UPSC Final Result 2022 : UPSC CSE निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; इथे आहे निकालाची डायरेक्ट लिंक

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (UPSC Final Result 2022) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर करण्याबाबत आयोगाने कोणतीही तारीख किंवा वेळ जाहीर केली नसली तरी मीडिया रिपोर्टनुसार यूपीएससी सीएसई परीक्षा 2022 चा अंतिम निकाल  22 मे ते 25 मे 2023 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर आपला निकाल पाहू शकतात. दरम्यान आयोगाने 24 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत 582 उमेदवारांच्या तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखती घेतल्या आहेत.

हे पण वाचा -
1 of 61

UPSC CSE Result 2022 असा पहा (UPSC Final Result 2022)
1. सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in आणि upsconline.nic.in ला भेट द्या.
2. आता खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध यूपीएससी नागरी सेवा निकाल 2022 वर क्लिक करा.
3. UPSC निकाल 2022 ची पीडीएफ आता स्क्रीनवर (UPSC Final Result 2022) दिसेल. निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची ही यादी असेल.
4. रोल नंबर शोधण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट “Ctrl+F” वापरा. जर तुमचा रोल नंबर निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत असेल तर तुम्ही पात्र आहात.
5. आता तुम्ही तुमच्या रिझल्टची प्रिंट काढून तो डाऊनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com