UK Scholarship 2024 : तुम्हालाही लंडनमध्ये अभ्यास करायचाय?? तर मग अशी मिळवा 5.21 लाखाची स्कॉलरशीप

करिअरनामा ऑनलाईन । जर तुमचेही लंडनमधून (UK Scholarship 2024) शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) ने 100 भारतीय विद्यार्थ्यांना भरघोस अशी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 5000 पौंड म्हणजेच 5.21 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे. नुकतीच नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयात UCL द्वारे या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.

असं आहे स्कॉलरशीपचे स्वरुप
‘यूसीएल इंडिया एक्सलन्स स्कॉलरशिप’ या नावाने सुरु झालेल्या या शिष्यवृत्तीअंतर्गत 100 भारतीय विद्यार्थ्यांना लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 5000 पौंड (म्हणजे 5.21 लाख रुपये) आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनतर्फे देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती केवळ त्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल जे विद्यापीठाच्या पीजी (PG) अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. ही शिष्यवृत्ती 3 वर्षात दिली जाईल यापैकी पहिल्या वर्षासाठी म्हणजेच 2024-25 साठी, 33 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, तर उर्वरित 67 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुढील 2 शैक्षणिक वर्षांसाठी दिली जाईल.

‘या’ विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ (UK Scholarship 2024)
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनतर्फे देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती केवळ त्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल जे विद्यापीठाच्या पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांना मदतीची रक्कम एका वर्षात दिली जाईल, मात्र अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षांचा असेल तर ही रक्कम दोन्ही वर्षांत 50-50 टक्के दिली जाईल. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की ही शिष्यवृत्ती UCL मधील दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी वैध नाही आणि त्यांना अभ्यासासाठी लंडन कॅम्पसमध्ये जावे लागेल.

ही आहे आवश्यक पात्रता
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये असलेल्या संस्थेतून बॅचलर पदवी मिळवलेले किंवा या वर्षी अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले (UK Scholarship 2024) फक्त तेच भारतीय नागरिक विद्यार्थी CL India Excellence Scholarship साठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आणि इतर तपशीलांसाठीअधिकृत वेबसाइटला भेट द्या.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा?
ज्या विद्यार्थ्यांना UCL शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या अधिकृत वेबसाईट ucl.ac.uk वर प्रदान केलेल्या ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली असून इच्छुक विद्यार्थी दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करु शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com