करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू शकता.
मायक्रोसॉफ्ट आणि लिंकडिन यांनी 10 अव्वल नोकऱ्या शोधल्या आहेत ज्याला आज बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी नोकरी करण्यास इच्छुकांना विनामूल्य ऑनलाईन प्रशिक्षण देखील दिले आहेत.
आपल्या ब्लॉगमध्ये, लिंकडिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायन रोझलास्की यांनी म्हटले आहे की कोविड -१९ मुळे नोकरी गमावलेल्या लोकांना आम्ही मदत करू इच्छित आहोत आणि नवीन नोकरीसाठी आवश्यक असणारे स्किल्स आम्ही विनामूल्य शिकवून त्यांना पुढील नोकरी मिळविण्यात मदत करू. अशा प्रकारे रोजगार शोधणार्या लोकांना जागतिक स्तरावर एक नवीन संधी देऊन ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
या व्यावसायिक नेटवर्किंग साइटचे म्हणणे आहे की सध्या त्यांच्याकडे 69 करोड़ प्रोफेशनल्स, 5 करोड़ कंपन्या, 1.1 करोड़ जॉब लिस्ट, 36 हजार स्किल्स आणि 90 हजार शाळा या त्यांच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत, ज्याच्या मदतीने त्यांच्याकडे इन-डिमांड वाले स्किल्स, रोजगार आणि जागतिक पातळीवर या जॉब्स साठी हायरिंग पॅटर्नची पद्धत ओळखली आहे.
या आकडेवारीच्या आधारे, या महामारीच्या वेळी अशा 10 खास जॉब्सना शोधले गेलेले आहे, ज्यांना जास्त मागणी आहे आणि पुढील 4 वर्षांमध्ये त्यांची डिमांड वाढतच राहील, तर या जॉब्ससाठी आवश्यक असलेल्या स्किल्स आपण ऑनलाईनही शिकू शकता. हे टॉप 10 जॉब्सचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
टॉप-10 जॉब्स ज्यांना बाजारात आहे मोठी डिमांड :
> डिजिटल मार्केटर
> आयटी सपोर्ट/हेल्प डेस्क
> ग्राफ़िक डिझायनर
> फायनान्शिअल अॅनालिस्ट
> डाटा अॅनालिस्ट
> सॉफ्टवेअर डेवेलपर
> प्रोजेक्ट मॅनेजर
> सेल्स रिप्रेजेन्टेटिव
> आयटी अॅडमिनिस्ट्रेटर
> कस्टमर सर्विस स्पेशलिस्ट
employment-oriented online serviceने या 10 जॉब्स साठी त्यांचे स्किल्स शिकण्यासाठी learning path training modules तयार केले आहेत आणि या मॉड्यूलच्या शेवटी जॉब करण्यास इच्छुकांना कम्प्लीशन सर्टिफिकेटही दिले जाईल.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com