UPSC Success Story : नोकरी, ट्युशन आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत; सामान्य दुध विक्रेत्याची मुलगी झाली IAS

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा (UPSC Success Story) म्हणजे अनुराधा पाल यांची, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करूनही UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सर्वात प्रतिष्ठित नागरी सेवेतील IAS अधिकारी पद प्राप्त केले आहे.
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील बहुतांश उमेदवारांसाठी अत्यंत कठीण परीक्षा ठरली आहे. पण असे काही उमेदवार आहेत, ज्यांचे आयुष्यच इतके कठीण झाले आहे की त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची अडचण कमी वाटते. यामुळेच असे काही उमेदवार त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि चिकाटीने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करतात. त्यापैकीच एक आहेत अनुराधा पाल.

वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे
IAS अनुराधा पाल हरिद्वारमधील एका छोट्या गावातल्या एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना लहानपणी अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांचे वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण केले (UPSC Success Story)
अनुराधा यांनी हरिद्वारच्या जवाहर नवोदय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुराधा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीत गेल्या. त्यांनी येथे येऊन जीबी पंत विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले.

नोकरी करत केली UPSCची तयारी; शिकवणीही घेतली
घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनुराधा यांनी टेक महिंद्रा येथे नोकरी केली. तेथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली कारण त्यांना नागरी सेवांमध्ये रुजू व्हायचे होते. त्यानंतर त्यांनी रुरकी येथील एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून शिकवण्यास सुरवात केली आणि यासोबत यूपीएससीची तयारीही केली. स्वतःची कोचिंग फी भरता यावी यासाठी त्या शालेय विद्यार्थ्यांना शिकवणीही देत ​​असत.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
अनुराधा यांनी नोकरी; शिकवणी हे सगळं सांभाळत असताना नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास सुरु ठेवला होता. तसं पहायला गेलं तर त्यांची तारेवरची कसरत सुरु होती. तरीही 2012 मध्ये त्यांनी (UPSC Success Story) पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी अवघड परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तिन्ही फेऱ्या त्यांनी पार केल्या. पण, त्यावेळी त्यांची संपूर्ण भारतात रँक 451 होती. त्यांना IPS पद मिळालं होतं पण यावर त्या समाधानी नव्हत्या म्हणून त्यांनी दिल्लीतील निर्वाण आयएएस अकादमीमध्ये प्रवेश घेतला, ज्यामुळे त्यांची तयारी आणखी मजबूत झाली.

दुसऱ्याच प्रयत्नात झाल्या IAS
अनुराधा यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. यावेळी परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या संपूर्ण भारतातून 62 वा क्रमांक मिळवून पास झाल्या. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे IAS अधिकारी (UPSC Success Story) पद मिळवले. सध्या त्या उत्तराखंडमध्ये बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com