Police Bharti 2024 : 17 हजार पदांच्या बहुप्रतिक्षीत पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरु

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यात 17 हजार (Police Bharti 2024) पोलिस शिपाई पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवक वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर सरकारने बहुप्रतीक्षित पोलिस भरती जाहीर केली असून राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आज मंगळवार (दि. 5) पासून सुरू होत आहे.

या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरती संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणीच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन (Police Bharti 2024) देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील – (Police Bharti 2024)

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल पदावर भरती
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल (Police Bharti 2024) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल.

उमेदवारांना या प्रक्रियेतून जावे लागणार
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी (Police Bharti 2024) घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com