करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने (Police Bharti 2024) सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
जालन्यात पोलिस भरती मैदानी चाचणी सुरू आहे. यामधून 102 पोलीस शिपाई आणि 23 पोलीस चालक अशा एकूण 125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या या भरतीची मैदानी (Police Bharti 2024) चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. याच भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोमवार पेठेतला रहिवासी अविनाश अशोक माने हा तरुण आला होता. त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, प्रमाणपत्र प्रदान केल्याची तारीख 20 जून 2024 अशी होती. मात्र त्याने शहरातील आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाकडून सांगणकावरून 15 एप्रिल 2024 अशी बनावट कागदपत्र तयार केली. हा प्रकार उघडकीस येताच या तरुणावर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे.
एका चुकीसाठी थेट जेलची हवा (Police Bharti 2024)
उमेदवार अविनाश माने आणि आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाविरोधात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी पोलीस भरतीसाठी आलेल्या या तरुणाला एका चुकीमुळे आता थेट जेलची हवा खावी लागलीये.
दरम्यान, जालन्यात 125 पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी (Police Bharti 2024) दिनांक 19 जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. यंदा 102 पोलीस शिपाई पदांसाठी 4,071 आणि 23 पोलीस शिपाई चालक पदांसाठी 2,907 असे एकूण 6 हजार 978 अर्ज आले आहेत. त्या अनुषंगानं ही परीक्षा घेण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com