Police Bharti 2024 : राज्यात सप्टेंबरपर्यंत 7 हजार पोलिसांची भरती पूर्ण होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 2023 मध्ये रिक्त असलेल्या तब्बल 17,471 पदांच्या (Police Bharti 2024) पोलीस भरतीची प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरू आहे. 1 सप्टेंबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती होईल. अशी माहिती देखील गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत जवळपास 2 वेळा ही पोलीस भरती झाली आहे. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी त्याचप्रमाणे शहरांचा विस्तार तसेच वाढलेली लोकसंख्या तसेच पोलिस बळाची गरज लक्षात घेता, गृह विभागाने हा एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील अडीच ते तीन वर्षात जवळपास 30 हजार पोलिसांची भरती झाली असून राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आली आहे. जे नवीन पोलीस शिपाई आहे त्यांचे प्रशिक्षण सप्टेंबर पर्यंत संपणार आहे.

त्याआधी आता 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची पोलीस भरती (Police Bharti 2024) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहेत. ही भरती तब्बल 14,471 पदांसाठी होणार आहे. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यात बँडची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. आता उर्वरित जिल्ह्यामधील पावसाची स्थिती पाहता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शहरांचा वाढता विस्तार, समाजात वाढलेली गुन्हेगारी, लोकसंख्येच्या बरोबर वाढणारी वाहनांची संख्या, वाढणारे अपघात या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस बळ कमी पडत आहे. त्यामुळे आता राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये यावर्षी पोलीस भरती चालू झालेली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com