवून अभ्यासाच्या रणनीतीत बदल केले. माझा मॉक टेस्ट देण्यावर भर होता. कारण यामुळे उमेदवार परीक्षेच्या तयारीचे मूल्यांकन करु शकतात. परीक्षेची तयारी प्रभावीपणे करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे; मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.”

ही पुस्तके वाचा (UPSC Success Story)
एम. लक्ष्मीकांत यांचे राज्यशास्त्रासाठीचे पुस्तक, स्पेक्ट्रम बुक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​आधुनिक इतिहासाचे पुस्तक, भूगोलासाठी एनसीईआरटीची पुस्तके, पर्यावरण अभ्यासासाठी शंकर यांचे पुस्तक, आयएएस अकादमीचे पुस्तक, नितीन सिंघानिया यांचे कला आणि संस्कृतीवरील पुस्तक यासारखी विशेष पुस्तके वाचण्याचा सल्ला अंबिका देते

इंटरनेटवरील संसाधनांचा वापर करा
अंबिका म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी इंटरनेट हे तिच्यासाठी एक मौल्यवान स्त्रोत आहे. तिच्या मते येथे उपलब्ध असलेल्या ज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याचा प्रभावीपणे वापर करता आला पाहिजे. उमेदवारांनी ऑनलाइन उपलब्ध अभ्यास संसाधने फिल्टर करणे आणि वापरणे शिकले पाहिजे.

टॉपर्सचे व्हिडिओ देतील प्रेरणा
अंबिकाला तिच्या तयारीदरम्यान विविध आव्हानांचा (UPSC Success Story) सामना करावा लागला, विशेषत: तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे. तिने कला शाखेतून शिक्षण न घेतल्याने सुरुवातीला तिच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला. यावर मात करण्यासाठी तिने 100 हून अधिक UPSC टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या आणि त्यावर सखोल संशोधन करून अभ्यासाची रणनीती तयार केली. अंबिकाने UPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मागील टॉपर्सच्या उत्तर प्रतींवर देखील लक्ष केंद्रित केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com