BREAKING NEWS : 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । लाॅकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसह पालक अनं शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील कोविड मुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावी चे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याचे परिपत्रक आज शिक्षण विभागाने जाहीर केले. सन 2020 रोजी राज्यांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू झाला आणि राज्यात लाँकडाऊन सुरू झाले. त्यामुळे सर्व आस्थापना त्याचबरोबर शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. 15 एप्रिल 2021 रोजी दुसऱ्यांना लाँकडाऊन जाहीर झाले. मागील वर्षी शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आँनलाईन शिक्षण पध्दतीने शिक्षण प्रक्रिया चालू होती. आता कोरोनावर हळू नियंत्रण करण्यात सरकारला यश आले आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीमध्ये आँनलाईन शाळा सुरू आहेत. शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धती मध्ये दूरदर्शन, गुगल, झूम, दिशा अँप मोबाईल अशा विविध साधनांचा वापर करून शिक्षण प्रक्रिया चालू आहे. शाळा बंद असल्याने मोठया प्रमाणावर सामाजिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता ८ वी १२ चे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता देत आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत भरण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचना चे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिली आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी दोन बाकांमध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करणे संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शकतो त्याच गावी करणे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याची दक्षता घ्यावी शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना च्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केलेल्या आहेत त्यानुसार लवकरच राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू होतील यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.