Home Blog Page 97

Job Notification : पुण्यातील ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, पुणे (Job Notification) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. प्राचार्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.

संस्था – नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – प्राचार्य
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज पाठवण्याचा पत्ता – नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, गट नं 69-71, पुणे-सातारा रोड, तालुका- भोर, जिल्हा – पुणे, 412213
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2024

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिकृत वेबसाईट – https://www.navsahyadri.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2024 : मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी!! भाभा अणु संशोधन केंद्रात ‘या’ पदांवर भरती सुरु

BARC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे (BARC Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 आहे.

संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई
भरले जाणारे पद – डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जून 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह M.Sc. in Physics, 60% गुणांसह B.Sc. in Physics, 60% गुणांसह Integrated M.Sc. in Physics.

वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 26 वर्षे.
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट (BARC Recruitment 2024)
परीक्षा फी – 2000/- रुपये.
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BARC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Air Force Recruitment 2024 : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांवर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (Air Force Recruitment 2024) मोठी बातमी आहे. भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 304 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 30 मे 2024 आहे; तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – भारतीय हवाई दल (हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024))
भरले जाणारे पद –
1. फ्लाइंग शाखा
2. ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक)
3. ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
पद संख्या – 304 पदे (Air Force Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
वय मर्यादा – 20 ते 26 वर्षे
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 30 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024

भरतीचा तपशील – (Air Force Recruitment 2024)

पदपद संख्या 
फ्लाइंग शाखा29 पदे
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक)156 पदे
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)119 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (Air Force Recruitment 2024)
4. अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचा.
5. अर्ज प्रक्रिया 30 मे 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Air Force Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://afcat.cdac.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12th Board Exam Results 2024 : उद्या 12 वी चा निकाल; मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल दि. 21 मे (मंगळवार) रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत 12 वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या https://mahresult.nic.in/ अधिकृत वेबसाइट किंवा अन्य वेबसाइटवरून पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात, जे भरल्यानंतर निकाल पाहता येईल. या तपशीलाविषयी आणि निकाल कसा पहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेवूया…

कुठे पाहता येईल निकाल – (12th Board Exam Results 2024)
1. MSBSHSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये काही वेबसाइट्सचा उल्लेख केला आहे, ज्यावर HSC 2024 चा निकाल पाहता येईल. विद्यार्थी या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
2. विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतील.
3. इयत्ता १२ वीचा निकाल डिजिलॉकरवरदेखील उपलब्ध असेल, जो विद्यार्थी ॲपमध्ये लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
1. विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजिलॉकर आणि एसएमएस सेवेद्वारे पाहू शकतात.
2. निकाल तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ वीचे प्रवेशपत्र स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे .
3. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र HSC बोर्ड परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागते, त्यानंतरच स्क्रीनवर तुम्हाला निकाल दिसेल. (12th Board Exam Results 2024)
4. काही वेबसाइट्सवर तुम्हाला रोल नंबरसह शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतरच तुम्हाला निकाल पाहता येतो.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. https://mahresult.nic.in/

2. https://results.digilocker.gov.in
3. http://results.targetpublications.org
4. http://hscresult.mkcl.org
5. http://www.mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो –
1. https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
3. त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
4. आता तुम्हाला एका नव्या विंडोवर (12th Board Exam Results 2024) रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.
5. त्यापुढे View Result वर क्लिक करा.
6. निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.
7. पुढील वापरासाठी निकालाची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCW Recruitment 2024 : लाखाच्या घरात मिळेल पगार; राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

NCW Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत विविध (NCW Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसचिव, वरिष्ठ पीपीएस, अवर सचिव, प्रधान खाजगी सचिव, वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक, सहायक पीआरओ, विभाग अधिकारी, संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, विधी सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय महिला आयोग
भरले जाणारे पद – उपसचिव, वरिष्ठ पीपीएस, अवर सचिव, प्रधान खाजगी सचिव, वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक, सहायक पीआरओ, विभाग अधिकारी, संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, विधी सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि वैयक्तिक सहाय्यक
पद संख्या – 40 पदे
वय मर्यादा – 56 वर्षे (NCW Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक 21, जसोला संस्थात्मक क्षेत्र, नवी दिल्ली-110025

भरतीचा तपशील आणि मिळणारे वेतन – (NCW Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या (NCW Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://ncw.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Graphic Designing : 10 वी/12 वी नंतर ग्राफिक डिझायनर होवून घडवता येईल करिअर

Career in Graphic Designing

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असाल (Career in Graphic Designing) आणि ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. जर तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेऊन त्यातील गुंतागुंत जाणून घेऊ शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. सविस्तर जाणून घेवूया ग्राफिक डिझायनिंग क्षेत्राबद्दल….

विद्यार्थी असोत किंवा त्यांचे पालक, प्रत्येकालाच आपल्या मुलाने असे काहीतरी करावे, जेणेकरून त्याला लवकरात लवकर नोकरी मिळावी असं वाटत असते. तुम्हीही असा विचार करत असाल तर ग्राफिक डिझायनिंग कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम डिप्लोमा/पदवी/प्रमाणपत्र स्तरावर उपलब्ध आहे; ज्यामध्ये तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश घेऊ शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकाल.

नोकरीसाठी अनेक पर्याय उपलब्ध (Career in Graphic Designing)
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात देशातील प्रत्येक लहान-मोठा राजकीय पक्ष, छोट्या-मोठ्या कंपन्या आणि अगदी सरकारी कंपन्याही आपल्या प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझायनर्सना चांगल्या पगारावर नोकरी देवू करतात. त्यामुळे इथे तुम्हाला नोकरीसाठी चांगला वाव मिळू शकतो.

कधी सुरू करता येईल कोर्स
जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर घडवायचे असेल आणि तुम्ही नुकतीच 10 वी किंवा 12 वी परीक्षा पास केली असेल, तर तुमच्यासाठी या क्षेत्रात पूर्णवेळ अंडरग्रॅज्युएट पदवी घेणे अधिक चांगले ठरेल. याशिवाय तुम्ही या अभ्यासक्रमात डिप्लोमा देखील करु शकता.

चित्रपट आणि जाहिरातींच्या दुनियेत करू शकता काम
जर तुम्हाला या क्षेत्रात काम करता येत नसेल तर तुम्ही (Career in Graphic Designing) चित्रपटसृष्टीतही करिअर करू शकता. इथे तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला लाखात पगार मिळतो. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या जाहिरातींमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही पैसेही कमवू शकता.

किती मिळतो पगार
या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही 15 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगार घेऊन सुरुवात करू शकता. परंतु वेळ आणि अनुभवानुसार हा पगार लाखांपर्यंत पोहोचतो. यासह, आपण प्रत्येक प्रकल्पाच्या (Career in Graphic Designing) आधारावर देखील काम करू शकता. या क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणून काम करण्याबरोबरच अनुभव मिळवल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची कंपनी सुरु करून लोकांच्या प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझाईनही करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : डिलिव्हरी बॉय ते जगातील श्रीमंत बिझनेसमॅन… आईच्या आपमानाने आयुष्याची दिशाच बदलली

Career Success Story of Amancio Ortega

मजूर दाम्पत्याचा गरीब मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला ‘जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

करिअरनामा ऑनलाईन । शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक (Career Success Story) यशोगाथा आपण वाचल्या आहेत. तुमचा निश्चय दृढ असेल आणि मनगटामध्ये दहा हत्तीचे बळ असेल तर नशीबही तुमच्यापुढे झुकते हे खरं आहे. परिश्रमासमोर अत्यंत कठीण प्रसंगही नतमस्तक होतो; हे अगदी खरं आहे. असेच एक उदाहरण आहे अमानसियो ऑर्टेगा (Amancio Ortega) यांचे…. ऑर्टेगा यांचे नाव कमीच लोकांना माहिती असेल पण त्यांनी मिळवलेलं यश जगप्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया अमानसियो यांच्याबद्दल; ज्यांनी जन्मतः गरिबी पाहिली; पण मेहनतीच्या जोरावर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

कोण आहेत अमानसियो ऑर्टेगा?
स्पेनच्या लिओन या छोट्याशा गावात २८ मार्च १९३६ रोजी अमानसियो ऑर्टेगा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी म्हणून काम करत होते तर वडिलांसोबत त्यांची आई देखील मोलकरीण म्हणून राबत होती. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अमानसियो शिक्षणही पूर्ण करू शकले नाही. कुटुंबाला आपल्या (Career Success Story) हातभाराची गरज आहे; हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि ते पैसे मिळवण्यासाठी काम करू लागले. वयाच्या १३ व्या वर्षी अमानसियो फॅशन टेलरसाठी काम करू लागले जे श्रीमंत ग्राहकांचे कपडे शिवायचे. इथूनच गारमेंट फॅशनसाठी अमानसियो यांची आवड वाढत गेली.

रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागले
अमानसियो फारकाळ या शहरात राहू शकले नाहीत. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब शहर सोडून नवीन रोजगाराच्या शोधात ए कोरुना येथे पोहोचले. इथे त्यांच्या वडिलांना नोकरी मिळाली पण अमानसियो यांनी वस्त्रोद्योग सोडला नाही आणि अ कोरुना येथील स्थानिक ‘गाला’ शर्टच्या दुकानात त्यांनी नोकरी पकडली. विशेष म्हणजे पूर्वी जिथे होते त्याच ठिकाणी हे दुकान अजूनही असून इथूनच अमानसिओ यांनी इटालियन फॅशन डिझायनरकडून कपडे शिवण्याची कला शिकली. काही वर्षांनंतर ला माझा हॅबरडाशेरी येथे त्यांना विक्री सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली तर 1960 च्या दशकात अमानसियो शहरातील एका दुकानाचे ते व्यवस्थापक बनले.

आईच्या अपमान जिव्हारी लागला (Career Success Story)
लहानपणी अमानसिओ यांना आपल्या वडिलांप्रमाणे रेल्वे कामगार व्हायचं होतं. एक दिवस शाळेतून घरी परताना आईला एक दुकानदार उधारीवर माल देत नसल्याचं त्यांनी पाहिलं. त्यावेळी अमानसिओ यांना ते अपमानकारक वाटलं तिथूनच त्यांनी शाळा सोडून पैसे कमावण्यासाठी मिळेल ते काम करायचं ठरवलं. अमानसिओ यांच्या आईला उधारीवर रेशन देण्यास नकार देण्याच्या दुकानदाराचे नाव ‘गाला’ होते जिथे त्यांनी सर्वप्रथम नोकरी केली.

जगातील सर्वात मोठ्या फॅशन ब्रँडणे जन्म घेतला
अमानसियो यांनी शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने डिलिव्हरी बॉयचं काम हातात घेतलं. १९७५ मध्ये सर्वप्रथम ‘झोब्रा’ नावाने अमानसियो यांनी आपला स्वतःचा ब्रँड सुरू केला पण भविष्यात काही वाद निर्माण व्हायला नको म्हणून त्यांनी ‘झारा’ (ZARA) असं या ब्रॅंडचं नामकरण केलं. झाराने गेल्या १९ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली असून या कालावधीत कंपनीला एकदाही तोटा झाला नाही.

‘Zara’ फॅशन ब्रँडने झेप घेतली
अमानसियो वेळ मिळेल तेव्हा स्वतःच कपडे शिवायचे आणि कमी पैशात विकायचे. त्यांचे डिझाईन लोकांना आवडू लागले आणि कपड्यांचा खपही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मार्केटमध्ये मागणी (Career Success Story) वाढल्यावर बेरोजगार महिलांना सोबत घेत त्यांनी फॅशन ब्रँडचा व्यवसाय उभा केला. अमानसियो यांनी एक छोटी कंपनी सुरु केली होती आणि फक्त बुद्धी चातुर्याने त्यांनी व्यवसाय एक मोठा ब्रँड बनवला.

अन बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अमानसियो यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि 2016 मध्ये प्रथमच एक सामान्य रेल्वे कामगाराचा मुलगा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. 2016 मध्ये त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. २०२४ मध्ये त्यांची एकूण संपत्ती 10,710 कोटी यूएस डॉलर्स एवढी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

12th Board Exam Results 2024 : 12 वीचा निकाल नेमका कधी? मार्कलिस्ट कधी मिळणार? वाचा सविस्तर…

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंडळाच्या नऊ विभागीय (12th Board Exam Results 2024) मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता 12 वी ची परीक्षा घेण्यात आली होती. आता परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी 5 व्या टप्यातील मतदान सुरु आहे. आज (20 मे) सायंकाळी मतदान संपले की निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते; व उद्या (21 मे) निकाल लागू शकतो; अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडियावर अशीही चर्चा रंगली आहे की आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर केला जाईल.

12 वीचा निकाल नेमका कधी? (12th Board Exam Results 2024)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण देत बोर्डाच्या वतीने अधिसूचना सुद्धा जारी केली होती. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले होते. यानुसार अगदी २१ मे तारीख नक्की नसली तरी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यात निकाल समोर येण्याची नक्कीच शक्यता आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. hscresult.mahahsscboard.in
2. mahahsscboard.in
3. maharesult.nic.in

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –
1. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
2. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख किंवा (12th Board Exam Results 2024) आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
4. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
5. यानंतर निकालाची प्रिंट काढून घ्या.

विद्यार्थ्यांना मार्कलिस्ट कधी मिळणार?
मागीलवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण 10 दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमधून निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येईल.
ATKT परीक्षा कुणाला व कधी द्यावी लागणार?
गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये ATKT परीक्षा होतात. महाराष्ट्र बोर्डाच्या (12th Board Exam Results 2024) परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांना जे विद्यार्थी पूर्ण करत नाहीत त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने 35 टक्के गुण मिळवावे लागतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CRPF Result 2024 : CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर; 9212 पदे भरणार

CRPF Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Result 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन/पायनियर/मिन) पदाच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल PDF फॉरमॅटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये यशस्वी उमेदवारांचे तपशील दिले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा या पृष्ठावर दिलेल्या PDF च्या थेट लिंकवरून निकाल पाहू शकतात. यशस्वी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.

असा पहा निकाल –
1. सीआरपीएफ (CRPF) कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरतीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट rect.crpf.gov.in ला भेट द्या. (CRPF Result 2024)
2. यानंतर होम पेजवर निकालाशी संबंधित PDF ची लिंक दिसेल त्यावर क्लिककरून निकाल पहा.
निकालाच्या यादीत ज्या उमेदवारांची नावे नोंदवली जातील ते पुढील टप्प्यातील भरतीसाठी पात्र मानले जातील.

9212 रिक्त पदे भरली जाणार (CRPF Result 2024)
उमेदवारांशी संबंधित विविध तपशील निकाल पीडीएफमध्ये नोंदवले आहेत. यामध्ये उमेदवारांचा अर्ज क्रम क्रमांक, पोस्ट/ट्रेड, उमेदवाराचा रोल नंबर, उमेदवाराचे नाव आणि राज्य नोंदवले जाते. याभरतीद्वारे एकूण 9212 रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. यापैकी 9 हजार 105 रिक्त जागांवर पुरुष उमेदवारांची तर 107 रिक्त जागांवर महिला उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भरतीशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : कोणता प्राणी पाणी पिताच मरतो? जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? सामान्य ज्ञान वाढवणारे प्रश्न…

GK Updates 19 May.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – भारतावर हल्ला करणारा (GK Update) पहिला मुस्लिम आक्रमक कोण होता?
उत्तर – भारतावर हल्ला करणारा पहिला मुस्लिम आक्रमक मोहम्मद बिन कासिम होता.
प्रश्न 2 – श्रीलंकेचे जुने नाव काय होते?
उत्तर – श्रीलंकेचे जुने नाव सिलोन होते.

प्रश्न 3 – जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?
उत्तर – हमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे.
प्रश्न 4 – (GK Update) असा कोणता प्राणी आहे जो पाणी पिताच मरतो?
उत्तर – कांगारू उंदीर (Kangaroo Rat) हा प्राणी पाणी पिताच मरतो.

प्रश्न 5 – व्हिटॅमिनचा शोध कोणी लावला?
उत्तर – व्हिटॅमिनचा शोध कॅसिमिर फंकने लावला होता.
प्रश्न 6 – कोणत्या फळामध्ये सर्वाधिक (GK Update) फायबर असते?
उत्तर – संत्रा हे असे फळ आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त फायबर आढळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com