करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी काहीशी अशीच आहे. यशाची उंची काय असते हे कोणालाच सांगता येणार नाही. पण त्याने आपल्या प्रयत्नाने यशाची उंची गाठली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये राहणारा आनंद बनसोडे या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कहाणी आज नववीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी समावेश केलेला आहे. हि सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आनंद बनसोडे यांचा जन्म सोलापूर येथे झाला. जन्मापासून त्यांच्या घरात दारिद्र्य आणि गरिबी पाठ सोडत नव्हती. वडिलांचा पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय होता.त्यावर त्यांचे घर कसेबसे चालत असे दहा बाय दहा च्या घरात राहत आनंद ने कसेबसे शालेय शिक्षण पूर्ण केले. मुळात अभ्यासात रस कमी असलेला आनंद हा नववीत नापास झाला त्या वेळी मात्र त्याच्या शिक्षकाने त्याचा अपमान केला . आईच्या डोळ्यातील अश्रू बघून त्यावेळीच त्यांनी ठरवले होते कि आयुष्यात काहीतरी मोठं करायचं. दहावीत असताना खूप मेहनत घेतली आणि त्या वर्षी ते शाळेत प्रथम आले . ११वि आणि १२ वि सायन्स घेतले आणि त्यांनी आपली पदवी बीएस्सी फिजिक्स मध्ये पूर्ण केलं. पण त्यांना जास्त या आवड ट्रेकिंग मध्ये होती. त्यानुसार त्याचे स्वप्न हे एव्हरेस्ट सर करण्याचे होते. पण मुळात गरिबी असलेल्या आनंद याना त्यासाठी येणार खर्च झेपणे शक्य नव्हतं .
लहानपनापासून पाहिलेले स्वप्न आनंद यांची पाठ सोडत नव्हते. त्यासाठी आनंद यांनी खूप ठिकाणी आपले प्रशिक्षण करण्यासाठी गाईड शोधले पण त्यांना कोणी कमी खर्चामध्ये प्रशिक्षण देईल असं कोणी भेटत नव्हतं मग पुण्यामध्ये त्यांना श्री सुरेश शेळके सर यांच्याशी भेट झाली आणि तेथून पुढे त्याच्या प्रक्षिक्षणाला सुरुवात झाली . लहानपनापासूनच कमी बोलके असलेले आनंद पुढे अनेक लोकांना मार्गदर्शक म्हणून लाभले. प्रशिक्षण झाल्यानंतर एवरेस्ट ची मोहीम आखण्यात आली पण त्यासाठी येणार २० लाख रुपये खर्च त्यांच्याकडे नव्हता अनेक नेत्यांच्या , व्यवसायिकांच्या आणि संस्थेच्या गाठीभेटी घेऊन हि त्यांना तेवढी रक्कम जमा झाली नाही उलट अपमानच सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेला सहा महिने राहून आपल्या मित्राच्या मदतीने काही पैसे गोळा केले. त्यानंतर त्यांच्या आईवडील , बहीण आणि दाजी यांनी आपले दागिने गहाण ठेवून पैसे दिले. त्यानंतर २००६ ते २०१० या काळात आनंदने हिमालयातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले सोबत शिक्षण सुरू होतेच.२०१० च्या ऑगस्ट मध्ये १९, ७७७ फूट उंचीचे टी-2 हे व्हर्जिन शिखर सर करून या शिखरावर जाणारा पहिला मानव बनण्याचा मान आनंदने मिळवला.
आनंद ने टी-२ शिखर सर केले आता आयुष्यातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखराची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी आनंद तत्पर झाला होता. हे यश आनंदला एव्हरेस्टचं स्वप्न दाखवायला आलं होतं. पण एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न इतकंही सोपं नव्हतं. नंतर त्या या काळात आनंदने कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता हे शिखर १५ ऑगस्ट २०११ रोजी सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवले. हि भारतीयांसाठी आनंदाची बाब होती. २०१२ च्या सुरवातीला आनंद भारतात आला. त्या क्षणापासून आनंदने मागे फिरून बघितले नाही. त्या नंतर त्यांनी आस्ट्रेलिया तील १० शिखरे पादांक्रात केली. ही शिखरे सर करणाऱ्या प्रथम भारतीय टीमचे नेतृत्व आनंदने केले. लिम्का बुक,इंडिया बुक,युनिक वर्ल्ड यातही आनंदने विक्रम नोंदवला आहे. तसेच जी शिखरे सर केली त्यावर त्यांनी भारतीय राष्ट्रगीत वाजवले आहे. हा आगळावेगळा विश्वविक्रम त्यांच्या नावावर कोरला गेला. त्यांना आत्तापर्यंत ६२ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. “गर्ल रायझिंग” चा एम्बसीटर म्हणून आनंदची निवड झाली आहे.आनंद आज लाखो युवकांसमोर प्रेरणादायी वक्ता म्हणून उभा राहतो.आजवर त्याची सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एकेकाळी नववीत नापास झालेले आनंद याचा पाठ आज मुलांना अभ्यासासाठी देण्यात आला आहे. आनंद म्हणतात कि, गरीबी, लाचारी,नकारात्मकता कधीही यशाआड येत नसते.यश आपल्याच हातात असतं.पण त्यासाठी हवी असते जिद्द,चिकाटी आणि मेहनत. त्याशिवाय यश खेचून आणता यात नाही. तुमचं काम इतकं मोठं असायला हवं कि आपोआप लोकांनी त्याची दखल घायला हवी. यशाचं गमक हेच आहे. ह्याच त्रिसूत्री वर जीवन जगणाऱ्या आनंदची यशोगाथा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे यात तीळमात्रही शंका नाही.
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com