Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत.

कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली की ती त्यांच्या IJmuiden प्लांटमधील अंदाजे 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बाजारातील स्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी या कपातीमागे बरीच कारणे आहेत. कंपनीने सांगितले की, स्वत: ला पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ कंपनीत रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली असून येत्या काही दिवसांत आणखी गुंतवणूक केली जाणार आहे.

कंपनी आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. त्याचा परिणाम व्यवस्थापकीय आणि सपोर्ट स्टाफवर जास्त होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी, स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन करण्याचा विचार करत आहे, त्यामुळे कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलच्या डच युनिटच्या पुनर्रचनेचा परिणाम व्यवस्थापक स्तरावर आणि इतर कर्मचाऱ्यांवर होईल. डच स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन पद्धतींकडे वाटचाल करत असल्याने बाजारपेठेतील आपले स्पर्धात्मक आव्हान राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नवीन योजनेअंतर्गत, टाटा स्टीलने म्हटले की, 2030 पर्यंत कंपनी कोळसा आणि लोह धातूवर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या ओव्हनसह घेईल. आजच्या व्यवहारात टाटा स्टीलचा समभाग 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी बाजार बंद राहणार आहे, त्यामुळे या बातमीवर शेअरमध्ये काय प्रतिक्रिया उमटतील हे बुधवारीच पाहायला मिळेल.
नेदरलँड्समधील एकूण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात (Tata Layoff) टाटांच्या पोलाद कारखान्यांचा वाटा 7 टक्के आहे, ज्यामुळे ते नेदरलँड्समधील सर्वात मोठे प्रदूषक बनले आहे. अशा परिस्थितीत डच सरकारच्या सहकार्याने पोलाद निर्मितीसाठी हरित मार्गाकडे वळण्याची तयारी कंपनीने केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. टाटा यांनी आपल्या योजनेत 2030 पर्यंत कोळसा आणि लोखंडावर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणार्‍या ओव्हनने घेतली असल्याचे सांगितले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com