Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीसाठी ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्याची मुदत वाढली; ‘ही’ आहे शेवटची तारीख

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील काही भागात इंटरनेट (Shikshak Bharti 2023) सुविधेत येणाऱ्या अडचणींचा विचार करता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ही परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली होती. या चाचणीसाठी दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली.

ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. आता या मुदतीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत स्व-प्रमाणपत्र पूर्ण (Shikshak Bharti 2023) करणार नाहीत, ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘शिक्षण अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट देऊन २२ सप्टेंबरपर्यंत आपली कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा तपशील – (Shikshak Bharti 2023)
– नोंदणी केलेले : १,२६,४५३ उमेदवार
– अर्ज अपूर्ण असलेले : १६,२३५ उमेदवार
– अर्ज पूर्ण केलेले पण प्रमाणित नसलेले : १५,२७० उमेदवार
– प्रमाणित केलेले : ९४,९४८ उमेदवार
– प्रमाणित न केलेले : ६८४ उमेदवार
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com