UPSC CSE Result 2023 : UPSC चे निकाल जाहीर!! यंदा मुलांनी मारली बाजी; आदित्य श्रीवास्तव पहिल्या तर अनिमेश प्रधान दुसऱ्या स्थानावर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) मंगळवारी (दि. 16) नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत देशभरातून 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 जणांची आयएएससाठी (IAS), तर 200 जणांची आयपीएससाठी (IPS) निवड झाली आहे.

संपूर्ण देशात आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे. तर अनिमेष प्रधानला दुसरा (AIR 2), तर अनन्या रेड्डीला तिसरा रँक (AIR 3) मिळाला आहे. UPSCची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतात. या परीक्षेद्वारे, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यांसारख्या केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 1,016 पदांवर भरती केली जाणार आहे.

कोणत्या प्रवर्गातील किती विद्यार्थी पास (UPSC CSE Result 2023)
यंदा यूपीएससीच्या परीक्षेत १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.

यंदा मुलांनी मारली बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून (UPSC CSE Result 2023) आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. २०२३मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर हे निकाल पाहता येतील.
आयएएस (IAS) अर्थात भारतीय प्रशासकीय (UPSC CSE Result 2023) सेवा, आयपीएस (IPS) अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस (IFS) अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

UPSC मध्ये पास झालेले पहिले 10 उमेदवार
१. आदित्य श्रीवास्तव
२. अनिमेश प्रधान
३. डोनुरू अनन्या रेड्डी
४. पी. के. सिद्धार्थ रामकुमार
५. रुहानी
६. सृष्टी दाबास
७. अनमोल राठोड
८. आशिष कुमार
९. नौशीन
१०. ऐश्वर्यम प्रजापती

२०२१ व २०२२ मध्ये मुलींनी मारली होती बाजी (UPSC CSE Result 2023)
२०२१मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये श्रुती शर्मानं UPSC परीक्षांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला होता, तर अंकिता अग्रवाल व जेमिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला होता. पाठोपाठ २०२२मध्ये झालेल्या परीक्षांमध्येही हीच परंपरा सुरू राहिली. इशिता किशोरनं देशात पहिला, गरिमा लोहियानं देशात दुसरा, उमा हराथीनं देशात तिसरा तर स्मृती मिश्रानं देशात चौथा क्रमांक पटकावला होता.

अशी तयार होते गुणवत्ता यादी
1. UPSC CSE गुणवत्ता यादी मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणीचे गुण एकत्र करून तयार केली जाते.
2. नागरी सेवा परीक्षेचे तीन भाग असतात – प्रिलिम्स, मुख्य आणि व्यक्तिमत्त्व चाचणी.
3. मुख्य परीक्षेत 9 निबंध प्रकारचे पेपर असतात. यातील दोन पेपर पात्रता स्वरूपाचे आहेत म्हणजे फक्त हे दोन पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (UPSC CSE Result 2023)
त्यांचे गुण गुणवत्ता यादीत जोडले जात नाहीत. पेपर 1 ते पेपर 6 आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या गुणांवरून गुणवत्ता यादी तयार केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com