Ratan Tata : रतन टाटांनीही नोकरीसाठी लिहला होता Resume; जिथे केली नोकरी त्याच कंपनीचे झाले President

करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती रतन नवल टाटा कोणाला (Ratan Tata) माहित नाहीत? त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून उत्तुंग कामगिरी केली आहे आणि अजूनही ते त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख आहेत. रतन टाटा यांना 2008 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार,पद्म विभूषण, आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतंच त्यांना महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देवून गौरवलं आहे. आता सोशल मीडियावर एक कथा समोर आली आहे आणि ती इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांना माहीत नाही पण 1960 च्या दशकात, रतन टाटा कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक होण्यास तयार होते. मात्र त्यांच्या आजीची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले होते.

जेव्हा ते भारतात परतले तेव्हा त्यांना IBM कडून नोकरीची ऑफर मिळाली. भारतात परत आल्यानंतर रतन टाटा यांनी IBM मध्ये नोकरी सुरू केली पण त्यांचे गुरू जेआरडी टाटा त्यांच्या (Ratan Tata) या निर्णयावर खुष नव्हते. जुन्या आठवणींना उलगडा देताना रतन टाटांनी सांगितले; “त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि म्हणाले की तू इथे भारतात IBM साठी काम करू शकत नाहीस.” . तसेच टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांना त्यांचा Resume जेआरडी टाटा यांच्यासोबत शेअर करावा लागला आणि त्यांनी तो अतिशय आकर्षक पद्धतीने बनवला.

अशा प्रकारे त्यांनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळवली (Ratan Tata)
टाटा समूहात नोकरी करण्यासाठी रतन टाटा यांनाही JRD टाटांना Resume पाठवावा लागला होता. टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी रतन टाटा यांनी आयबीएम ऑफिसमधील एका इलेक्ट्रिक टाइपरायटरवर त्यांचा Resume तयार केला. रतन टाता सांगतात; “मी IBM ऑफिसमध्ये होतो आणि मला आठवते की त्यांनी (JRD टाटा) मला Resume मागितला, जो माझ्याकडे नव्हता. त्यावेळी ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटर होता म्हणून मी एका संध्याकाळी बसलो आणि त्यांच्या टाइपरायटरवर CV टाईप केला आणि तो जेआरडी टाटा यांना दिला.”

आणि अशा प्रकारे टाटा यांना १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. वर्षाच्या उत्तरार्धात त्यांनी टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह (टाटा मोटर्स) कंपनीच्या जमशेदपूर प्लांटमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेतले. तर 1963 मध्ये ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनी किंवा टिस्को (आता टाटा स्टील) मध्ये जमशेदपूर येथे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले.

टाटा समूहात रतन टाटांचा प्रवास कसा होता
रतन टाटा यांनी 1969 मध्ये ऑस्ट्रेलियात टाटा समूहाचे निवासी प्रतिनिधी म्हणून काम केल्यावर 1970 मध्ये ते भारतात परतले आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. पुढच्या (Ratan Tata) वर्षी त्यांना नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक-प्रभारी (नेल्को) म्हणून नियुक्त करण्यात आले. तर 1974 मध्ये रतन टाटा यांना टाटा सन्सच्या बोर्डात संचालक म्हणून सामील करण्यात आले. IBM ची नोकरी सोडल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर रतन टाटांनी 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com