Study Tips for Competitive Exams : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय? तुमचं लक्ष विचलित होवू नये यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी परीक्षा देवून (Study Tips for Competitive Exams) अधिकारी होण्याचं अनेक तरुणांचं ध्येय असतं. UPSC, MPSC प्रमाणे दरवर्षी अनेक सरकारी परीक्षा भारतात होतात. यामध्ये पास होवून लाईफ सेट करण्यासाठी अनेकजण जिवाचं रान करतात. सरकारी परीक्षा तशा अवघडच. या परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासात सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं.   कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष विचलित होणे सामान्य गोष्ट आहे. अनेक वेळा विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्यामुळे खूप अस्वस्थ होतात. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणताही अभ्यास परिणामकारक व्हावा यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियाचा वापर टाळा
सध्याच्या काळात स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे निश्चितच अभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच तुम्ही तुमचा फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. यासाठी काही Apps आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही सोशल मिडियाच्या वापरावर मर्यादा घालू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ सत्कारणी लागेल आणि अभ्यासापासून तुमचे लक्ष विचलित होणार नाही.

अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा (Study Tips for Competitive Exams)
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाचे अचूक वेळापत्रक बनवणे फार महत्वाचे आहे. या वेळापत्रकात प्रत्येक विषय आणि त्या विषयासाठी पुरेसा वेळ द्या, जेणेकरुन अभ्यास करताना तुमची घाई होणार नाही आणि सर्व विषय आरामात पूर्ण करता येतील. लहान ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा. प्रत्येक विषयाला विभागून वेळ द्या.

विश्रांती घेणं ही महत्वाचं
अभ्यास करताना विश्रांती घेणे तितकीच महत्वाची आहे. अभ्यास करताना अधून मधून उठत राहा. यासाठी हवे तर तुम्ही  मोबाईल फोन किंवा घड्याळात अलार्म सेट करा, कारण (Study Tips for Competitive Exams) कधी कधी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने तुमचे मन इकडे तिकडे भटकते आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे गरज असेल तेव्हा ब्रेक घेत राहा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com