करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची (Education) बातमी आहे. सातारा जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे अशा कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दि. १५ जून, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज विहित मुदतीत भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत; असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहू नये, म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेले (Education) अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत. संबंधीत महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी; असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी म्हटले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत (Education) जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करावेत. पात्र एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही, याची सर्व महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही नितीन उबाळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com