SSC HSC Re Exam 2023 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार 10वी/12वीची Re Exam; इथे पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या (SSC HSC Re Exam 2023) परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. दरम्यान आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीची पुरवणी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

या आहेत महत्वाच्या तारखा
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. तर उच्च (SSC HSC Re Exam 2023) माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

महाविद्यालय देणार छापील वेळापत्रक (SSC HSC Re Exam 2023)
संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी देण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून (SSC HSC Re Exam 2023) परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे मंडळाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

कधी होणार तोंडी परीक्षा?
इ. 10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (SSC HSC Re Exam 2023) मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी; असं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com