Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.

असं असेल परीक्षेचं स्वरुप –
महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
TCS घेणार परीक्षा – (Talathi Bharti 2023)
परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
एकाच जिल्ह्यातून भरता येणार अर्ज –
अर्ज करण्यासाठी मुदत वाढली असली तरी या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील.
TalathiBharti Last Date Extend

पदाचे नाव – तलाठी
एकूण पदे – 4644 पदे (Talathi Bharti 2023)

विभाग महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग
Name Posts (पदाचे नाव) तलाठी
Number of Posts (एकूण पदे) ४६४४ पदे
Age Limit (वय मर्यादा) १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
शैक्षणिक पात्रता पदवीधर . (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
अर्ज शुल्क खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता _______
Date of Interview (थेट मुलाखत) ________
शेवटची तारीख 25 जुलै 2023

जिल्हयानुसार रिक्त पदांचा तपशील – (Talathi Bharti 2023)

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर 250 Posts नागपूर 177 Posts
अकोला 41 Posts नांदेड 119 Posts
अमरावती 56 Posts नंदुरबार 54 Posts
औरंगाबाद 161 Posts नाशिक 268 Posts
बीड 187 Posts उस्मानाबाद 110 Posts
भंडारा 67 Posts परभणी 105 Posts
बुलढाणा 49 Posts पुणे 383 Posts
चंद्रपूर 167 Posts रायगड 241 Posts
धुळे 205 Posts रत्नागिरी 185 Posts
गडचिरोली 158 Posts सांगली 98 Posts
गोंदिया 60 Posts सातारा 153 Posts
हिंगोली 76 Posts सिंधुदुर्ग 143 Posts
जालना 118 Posts सोलापूर 197 Posts
जळगाव 208 Posts ठाणे 65 Posts
कोल्हापूर 56 Posts वर्धा 78 Posts
लातूर 63 Posts वाशिम 19 Posts
मुंबई उपनगर 43 Posts यवतमाळ 123 Posts
मुंबई शहर 19 Posts पालघर 142 Posts

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com