Success Story : अवघ्या 21 व्या वर्षी अमेरिका गाठली; आधी केलं वेटरचं काम; आता सांभाळते 2 लाख कोटींची कंपनी

करिअरनामा ऑनलाईन । यामिनी रंगन यांचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील (Success Story) प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेत 25.66 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या कंपनीची प्रमुख आहे. त्या HubSpot या विकसक आणि सॉफ्टवेअर फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अमेरिकेत पोहोचलेल्या यामिनीने यशाचा हा प्रवास कसा ठरवला ते जाणून घेऊया.

फुटबॉल स्टेडियमवर केलं वेटरचं काम (Success Story)
वयाच्या 21 व्या वर्षी यामिनी तिची मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भारतातील एका छोट्या गावातून अमेरिकेला गेली. तिने आज जे यश मिळवलं आहे त्याचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. यामिनी रंगनला करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप अडथळे पार करावे लागले आहेत. एक महिना अमेरिकेत राहिल्यानंतर यामिनीच्या पाकिटात फक्त $150 उरले होते.  आता तिला कोणत्याही परिस्थितीत काम मिळवण्याची गरज होती.
यामिनीने तिची पहिली नोकरी अटलांटामधील फुटबॉल स्टेडियममध्ये केली, जिथे तिने एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम केले. यामिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना नेहमीच स्वतंत्रपणे राहायचे होते आणि आपल्या घरी परत जायचे नव्हते किंवा पालकांकडून पैशाची मदतही घ्यायची नव्हती.

उच्च शिक्षण अन् 1 वर्षातच मिळालं प्रमोशन 
यामिनी रंगन हिने भारथियार युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथून (Success Story) कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी बर्कले येथून एमबीए केले. त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, त्यांनी SAP, Lucent, Workday आणि Dropbox सारख्या IT कंपन्यांसाबत काम केले. 2020 मध्ये, त्या HubSpot मध्ये मुख्य ग्राहक कार्यकारी म्हणून रुजू झाल्या. एका वर्षाच्या आत तिला 2021 मध्ये CEO पदावर पदोन्नती मिळाली आणि यामिनी रंगन जगातील यशस्वी महिला CEO च्या यादीत सामील झाल्या. त्यांनी 2019 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील व्यवसायातील सर्वात प्रभावशाली महिला यासारखे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. यामिनी रंगन हे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेमध्ये 25.66 अब्ज डॉलर म्हणजेच 2 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com