Home Blog Page 100

Armed Forces Tribunal Recruitment 2024 : देशसेवेची संधी!! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, उपनिबंधक, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कर्मचारी कार ड्रायव्हर, डिस्पॅच ड्रायव्हर, लायब्ररी अटेंडंट” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 (जम्मू), 15 मे 2024 (जयपूर), 31 मे 2024 (कोची) आणि 07 जून 2024 (मुंबई) आहे.

संस्था – सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal Recruitment 2024)
भरले जाणारे पद – स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, उपनिबंधक, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कर्मचारी कार ड्रायव्हर, डिस्पॅच ड्रायव्हर, लायब्ररी अटेंडंट
पद संख्या – 57 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – (Armed Forces Tribunal Recruitment 2024)
1. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, जयपूर-3020016
2. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, ब्रिस्टो हाऊस, के.जे.हर्शेल रोड, कोची-682001
3. रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, एजी बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400 006
4. सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, जम्मू येथे श्रीनगर, चार प्रमुख Qtrs P-6(1 ते 4), मिलिटरी स्टेशन सुंजवान, जम्मू-180011


अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1. 08 मे 2024 (जम्मू)
2. 15 मे 2024 (जयपूर)
3. 31 मे 2024 (कोची)
4. 07 जून 2024 (मुंबई)
निवड प्रक्रिया – मुलाखत

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास (Armed Forces Tribunal Recruitment 2024) अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2024 (जम्मू), 15 मे 2024 (जयपूर), 31 मे 2024 (कोची) आणि 07 जून 2024 (मुंबई) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF जाहिरात (जयपूर)
PDF जाहिरात (जम्मू)
PDF जाहिरात (कोची)
PDF जाहिरात (मुंबई)
अधिकृत वेबसाईट – https://aftdelhi.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IMU Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरू; अर्ज करा E-Mail

IMU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (IMU Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक, विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सहायक संचालक
2. विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)
पद संख्या – 02 पदे (IMU Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
30 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
सहायक संचालक – 40 वर्षे
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी) – 65 वर्षे

भरतीचा तपशील – (IMU Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
सहायक संचालक01
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक संचालकA Master’s Degree in Physical Education with at least 55% marks or its equivalent grade of B at seven point scale of O,A,B,C,D,E & F
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)MEO Class 1 (Motor) C.O.C

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (IMU Recruitment 2024) तारीख 30 मे 2024 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://www.imu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला

CBSE 10th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. 12 वी च्या निकालाप्रमाणे 10वीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९४.७५% लागला आहे; तर एकूण निकाल ९३.६०% असा आहे.

विभागवार निकाल – (CBSE 10th Result 2024)
CBSE 10वी मध्ये देखील त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.75 टक्के लागला. यानंतर, विजयवाडा विभागाचा निकाल 99.60%, चेन्नई विभागाचा 99.30%, बेंगळुरू विभागाचा 99.26% आणि अजमेर विभागाचा 97.10% इतका निकाल लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –
1. सर्वप्रथम CBSEची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
2. येथे CBSE 10वी निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
3. आता रोल नंबर टाका (CBSE 10th Result 2024) आणि सबमिट करा.
4. मार्कशीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5. मार्कशीटची प्रिंट काढा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Result 2024 : मोठी बातमी!! CBSEच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी; देशात 87.98% विद्यार्थी पास

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने 12 वी चा निकाल जाहीर (CBSE Result 2024) केला आहे. यंदाचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यावर्षी यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने वाढलेले दिसत आहे. यावर्षीच्या निकालामध्ये 91 टक्केहून अधिक मुली पास झालेल्या आहेत. तर मुलांच्या तुलनेत 6.4 टक्के अधिक मुली पास झालेल्या आहेत.

निकालाची आकडेवारी
CBSE इयत्ता 12वी परीक्षेसाठी यावर्षी 16,33,730 विद्यार्थ्यां नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16,21,224 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी पास झाले आहेत.
लिंगनिहाय निकाल असा आहे (CBSE Result 2024)
CBSE बोर्डाच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण 90.68 टक्के होते, त्या तुलनेत यावर्षी या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा बारावी सीबीएसई उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण 91.52 टक्के आहे. यावर्षी मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 84.67 टक्के होते. या परीक्षेत मुलांपेक्षा 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी एकंदरच चांगली कामगिरी केली आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 50 टक्के आहे, गेल्या वर्षी हे प्रमाण 60 टक्के होतं.

निकालाची लिंगनिहाय टक्केवारी
1. उत्तीर्ण मुली – 91.52%
2. उत्तीर्ण मुले – 85.12 टक्के%
3. उत्तीर्ण ट्रान्सजेंडर – 50%

1 लाख विद्यार्थ्यांना मिळाले 90 टक्क्यांहून अधिक गुण
यावर्षी परीक्षेत 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा उत्तीर्ण परीक्षार्थी (CBSE Result 2024) होण्याचे प्रमाण 87.98 टक्के आहे. गेल्या वर्षी 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती; ज्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 87.33 टक्के होती. 2022 मध्ये, एकूण 14,35,366 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.7 टक्के होती.

असा पहा निकाल –
1. CBSE इयत्ता बारावीचा निकाल तुम्ही cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.
2. प्रथम CBSE बोर्डाच्या 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर रोल नंबर, शाळा क्रमांक (CBSE Result 2024) आणि प्रवेशपत्र IDमध्ये प्रविष्ट करा.
4. सबमिट करा… आता तुम्हाला CBSE इयत्ता 12 चा निकाल दिसेल.
5. निकाल डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Legislative Council Election 2024 : पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी कशी करायची नाव नोंदणी? जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया

Legislative Council Election 2024

करिअरनामा ऑनलाईन । विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक (Legislative Council Election 2024) मतदारसंघाच्या 4 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यापार्श्वभुमीवर पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कशी करावी? त्यासाठी कोण पात्र असणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक पात्रता (Legislative Council Election 2024)
1. पदवीधर मतदार नोंदणी करणारा मतदार भारताचा नागरीक असावा.
2. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा.
3. मतदार सर्वासाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवाशी असावा.
4. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १८ भरलेला असावा.
5. पदविका (Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर पात्रता गृहीत धरण्यात येईल.

शिक्षक मतदार नोंदणीकरिता आवश्यक पात्रता
1. शिक्षक मतदार नोंदणी करणार मतदार भारताचा नागरीक असावा.
2. त्याने मतदार नोंदणीकरिता अर्हता (Legislative Council Election 2024) दिनांकाच्या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
3. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १९ भरावा.

पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे –
1. रहिवाशी पुरावा (पासपोर्ट, वाहन परवाना, टेलीफोन बील, लाईट बील याशिवाय मान्यताप्राप्त कागदपत्रांची छायांकित प्रत), 2. मार्कशीटची साक्षांकित प्रत,पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत. ओळखपत्र.
2. शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र, विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.
महत्वाची सूचना – प्रमाणपत्रांचे साक्षांकन प्रती संबंधित (Legislative Council Election 2024) जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे.

पदवीधर व शिक्षक मतदान प्रक्रिया अशी आहे –
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकित प्रती, आपल्या विधानसभा (Legislative Council Election 2024) मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोहोच घ्यावी. तसेच अद्ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर, त्यात स्वतःचे नाव असल्याची खात्री करावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HUDCO Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी मुंबईत सरकारी नोकरी!! दरमह 65 हजार पगार

HUDCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त (HUDCO Recruitment 2024) निगम प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक कार्यकारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.

संस्था – गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक कार्यकारी
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2024
वय मर्यादा – 35 वर्षे (HUDCO Recruitment 2024)
अर्ज फी – Rs.500/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक कार्यकारीPost Graduate degreeB. Arch /B.E. in Civil/ B. PlanCA/ CMALL.B
मिळणारे वेतन – दरमहा Rs.65,000/-

असा करा अर्ज – (HUDCO Recruitment 2024)
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी आणि ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2024 आहे.
5. उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://hudco.org.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेची अर्ज दुरुस्ती विन्डो सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व (NEET PG 2024) उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता यावे; यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने 10 मे पासून NEET PG 2024 साठी अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जावून NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या करू शकतात.

16 मे पर्यंत करता येईल दुरुस्ती
NEET PG अर्ज दुरुस्ती विंडो 16 मे पर्यंत खुली राहील. NEET PG 2024 परीक्षा 23 जून रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठीचे हॉल तिकिट 18 जून रोजी प्रसिद्ध केले जाईल. NEET PG 2024 चा निकाल 15 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी कोणती दुरुस्ती करु शकतात (NEET PG 2024)
विद्यार्थ्यांना NEET PG फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सर्व तपशीलांमध्ये बदल करण्याची परवानगी देण्यात आली नाही. उमेदवारांना त्यांचे नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता, राष्ट्रीयत्व आणि परीक्षा शहर प्राधान्यक्रम बदलण्याची परवानगी नाही. विद्यार्थी केवळ वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, सामाजिक वर्ग, उप-श्रेणी (PwB), फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मतारीख आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करू शकतात.

या पद्धतीने करता येईल अर्ज दुरुस्ती
1. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
2. यूजर आयडी, पासवर्ड या तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.
3. तुमचा NEET PG 2024 अर्ज उघडा.
4. आवश्यकतेनुसार अर्ज दुरुस्ती करा. (NEET PG 2024)
5. Save वर क्लिक करा आणि सबमिट करा.
6. पुढील गरजांसाठी एक प्रत डाउनलोड करा.

NEET PG ही भारतातील वैद्यकीय संस्थांमधील MD (डॉक्टर ऑफ मेडिसिन), MS (मास्टर ऑफ सर्जरी) आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. NEET पीजी अभ्यासक्रमांसाठी एकल प्रवेश परीक्षा विंडो म्हणून काम करते. इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यानुसार, एमएस, एमडी आणि पीजी डिप्लोमा (NEET PG 2024) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर कोणतीही प्रवेश परीक्षा वैध मानली जात नाही. यशस्वी उमेदवारांना सरकारी आणि खाजगी संस्थांसह 350 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवता येतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : थेट द्या मुलाखत.. जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे ‘ही’ पदे भरली जाणार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, पुणे अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपीक, वसतिगृह अधीक्षक (महिला) पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 19 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन (E-MAIL) किंवा खाली दिलेल्या पत्यावर पाठवू शकतात.

संस्था – जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहायक प्राध्यापक
2. ग्रंथपाल
3. वरिष्ठ लिपीक
4. वसतिगृह अधीक्षक (महिला)
पद संख्या – 15 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे
मुलाखतीची तारीख – 19 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
सहायक प्राध्यापक11 posts
ग्रंथपाल01 post
वरिष्ठ लिपीक02 posts
वसतिगृह अधीक्षक (महिला)01 post

निवड प्रक्रिया –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. वरील पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.
3. उमेदवारांनी आवश्यक (Job Notification) कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
5. या पदांकरीता मुलाखत 19 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sggpjijamatacollege.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHPC Recruitment 2024 : 10 वी/ITI पास विद्यार्थ्यांसाठी खुषखबर!! NHPC अंतर्गत नवीन भरती सुरु

NHPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल (NHPC Recruitment 2024) तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड अंतर्गत आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे. पाहूया सविस्तर तपशील…

संस्था – राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड
भरले जाणारे पद – आयटीआय प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHPC Recruitment 2024)

आयटीआय प्रशिक्षणार्थी 10th + ITI Passed (Result awaited candidates should not apply) (Passed out ITI candidates during 2019, 2020, 2021, 2022 & 2023 ,2024 shall apply only

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या (NHPC Recruitment 2024) तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावा.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHPC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.nhpcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सरकारी नोकरी!! पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्ये नोकरीची संधी

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय अंतर्गत (Government Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सदस्य पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

संस्था – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भरले जाणारे पद – तांत्रिक सदस्य (Technical Member)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
22 मे 2024 (Government Job)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – The qualifications, eligibility, salary and other terms and conditions of the appointment of candidate will be governed by the provisions of the Tribunal (Conditions of Service) Rules, 2021.

असा करा अर्ज – (Government Job)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-MAIL पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mopng.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com