Types of Job Interviews : प्रत्येक प्रकारानुसार करावी लागते वेगळी तयारी; मुलाखतींचे ‘हे’ प्रकार तुम्हाला माहित आहेत का?

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्ष शिक्षण (Types of Job Interviews) घेतल्यानंतर आता नोकरी करण्याची संधी चालून आली आहे का? अनेकजणांना स्वावलंबी बनण्याची इच्छा असते, आपण कोणावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घ्यावी असं त्यांना वाटत असतं पण कोणतीही नोकरी मिळवण्याआधी आपल्याला मुलाखतीला सामोरं जावं लागतं. या मुलाखतीमध्ये आपल्याला कामाच्या विषयी काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात. याद्वारे कंपनी तुम्ही त्या पोजिशनसाठी योग्य आहात कि नाही याचा शोध घेत असते. नोकरीसाठी मुलाखत द्यायची म्हटलं की भिती वाटणे साहजिक आहे. प्रत्यक्ष मुलाखत देताना आपल्या समोर नेमके कोणते प्रश्न येतील, आपण त्यांची उत्तरे देऊ शकू कि नाही हि चिंता अनेकांना सतावत असते. यासाठी आज आपण मुलाखत म्हणजे नेमकं काय व त्याचे कित्ती प्रकार असतात हे जाणून घेऊया…

मुलाखत म्हणजे नेमकं काय?
एखादी नोकरी देण्याआधी कंपनी कडून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. या मुलाखती अंतर्गत तुम्ही त्या नोकरीसाठी योग्य आहात की नाही ह्याचा शोध घेतला जातो. कंपनीमधील अधिकारी ही मुलाखत घेत असतात. अनेक प्रश्नांचा भडीमार करत ते तुमची चाचणी करतात. या सोबतच तुमची देहबोली कशी आहे याकडे विशेष लक्ष दिलं जातं.

हे आहेत मुलाखतीचे वेगवेगळे प्रकार
1. वन ऑन वन (One On One Interview) : कंपनीचा HR व मॅनेजर सोबत ही मुलाखत पार पडते. या मुलाखतीचा आराखडा ठरलेला असतो, एखाद्या वेळी आराखडा ठरलेला नसल्यास तुम्हाला स्वतःबद्दल माहिती देण्याची संधी मिळते.
2. पॅनल इंटरव्ह्यू (Panel Interview) : इथे एक नाही तर अनेक मंडळी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी समोर बसलेले असतात. हे लोक तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारात तुमची सर्व प्रकारे परीक्षा घेऊ पाहतात. तुही सर्व मार्गाने कंपनी साठी योग्य आहात का हे पाह्ण्याचा हा प्रयत्न असतो. यावेळी जमलेल्या सर्व मंडळींच्या नजरेला नजर द्या व तुम्ही कित्ती कॉन्फीडट आहात हे दाखवा.

3. फोन इंटरव्ह्यू (Telephonic Interview) : इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इथे समोरासमोर तुम्ही अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकू शकत नाही. फोनच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ही मुलाखत देण्यासाठी तुम्ही एक शांत जागा शोधा. एखादा प्रश्न ऐकू न आल्यास न घाबरता पुन्हा विचारा. उत्तर देण्याआधी प्रश्न समजून घेऊन आणि विचार करून आत्मविश्वासाने उत्तर द्या.
4. ग्रुप इंटरव्ह्यू (Group Interview) : एकाच वेळी अनेक लोकांची भारती करायची असल्यास ग्रूप इंटरव्ह्यू घेतला जातो. इथे अनेक जणांचा समावेश असल्यामुळे शांत राहत दुसऱ्यांच म्हणणं ऐकून घ्या. इतर माणसं कशी बोलतात हे समजून घ्या, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते पहा व नंतर तुमचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करा. योग्य मुद्दे मांडत,आपल्या म्हणण्याचे समर्थन करा.

5. जॉब फेअर किंवा करिअर मेळावा (Job or Career Fair) : इथे तुम्हाला समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्यासाठी फारच कमी वेळ मिळत असतो. इथे थोडक्यात तुमच्या विषयी बोला, तुमचे शिक्षण, पूर्वीचा अनुभव या बद्दल सांगा यामुळे काय होईल तर इतर चर्चेसाठी अधिक वेळ मिळेल.
6. बिहेविअर इंटरव्ह्यू किंवा प्रसंगाधारित मुलाखत (Behavior Interview) : इथे तुम्हाला एक परिस्थिती दिली जाते व या वर तुम्ही कसा प्रतिसाद देता यावरून तुमची पारख केली जाते.

7. केस इंटरव्ह्यू (Case Interview) : इथे तुम्हाला एखादं कोडं दिल जातं आणि तुम्ही ते कोडं कसं सोडवता यावरून तुमची परीक्षा केली जाते.
8. कॉफी-लंच इंटरव्ह्यू (Coffee-Lunch Interview) : मिड-सिनीअर लेव्हलवरील इंटरव्ह्यू अनेकदा टीमच्या लोकांसह कॉफी किंवा लंचच्या वेळी घेतले जातात. यात तुमची इतरांसोबत मिळून मिसळून काम करण्याची सवय पारखली जाते. अशा इंटरव्ह्यूमध्ये कॉफी किंवा साधं खाणं ऑर्डर करा, जेणेकरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही. टेबल मॅनर्सकडे लक्ष द्या. तोंडात घास असताना बोलू नका.

9. स्ट्रेस इंटरव्ह्यू (Stress Interview) : यामध्ये तुमच्यातील तणाव झेलण्याच्या क्षमतेची पारख केली जाते. यात मुलाखतकार तुमच्याशी अगदीच शिष्ट बोलू शकतो. वैयक्तिक () टिप्पणी करू शकतो, किंवा अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका आणि आरामात, स्पष्ट आवाजात, हसून उत्तर द्या.
10. व्हिडिओ इंटरव्ह्यू (Video Interview) : व्हिडिओ इंटरव्ह्यू लाइव्ह किंवा रेकॉर्डेड असू शकतो. जर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय नसेल तर इंटरव्ह्यूच्या आधी व्हिडिओ रेकॉर्ड करून या मुलाखतीसाठी सेव्ह करा. नंतर रेकॉर्डिंग पाहून आपले हावभाव, व्हिज्युअल इम्पॅक्ट अशा गोष्टींचा विचार करून गरज असल्यास चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. हा इंटरव्ह्यू फॉर्मल असतो, म्हणून शक्यतो या मुलाखतींसाठी तसे कपडेही घाला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com