Railway Staff Nurse Recruitment : कसं व्हायचं रेल्वेमध्ये ‘स्टाफ नर्स’? जाणून घ्या पात्रता; परीक्षा, निवड प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेतील नोकरी ही उत्तम आणि सुरक्षित (Railway Staff Nurse Recruitment) नोकरी समजली जाते. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्राशी संबंधित असाल आणि चांगली सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये चांगले करिअर करू शकता. जर रेल्वेत तुम्हाला ‘स्टाफ नर्स’ या पदावर नोकरी मिळाली तर तुम्हाला सर्व सरकारी सुविधा आणि उत्तम पगार मिळेल; याची हमी आहे.
येत्या काळात रेल्वेमधील स्टाफ नर्ससाठी लवकरच अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर तुम्ही RRB स्टाफ नर्स भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला या नोकरीत सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी आवश्यक पात्रता निकषांशी संबंधित सर्व माहिती आज आम्ही येथे देत आहोत.

RRB स्टाफ नर्ससाठी आवश्यक पात्रता (Railway Staff Nurse Recruitment)
उमेडवरणे मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये ३ वर्षांचा कोर्स केला असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ही शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये स्टाफ नर्सच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता.

आवश्यक वय मर्यादा
रेल्वेमध्ये स्टाफ नर्स म्हणून नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज फी
रेल्वे नर्सिंग स्टाफ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. OBC, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक (Railway Staff Nurse Recruitment) उमेदवारांना अर्ज फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील. अर्ज केल्यानंतर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपयांचा परतावाही मिळेल.

परीक्षेचा नमुना
-भारतीय रेल्वे अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी लेखी परीक्षा RRB द्वारे संगणक चाचणी मोडमध्ये घेतली जाईल.
-यामध्ये व्यावसायिक क्षमता, सामान्य क्षमता, सामान्य अंकगणित, सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क यातून एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
-परीक्षेत मायनस मार्किंगही केले जाईल.
-प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील.

अशी असते निवड प्रक्रिया
-स्टाफ नर्स पदासाठी निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश होतो.
-पहिली म्हणजे संगणक (Railway Staff Nurse Recruitment) आधारित चाचणी आणि दुसरी कागदपत्रांची पडताळणी.
-CBT क्लिअर करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
-कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com