RTO Bharti 2021| राज्यात 48 सहायक मोटार वाहन निरीक्षकाची लवकरच भरती
करिअरनामा ऑनलाईन ।करोनामुळे परिवहन खात्यातील भरारी पथकांचा महसूल निम्म्याने घटला आहे. मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विलंबानेच का होईना पण, परिवहन खात्याने राज्यातील ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे.
MPSC Assistant Motor Vehicle Inspector Recruitment
राज्यात परिवहन खात्याच्या अखत्यारितील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन अशी (आरटीओ) ५० कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या अखत्यारित ५० ते ७५ भरारी पथके आहेत. या पथकांकडून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. टाळेबंदी काळात या पथकांची कारवाई बंद होती. त्यामुळे यावर्षी केवळ ३९ कोटी ९७ लाख २४ हजार रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल मागच्या वर्षीपेक्षा निम्म्याने कमी आहे. त्यात पुन्हा मोटार वाहन निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने भरारी पथकांना कारवाईसाठी बाहेर पडता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ४८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीही बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने सहा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदावर पदोन्नती देण्याचा प्रस्तावही सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे. त्यामुळे हे सहा अधिकारीही लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com
BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com