Career Opportunities in Dancing : डान्सिंग क्षेत्रात करिअर घडवून लाखोंत कमवाल!! पहा अभ्यासक्रम, करिअरच्या संधी विषयी संपूर्ण माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । काळानुसार करिअरचे पर्याय (Career Opportunities in Dancing) बदलत चालले आहेत. इंजिनिअर, डॉक्टर, सरकारी अधिकारी बनण्यासोबतच इतर पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याचा तरुणांचा कल असतो. आजची पिढी आपल्या आवडीलाच प्रोफेशन बनवण्यात मागेपुढे पाहत नाही. अशीच एक आवड म्हणजे नृत्य कलेची. जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर तुम्ही यातही तुमचे भविष्य घडवू शकता. कसे ते पाहूया….

कुठलीही कला व्यक्त करण्यासाठी त्यामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. नर्तक बनणे वाटते तितके सोपे नाही. या क्षेत्रात स्वतःची ओळख तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ऑफबीट करिअर पर्यायांमध्ये नृत्या कलेला प्राधान्य दिले जाते. तुम्हाला आवड आणि इच्छा असेल तर तुम्ही तुमची आवड, तुमचा छंद यामध्ये तुमचे भविष्य बनवू शकता.

नृत्यांगना होण्यासाठी त्या व्यक्तीला नृत्याशी संबंधित A to Z माहिती असणे आवश्यक आहे. कलेच्या व्यावहारिक पैलूबरोबरच त्याच्याशी संबंधित सैद्धांतिक ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमच्यात पूर्ण आत्मविश्वास असायला हवा आणि अपयश स्वीकारण्याचे धैर्यही असायला हवे. नर्तक होण्याआधी, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. ही प्रक्रिया सोपी नसून यामध्ये सतत सराव करत रहावं लागतं.

नृत्य कलेतील अभ्यास (Career Opportunities in Dancing)
नृत्यांगना होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर प्रतिष्ठित नृत्य संस्थेत प्रवेश घेऊ शकता. नृत्य शिकण्यासाठी, तुम्ही कोणत्याही संस्थेतून नृत्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री मिळवू शकता. नृत्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्ही फिल्म इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, रिॲलिटी शो किंवा डान्स शोमध्ये डान्स ऑडिशनसाठी अर्ज करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोरिओग्राफर म्हणूनही तुमचे करिअर सुरू करू शकता.

भारतातील शीर्ष नृत्य शाळा
नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी नामांकित संस्थेतून डिप्लोमा, बॅचलर किंवा मास्टर्स पदवी घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये संशोधनही करू शकता. भारतातील शीर्ष नृत्य शाळांची यादी इथे देत आहोत;
1. संगीत नाटक अकादमी
2. बनारस हिंदू विद्यापीठ
3. भारतीय विद्या भवन (Career Opportunities in Dancing)
4. नालंदा नृत्य संशोधन केंद्र
5. भारतीय विद्या भवन
6. भारतियार पलकलाईकूडम
7. गांधर्व महाविद्यालय

करिअरच्या संधी
पारंगत नर्तक अनेक जॉब प्रोफाईलवर काम करतात; जसं की (Career Opportunities in Dancing) डान्स टीचर, कोरिओग्राफर, आर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन, योगा आणि पिलेट्स टीचर, शिक्षकांसाठी मार्केटिंग, डान्स फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर, डान्सर मेडिसिन स्पेशालिस्ट इ. या क्षेत्रात करिअर सुरू केल्यानंतर अनुभवानुसार तुमचा दर्जा आणि पगार वाढतो. एक यशस्वी नर्तकही त्याच्या स्टेज शोद्वारे लाखो रुपये कमवू शकतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नृत्याच्या कोणत्याही विशिष्ट प्रकारात नैपुण्य प्राप्त करु शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com