करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF Recruitment 2024) भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार दि. 4 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेची तारीख आणि वेळ
UPSC CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षा 4 ऑगस्ट 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पेपर-1 सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येईल. ज्यामध्ये सामान्य क्षमता आणि बुद्धिमत्ता विषयांचे प्रश्न विचारले जातील. याशिवाय पेपर-2 दुपारी 2 ते 4 या वेळेत घेण्यात येईल. पेपर २ मध्ये सामान्य अध्ययन, निबंध आणि आकलन या विषयांचे प्रश्न येतील.
ऑनलाईन मिळवा प्रवेशपत्र (UPSC CAPF Recruitment 2024)
या भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र उपलब्ध होताच, उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन तपशील भरून ते ऑनलाइन मोडद्वारे डाउनलोड करू शकतील.
एवढ्या पदांसाठी होणार भरती
या भरतीद्वारे UPSC द्वारे एकूण 506 रिक्त पदांची नियुक्ती (UPSC CAPF Recruitment 2024) केली जाईल. यामध्ये बीएसएफमध्ये 186, सीआरपीएफमध्ये 120, सीआयएसएफमध्ये 100, आयटीबीपीमध्ये 58 आणि एसएसबीमध्ये 42 पदांची भरती केली जाणार आहे. भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com