TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  एकीकडे अनेक IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं असताना टाटा कंपनीकडून नवीन भरती सुरु झाली आहे.

हल्लीच टाटा कंपनीकडून (TCS) 40,000 नवीन नोकऱ्यांची भरती सुरु झाली आहे. कंपनीचे CEO एन. गणपती सुब्रामाण्याम यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं कि कंपनी यंदा नवीन नोकरदारांच्या शोधात आहे व कंपनी 35,000 ते 40,000 नवीन लोकांना संधी देऊ पाहत आहे. गेल्यावर्षी देखील टाटा कंपनीने 50,000 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जगभरातून कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला हटवत असताना टाटाने दिलेली हि माहिती अनेकांना सुखावणारी आहे.

दरम्यान, सोमवारच्या शेअर बाजारात कंपनीच्या (TCS Careers) शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. कामकाजाच्या वेळी टाटाचे शेअर्स 3541 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचा Contract Volume जरी स्थिर वाटत नसला तरीही त्यांची महसूल वाढ उत्तम आहे. TCS चा ब्रिटनमधील व्यवसाय देखील जोमाने सुरु आहे. मागच्या दोन तीन वर्षात कंपनीने जवळपास 2लाख तरुणांना नोकरी दिली होती, मात्र काही कर्मचारी अजूनही कार्यालयात आलेले नाहीत असे CEO सुब्रामाण्याम यांचे म्हणणे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com