कोरोनामुळे यंदाच्या UPSC, MPSC च्या परिक्षा रद्द? जाणुन घ्या सत्य

मुंबई | कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ हजारांवर गेली आहे तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार पार गेली आहे. अशात एका मराठी वृत्तवाहिनीने कोरोनामुळे यंदाच्या युपीएससी, एमपीएससी परिक्षा रद्द झाल्याची बातमी दिली. मात्र सदर बातमी फेक असल्याचा दावा प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या फेक्ट चेक विंगने केला आहे.

सध्याच्या लॉकडाउन निर्बंधामुळे, सर्व मुलाखती, परीक्षा व भरती मंडळे, ज्यात देशाच्या सर्व भागातून प्रवास करणे आवश्यक आहे अशा उमेदवारांची व मुलाखतींच्या तारखांचे पुनरावलोकन वेळोवेळी केले जाईल असं आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या कोणत्याही परिक्षा वेळापत्रकांत काहीही बदल झाल्यास तात्काळ सदर माहिती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ३ मे नंतर लाॅकडाउनची दुसरी फेज संपल्यावर आयोगाच्या परिक्षांच्या तारखांबाबत विचार करण्यात येईल असंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com