Home Blog Page 98

Job Alert : शिक्षक सहकारी बँकेत भरती सुरु; ग्रॅज्युएट करू शकतात अर्ज

Job Alert (1)

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक सहकारी बँक, नागपूर अंतर्गत रिक्त (Job Alert) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

संस्था – शिक्षक सहकारी बँक, नागपूर
भरले जाणारे पद – उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
पद संख्या – 15 पदे
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 55 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
उपमहाव्यवस्थापक05
व्यवस्थापक10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापकMinimum L.L.B. For D.G.M legal post and Graduate for D.G.M. of other department posts with minimum 50% marks
व्यवस्थापकGraduate with minimum 50% marks.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी वर (Job Alert) दिलेल्या ई-मेल आयडी वरून अर्ज करावा.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shikshakbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12th Board Exam Results 2024 : 12 वी चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार?

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल दि. 20 मे पर्यंत जाहीर होईल; असा अंदाज होता. मात्र आता 12 वीच्या निकालासाठी आणखी थोडेच दिवस वाट पहावी लागणार असून बारावीचा निकाल मंगळवार दि. 21 मे किंवा बुधवार दि. 22 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दीर्घ प्रतिक्षा लागून राहिलेल्या विद्यार्थी व पालकांच्या हाती लवकरच निकाल पडणार आहे.

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होईल; असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी व पालकांकडून सतत विचारणा होत आहे. राज्य मंडळाकडून निकाल जाहीर (12th Board Exam Results 2024) करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले जाते. आज रविवार असल्याने राज्य मंडळाला कार्यालयीन सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी दि.20 मे रोजी निकाल जाहीर होणार नाही. राज्य मंडळाच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे. तसेच अद्याप पर्यंत निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध होणार हे निश्चित आहे.

निकालाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष (12th Board Exam Results 2024)
बारावीचा निकाल येत्या 21 किंवा 22 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. पुढील दोन दिवसात निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी निकाल जाहीर होणार असेल तर राज्य मंडळाकडून सोमवारी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल. तसेच बुधवारी निकाल जाहीर होणार असेल तर मंगळवारी पत्रक प्रसिध्द होईल. त्यामुळे राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIPS Recruitment 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत ‘या’ पदांवर भरती; महिन्याचा 1,30,000 पगार

IIPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान (IIPS Recruitment 2024) संस्था, मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 27 मे 2024 निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेवूया भरती विषयी सविस्तर…

संस्था – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई (International Institute for Population Sciences)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संशोधन अधिकारी- 01 पद
पात्रता – लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी
2. वरिष्ठ संशोधन अधिकारी – 01 पद
पात्रता – एका वर्षाच्या अनुभवासह लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर / सांख्यिकी / जैव-सांख्यिकी आणि लोकसंख्या / आरोग्य सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी माता आणि बाल आरोग्यामध्ये काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव; आणि लहान क्षेत्र अंदाज संशोधन प्रकल्प.
3. कनिष्ठ गुणात्मक संशोधक – 01 पद
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
4. वरिष्ठ गुणात्मक संशोधक – 03 पद (IIPS Recruitment 2024)
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी
5. गुणात्मक सल्लागार – 01 पद
पात्रता – सार्वजनिक आरोग्य, सामाजिक विज्ञान, लोकसंख्या अभ्यास, आरोग्य प्रणाली, आरोग्य सेवा व्यवस्थापन, आरोग्य प्रशासन किंवा तत्सम विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी

पद संख्या – 07 पदे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 50,000/- रुपये ते 1,30,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार मुंबई 400 088.
मुलाखतीची तारीख – 27 मे 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (IIPS Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.iipsindia.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10 वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्ण संधी!! अधिकारी ते सुरक्षा रक्षक पदावर मोठी भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी (Job Notification) लि. चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024 आहे. जाणून घ्या रिक्त पदे आणि पात्रतेविषयी सविस्तर….

संस्था – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर
भरले जाणारे पद – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक
पद संख्या – 67 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ, राळेगाव, नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – (Job Notification)
1. नागपूर – प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
2. यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
3. चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
मुलाखतीची तारीख – 22, 27 आणि 29 मे 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी 01 पदे
विभागीय अधिकारी03 पदे
शाखा अधिकारी 12 पदे
सहायक अधिकारी 12 पदे
लिपीक24 पदे
परिचर / वाहन चालक10  पदे
सुरक्षारक्षक05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
विभागीय अधिकारीकोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक (Job Notification)
शाखा अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
सहायक अधिकारी कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.
लिपीककोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य,
परिचर / वाहन चालक10 वी. पास, वाहन चालक परवाना आवश्यक
सुरक्षारक्षक10 वी. पास

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 22, 27 आणि 29 मे 2024 या दिवशी घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.chandrapururban.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 : राज्याच्या नगर विकास विभाग अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा

Nagar Vikas Vibhag Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

संस्था – नगर विकास विभाग, मुंबई
भरली जाणारी पदे – अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट
पद संख्या – 77 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२ (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
अतिरिक्त जिल्हाधिकारी02
उपजिल्हाधिकारी04
तहसीलदार07
सह कार्यकारी अधिकारी02
नियंत्रक01
कार्यकारी अभियंता07
सहायक अभियंता15
उपअधीक्षक/भूमी अभिलेख01
कक्ष अधिकारी02
सहायक अभियंता24
लेखाधिकारी04
वृक्ष अधिकारी01
भुकरमापक01
सर्वेक्षक01
लिपिक-टंकलेखक03
पार्क अधीक्षक01
पार्क असिस्टंट01

असा करा अर्ज – (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Layoff : कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार; ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत; कारण?

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक आर्थिक मंदीचा फटका मागील काही (Layoff) वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी अचानकच नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. आता दुसरीकडे आणखी एका नामवंत IT कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा दिला आहे; त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा इशारा (Layoff)
LiveMint ने सादर केलेल्या वृत्तानुसार Cognizant च्या Work From Home करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने ऑफिसमध्ये येऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. वारंवार सूचना दिल्या जात असतानाही काही कर्मचारी अद्याप ऑफिसमध्ये येत नाहीत. त्यांच्याविरोधातच आता कंपनीनं ही कठोर भूमिका घेतली असून, त्यांना थेट नोकरीवरून काढण्याचाच इशारा दिला आहे.

कंपनीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येणं (Layoff) गरजेचं आहे. त्यांनी असं न केल्यास ही कृती कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणारी कृती मानली जाईल. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. दरम्यान कॉग्निझंटसाठी भारतातील कर्मचारीवर्ग महत्वाचा असून वार्षिक अहवालानुसार कंपनीतील 3,47,700 कर्मचाऱ्यांपैकी 2,54,000 कर्मचारी एकट्या भारतातील आहेत. थोडक्यात भारत हे कॉग्निझंटसाठी महत्त्वाचं केंद्र असून, आता कंपनीच्या या निर्णयाकडे भारतातील कर्मचारीसुद्धा गांभीर्यानं पाहत आहेत; असं चित्र आहे.

मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी तणावात
सध्या चीनमध्ये काम करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या असंख्य कर्मचाऱ्यांवर याचे परिणाम होताना दिसत असून, कंपनीकडून या सर्व कर्मचाऱ्यांना इतर देशांमध्ये स्थलांतरीत होण्याच्या सूचना (Layoff) करण्यात आल्या आहेत.
वॉशिंग्टन जर्नलच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टकडून चीनमध्ये काम करणाऱ्या जवळपास 700 ते 800 कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या असून, त्यामधील अनेक कर्मचारी चीनचे नागरिक आहेत. अशा कर्मचाऱ्यांना कंपनीनं सध्या अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड अशा देशांमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Highest Salary Jobs : ‘या’ 10 नोकऱ्या 2024 मध्ये मिळवून देवू शकतात मोठा पगार

Highest Salary Jobs

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च पगाराची (Highest Salary Jobs) नोकरी मिळवणे हे तरुणांचे सर्वात मोठे लक्ष्य असते. सध्या शिकत असलेले किंवा शिक्षण पूर्ण केलेले सगळे विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या विचारात आहेत. मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं ही प्रत्येकाची अभिलाषा असते. ज्यांना शिक्षण पूर्ण करतानाच चांगली नोकरी मिळवायची आहे; या विद्यार्थ्यांना आम्ही अशा नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला 2024 मध्ये मोठा पगार मिळवून देवू शकतात.

1. माहिती तंत्रज्ञान (Information Technology)
स्पर्धात्मक पगारांसोबतच सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा सायन्समधील लोकांना सतत मागणी असते. तंत्रज्ञान जसजसे वाढत आहे, तसतसे सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे; त्यामुळे विविध क्षेत्रात अशा लोकांची मागणी वाढत आहे.
2. फार्मास्युटिकल्स (Pharmaceuticals)
फार्मास्युटिकल रिसर्च आणि डेव्हलपमेंटसोबत, फार्मास्युटिकल विक्रीतील व्यावसायिकांनाही जास्त पगार मिळतो.
3. आरोग्य सेवा (Health Care)
वैद्यकीय सेवांच्या मागणीमुळे डॉक्टर, सर्जन, नर्स भूलतज्ज्ञ आणि फार्मासिस्ट या व्यावसायिकांना इतर व्यवसायांपेक्षा जास्त पगार मिळतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची (Highest Salary Jobs) मागणीही सातत्याने वाढताना दिसते.

4. वित्त (Finance)
गुंतवणूक बँकिंग, आर्थिक विश्लेषण आणि हेज फंड व्यवस्थापन या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना चांगला पगार मिळू शकतो. कारण हे असे क्षेत्र आहे जिथे लोकांची गरज भासेल आणि त्यांची मागणीही वाढतच जाईल.
5. डेटा साइंटिस्ट आणि एनालिटिक्स (Data Science and Analytics)
डेटा वैज्ञानिक, मशीन लर्निंग अभियंते आणि AI तज्ञांना जास्त मागणी आहे कारण कोणतीही ऑर्गनायझेशन निर्णय घेण्यासाठी डेटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.
6. ऊर्जा (Energy)
ऊर्जा क्षेत्रात पेट्रोलियम भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंता आणि ऊर्जा सल्लागार यासारख्या नोकऱ्या आकर्षक पगार मिळवून देतात. त्यामुळे इथे तुम्हाला चांगली संधी आहे.

7. अभियांत्रिकी (Engineering) (Highest Salary Jobs)
पेट्रोलियम अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यासारख्या स्पेशलायझेशनमध्ये अनेकदा उच्च कमाईची क्षमता असते.
8. कायदा (LAW)
वकील, विशेषत: कॉर्पोरेट कायदा किंवा बौद्धिक संपदा यांसारख्या विशेष क्षेत्रातील वकील चांगले पैसे कमवू शकतात.
9. व्यवस्थापन (Management)
सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह उच्च स्तरावरील अधिकारी वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये चांगले पगार मिळवू शकतात. व्यवसाय कोणताही असो, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांची गरज असते, त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना चांगली संधी मिळू शकते.
10 विमानचालन (Aviation)
वैमानिक, विशेषत: जे मोठ्या विमान कंपन्यांसाठी उड्डाण करतात, त्यांना भरीव पगार मिळू शकतो. जगभरात, देशांतर्गत उड्डाणे वेगाने वाढत आहेत आणि 2024 मध्ये जागतिक हवाई प्रवासी वाहतूक वाढण्याची जास्त अपेक्षा आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे या नोकऱ्यांना मागणी (Highest Salary Jobs) खूप जास्त आहे आणि येत्या काही वर्षांत त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. तथापि, ही यादी मर्यादित नाही आणि अशा आणखी नोकऱ्या असू शकतात ज्यामध्ये येत्या काही वर्षांत उच्च पगारासाठी वाव मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी BECIL अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी; दरमहा 60 हजार पगार

BECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टार्ट-अप फेलो, यंग प्रोफेशनल, आयटी सल्लागार पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL)
भरले जाणारे पद –
1. स्टार्ट-अप फेलो
2. यंग प्रोफेशनल
3. आयटी सल्लागार
पद संख्या – 15 पदे
वय मर्यादा – 32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2024

भरतीचा तपशील – (BECIL Recruitment 2024)

पदपद संख्या 
स्टार्ट-अप फेलो04
यंग प्रोफेशनल10
आयटी सल्लागार01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
स्टार्ट-अप फेलोBachelor Degree in Engineering/Technology from reputed University/ Institute
यंग प्रोफेशनलMaster’s Degree in any subject. (BECIL Recruitment 2024)
आयटी सल्लागारB.E / B. Tech (Information Technology/ Information science/computer Science/ Electronics with Nil experienceDiploma (Information Technology/ Information science/ computer Science/ Electronics ) or equivalent with 5+ years experience.M.E/ M. Tech (Information Technology/ Information Science/ Computer Science/ Electronics)/ MBA(IT) from recognized institutions of UGC/ AICTE/ MCA with Nil experience

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
स्टार्ट-अप फेलोRs.50,000/-
यंग प्रोफेशनलRs.60,000/
आयटी सल्लागारRs.33,000/-Rs.44,000/-

असा करा अर्ज – (BECIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसाठी मुंबईत नोकरी; मराठा मंदिर अंतर्गत नवीन पद भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । मराठा मंदिर, मुंबई, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट (Job Alert) ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

संस्था – मराठा मंदिर, मुंबई, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
भरली जाणारी पदे –
1. संचालक
2. सहयोगी प्राध्यापक
3.सहायक प्राध्यापक
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
मा. सचिव, मराठा मंदिर, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 1 मजला, बाबासाहेब गावडे चौक, डॉ. ए.बी. रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
संचालक01
सहयोगी प्राध्यापक03
सहायक प्राध्यापक08

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन(E-Mail)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mmbgims.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Rrecruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!!भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती

India Post Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी संदर्भात एक सर्वात मोठी (India Post Rrecruitment 2024) बातमी हाती आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टल सर्विस (GDS) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर्स (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (एबीपीएम), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (बीपीओ) या पदाच्या 40,000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. जाणून घेवूया सविस्तर….

आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मॅट्रिक किंवा (India Post Rrecruitment 2024) 10 वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास पूर्ण केला असावा. तसेच उमेदवाराने माध्यमिक शालेय स्तरावर त्याच्या/तिच्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा.

अशी असेल निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांचे फॉर्म सत्यापित करणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादी उमेदवारांच्या ऑनलाइन नोंदणीवर आधारित असेल आणि अंतिम निवड 10वीच्या परीक्षेतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.

वय मर्यादा (India Post Rrecruitment 2024)
भारतीय पोस्टमध्ये GDS साठी 40,000 हून अधिक नोकऱ्या रिक्त आहेत आणि ही पदे लवकरच भरली जातील. GDS पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वय मर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज फी – (India Post Rrecruitment 2024)

  1. सामान्य – रु. 150
  2. इतर मागासवर्गीय – रु. 150
  3. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग – रु. 150
  4. महिला उमेदवार – रु. 150
  5. अनुसूचित जाती – मोफत
  6. अनुसूचित जमाती – मोफत
  7. अक्षम – विनामूल्य

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com