करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरती संदर्भात महत्वाची (Police Bharti 2024) आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस दलात तरुणांसाठी भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलिस भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. या माध्यमातून तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना आता पुन्हा पोलिस दलात भरती होण्याची दुसरी संधी मिळणार आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडे 7 हजार तर मुंबईसाठी 1200 पोलिसांची पदे भरली जाणार आहेत.
राज्य सरकारने २०२२ मध्ये पोलिस भरतीची घोषणा केल्यानंतर २०२३ मध्ये राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबावण्यात आली. आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती होणार असून (Police Bharti 2024) या भरती प्रक्रियेतून साडे 7 हजार पदे भरली जाणार आहेत. तर मुंबई पोलिस दलासाठी 1200 पदे भरली जाणार आहेत. कोरोना काळात राज्यात पोलिस भरती रखडली होती. अनेकजण निवृत झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली होती. पोलिस विभागात मनुष्यबळ कमी झाल्याने २ वर्षात राज्यात १८ हजार व १७ हजार पदांची मोठी पोलीस भरती झाली. मात्र या भरतीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पोलिस प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार (Police Bharti 2024)
सध्या राज्यात २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही भरती पूर्ण झाल्यावर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या सोबतच राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्राची देखील क्षमता वाढवली जाणार आहे; अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली आहे.
मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार
मुंबईत पोलिस भरतीच्या मध्यमातून 1200 पदे भरली जाणार आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांची क्षमता वाढणार आहे. गेल्या वर्षी 8 हजार पदांची भरती राबावण्यात आली होती. यातील काही जणांचे प्रशिक्षण होऊन सप्टेंबरमध्ये ते मुंबई पोलिस दलात रुजू होणार आहेत. मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी पोलिसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी 2 हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत.
महिला पोलीस भरतीसाठी तब्बल पावणे तीन लाख अर्ज दाखल
महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी राज्यातून (Police Bharti 2024) तब्बल पावणे तीन लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबई विभागाला सर्वाधिक पसंती असून एक लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com