सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा होणार

करिअरनामा ऑनलाईन ।क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिन यापुढे सर्व शाळांमध्ये ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांत त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी दिली.

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. सर्वच समाजातील महिलांच्या शिक्षणाची अत्यंत कष्टाने जोतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या क्रांतिकारी सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी पुढे आली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ३ जानेवारी हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RTO Bharti 2021| राज्यात 48 सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती