Home Blog Page 99

Job Alert : डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू; लगेच करा Apply

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे. जाणून घ्या भरतीचा तपशील…

संस्था – डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद –
1. प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. सहायक प्राध्यापक
4. शिक्षक (Job Alert)
5. ग्रंथपाल
6. प्रयोगशाळा सहाय्यक
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
10 दिवस
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्राध्यापक01
सहयोगी प्राध्यापक02
सहायक प्राध्यापक15
शिक्षक03
ग्रंथपाल01
प्रयोगशाळा सहाय्यक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMaster Degree & M.Ed./ M.Α. Education with 55% & SET/NET, Ph.D.in Education, 10yrs.experience
सहयोगी प्राध्यापकMaster Degree & M.Ed./ M.Α. Education with 55% & SET/NET, Ph.D.in Education, approved exp. in B.Ed.5yrs. & 3 yrs. in M.Ed
सहायक प्राध्यापकM.A/M.Com/M.Sc./M.C.S. & M.Ed./M.A.Education with 55% & SET/NET/Ph.D. in Education (Job Alert)
शिक्षकM.P.Ed., M.A.in Music, M.F.A
ग्रंथपालB.Lib OR M.Lib., SET/NET
प्रयोगशाळा सहाय्यकΒ.C.A., Β.C.S. with 55%

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित (Job Alert) पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस आहे.
5. मुदेतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dpu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘इथे’ होतेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती; थेट द्या मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकूण 363 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती सुरू झाल्या असून 19 मे 2024 पर्यंत मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे.

संस्था – ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर
भरले जाणारे पद – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
पद संख्या – 363 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याचा कालावधी – 13 मे ते 19 मे 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
मुलाखतीचा पत्ता – आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, शिर्डी- कोपरगाव रोड, मु.पो. कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर ४२३६०१

निवड प्रक्रिया – (Job Alert)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. मुलाखतीची तारीख 13 ते 19 मे 2024 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://atmamalikonline.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FSEZ Recruitment 2024 : फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू

FSEZ Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत विविध (FSEZ Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक विकास आयुक्त, लघुलेखक श्रेणी II, लघुलेखक श्रेणी III पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

संस्था – फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र
भरले जाणारे पद –
1. सहायक विकास आयुक्त
2. लघुलेखक श्रेणी II
3. लघुलेखक श्रेणी III
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (FSEZ Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविकास आयुक्त (प्रशासन), फाल्टा विशेष आर्थिक क्षेत्र, दुसरा एमएसओ बिल्डिंग (चौथा मजला), २३४/४ एजेसी बोस रोड, कोलकाता-७००००२०
पद संख्या – 09 पदे
वय मर्यादा – 56 वर्ष

भरतीचा तपशील – (FSEZ Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहायक विकास आयुक्त07
लघुलेखक श्रेणी II01
लघुलेखक श्रेणी III01

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहायक विकास आयुक्तPay Rs.44900- Level-7 Rs.142400/-
लघुलेखक श्रेणी IIPay Level-6; Rs.35400- Rs.112400/-
लघुलेखक श्रेणी IIIPay Level-4; Rs.25500- Rs.81100/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर (FSEZ Recruitment 2024) सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://fsez.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक फी आणि परीक्षा फी साठी अर्ज करा; समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

Education

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची (Education) बातमी आहे. सातारा जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे अशा कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जून, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत; असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहू नये, म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेले (Education) अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत. संबंधीत महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी; असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी म्हटले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत (Education) जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करावेत. पात्र एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची सर्व महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही नितीन उबाळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : नोकरीचा राजीनामा देवून UPSC कडे मोर्चा वळवला; तिसऱ्या प्रयत्नात नेहा भोसले झाली IAS

UPSC Success Story of IAS Neha Bhosle

करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी, अनेक उमेदवार अनेक अडथळे (UPSC Success Story) आणि आव्हानांना न जुमानता UPSC नागरी सेवा परीक्षा पास करतात. UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आमच्याकडे अनेक उमेदवारांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चाकोरी बाहेर जावून अभ्यास करून IAS/IPS परीक्षा पास केली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे नेहा भोसलेची (IAS Neha Bhosle), जिने UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नेहा तिच्या कर्तृत्वामुळे आणि ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत यशस्वी होण्याच्या तिच्या अतूट इच्छेमुळे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

कोण आहे नेहा भोसले? (UPSC Success Story)
नेहा भोसलेचा जन्म मुंबईचा आणि तिचे शिक्षणही मुंबईतच झाले. ती पहिल्या पासूनच अभ्यासात हुशार होती. तिने विज्ञान शाखेतून 11वी आणि 12वी पास केली आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
CAT परीक्षेत मिळवले 99 टक्के
अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर नेहाने सामायिक प्रवेश परीक्षेत (CAT) 99.36 टक्के गुण मिळविले आणि एमबीए (MBA) करण्यासाठी तिने प्रतिष्ठित IIM लखनौ या संस्थेत प्रवेश मिळवला. नेहाने एमबीएनंतर भारतीय कॉर्पोरेशनमध्ये तीन वर्षे काम केले.

UPSC करताना अपयशाकडून यशाकडे वाटचाल
नोकरीच्या काळातच नेहाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कॉर्पोरेशनमध्ये ती पूर्णवेळ नोकरी करत होती. नोकरी करत असताना 2017 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ती आयएएस (IAS) परीक्षा पास होऊ शकली नाही. पण न खचता तिने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्धार केला.

नोकरीचा राजीनामा देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित केले (UPSC Success Story)
2017 मध्ये परीक्षेत अपयश आल्यानंतर नेहाने पुन्हा कंबर कसली. यावेळी तिने नोकरीचा राजीनामा देण्याचं ठरवलं आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये नेहाने तिसऱ्या प्रयत्नात UPSC CSE मध्ये संपूर्ण भारतातून 15 वा क्रमांक मिळवला आणि ती IAS अधिकारी बनली. IAS नेहा भोसले सध्या नांदेड, महाराष्ट्रातील ITDP-किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि PO आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Opportunities in Dancing : डान्सिंग क्षेत्रात करिअर घडवून लाखोंत कमवाल!! पहा अभ्यासक्रम, करिअरच्या संधी विषयी संपूर्ण माहिती

Career Opportunities in Dancing

करिअरनामा ऑनलाईन । काळानुसार करिअरचे पर्याय (Career Opportunities in Dancing) बदलत चालले आहेत. इंजिनिअर, डॉक्टर, सरकारी अधिकारी बनण्यासोबतच इतर पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याचा तरुणांचा कल असतो. आजची पिढी आपल्या आवडीलाच प्रोफेशन बनवण्यात मागेपुढे पाहत नाही. अशीच एक आवड म्हणजे नृत्य कलेची. जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर तुम्ही यातही तुमचे भविष्य घडवू शकता. कसे ते पाहूया….

कुठलीही कला व्यक्त करण्यासाठी त्यामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. नर्तक बनणे वाटते तितके सोपे नाही. या क्षेत्रात स्वतःची ओळख तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ऑफबीट करिअर पर्यायांमध्ये नृत्या कलेला प्राधान्य दिले जाते. तुम्हाला आवड आणि इच्छा असेल तर तुम्ही तुमची आवड, तुमचा छंद यामध्ये तुमचे भविष्य बनवू शकता.

नृत्यांगना होण्यासाठी त्या व्यक्तीला नृत्याशी संबंधित A to Z माहिती असणे आवश्यक आहे. कलेच्या व्यावहारिक पैलूबरोबरच त्याच्याशी संबंधित सैद्धांतिक ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमच्यात पूर्ण आत्मविश्वास असायला हवा आणि अपयश स्वीकारण्याचे धैर्यही असायला हवे. नर्तक होण्याआधी, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. ही प्रक्रिया सोपी नसून यामध्ये सतत सराव करत रहावं लागतं.

नृत्य कलेतील अभ्यास (Career Opportunities in Dancing)
नृत्यांगना होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर प्रतिष्ठित नृत्य संस्थेत प्रवेश घेऊ शकता. नृत्य शिकण्यासाठी, तुम्ही कोणत्याही संस्थेतून नृत्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री मिळवू शकता. नृत्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्ही फिल्म इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, रिॲलिटी शो किंवा डान्स शोमध्ये डान्स ऑडिशनसाठी अर्ज करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोरिओग्राफर म्हणूनही तुमचे करिअर सुरू करू शकता.

भारतातील शीर्ष नृत्य शाळा
नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी नामांकित संस्थेतून डिप्लोमा, बॅचलर किंवा मास्टर्स पदवी घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये संशोधनही करू शकता. भारतातील शीर्ष नृत्य शाळांची यादी इथे देत आहोत;
1. संगीत नाटक अकादमी
2. बनारस हिंदू विद्यापीठ
3. भारतीय विद्या भवन (Career Opportunities in Dancing)
4. नालंदा नृत्य संशोधन केंद्र
5. भारतीय विद्या भवन
6. भारतियार पलकलाईकूडम
7. गांधर्व महाविद्यालय

करिअरच्या संधी
पारंगत नर्तक अनेक जॉब प्रोफाईलवर काम करतात; जसं की (Career Opportunities in Dancing) डान्स टीचर, कोरिओग्राफर, आर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन, योगा आणि पिलेट्स टीचर, शिक्षकांसाठी मार्केटिंग, डान्स फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर, डान्सर मेडिसिन स्पेशालिस्ट इ. या क्षेत्रात करिअर सुरू केल्यानंतर अनुभवानुसार तुमचा दर्जा आणि पगार वाढतो. एक यशस्वी नर्तकही त्याच्या स्टेज शोद्वारे लाखो रुपये कमवू शकतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नृत्याच्या कोणत्याही विशिष्ट प्रकारात नैपुण्य प्राप्त करु शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti : पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यातून सहभागी होण्याचे हमीपत्र द्या… अन्यथा प्रक्रियेतून बाहेर फेकले जाल

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घकाळ रखडलेली पोलीस भरतीची (Police Bharti) प्रक्रिया मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी काही सुचना देण्यात येत असतात त्यापैकी एक महत्वाची सूचना म्हणजे आता पोलीस भरतीतील उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याबाबत हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याने दिली आहे. उमेदवारांसाठी हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत देण्यात आली आहे.

अर्ज पडताळणीवेळी गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे की, उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अर्ज भरले आहेत, असे उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती (Police Bharti) प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून तसे हमीपत्र घेण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडत आहे.

…अन्यथा अर्ज बाद होणार (Police Bharti)
यासाठी एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. १७ मे पर्यंत हमीपत्र जमा करा, अन्यथा त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्रात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!! इथे पाठवा अर्ज

BARC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई (BARC Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्रायव्हर पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई
भरले जाणारे पद – ड्रायव्हर
पद संख्या – 50 पदे (BARC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे

असा करा अर्ज – (BARC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.barc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेस अर्ज करण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढली; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UGC NET 2024) एक महत्त्वाची अपडेट आहे. UGC NET जून सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया संपत आली असतानाच आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र असलेल्या उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत वर्षातून दोन वेळा UGC NET परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आता जून सत्रातील परीक्षा याआधी दिलेल्या वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार होती. परंतु आता या तारखेत देखील बदल झालेला आहे. आणि आता 18 जूनला ही परीक्षा होणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक, पीएचडी प्रवेश यांसारख्या विविध पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

ऑफलाईन होणार परीक्षा (UGC NET 2024)
राज्यस्तरावरील सेट परीक्षा ही नुकतीच ऑफलाइन पद्धतीने झाली आहे. परंतु आता यापुढे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर यूजीसी नेट जून सत्रातील परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने ओएमआर सीटवर घेतली जाणार आहे. एकूण 83 विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे.

या तारखेला होणार परीक्षा
बदललेल्या वेळापत्रकानुसार आता उमेदवारांना (UGC NET 2024) मंगळवार दि. 15 मे 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख ही 16 आणि 17 मे अशी असणार आहे. त्याचप्रमाणे अर्जामध्ये दुरुस्ती करायची असल्यास 18 ते 20 मे या कालावधीमध्ये आता उमेदवार दुरुस्ती करू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAI Recruitment 2024 : मुंबईमध्ये नोकरीची संधी; ‘इथे’ होतेय व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदावर भरती

IAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत (IAI Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. व्यवस्थापक
2. वरिष्ठ व्यवस्थापक
3. उपव्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे (IAI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 35 वर्षे

भरतीचा तपशील – (IAI Recruitment 2024)

पदपद संख्या 
व्यवस्थापक01
वरिष्ठ व्यवस्थापक03
उपव्यवस्थापक01

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची (IAI Recruitment 2024) शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (IAI Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.actuariesindia.org/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com