Home Blog Page 895

दिनविशेष 07 ऑगस्ट ।  राष्ट्रीय हातमाग दिन

करिअरनामा । देशात दरवर्षी  07 ऑगस्टला “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा केला जातो.  आजचा दिवस देशातील हातमाग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि हातमाग उद्योगाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो.  हा दिवस देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हातमागच्या योगदानावर प्रकाश टाकतो आणि विणकरांच्या उत्पन्नात वाढ करतो.

राष्ट्रीय हातमाग दिवसाचा इतिहास:

हातमाग उद्योगाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केले आहे.

1905 मध्ये ब्रिटीश सरकारने बंगालच्या फाळण्याच्या विरोधात कलकत्ता टाऊन हॉलमध्ये सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 07 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवडला गेला.  देशांतर्गत उत्पादने व उत्पादन प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने या चळवळीचे लक्ष्य होते.

पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नईच्या मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी हॉलमध्ये करण्यात आले होते.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-


AIIMS Recruitment 2020 | 3803 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदाच्या एकूण 3803 (नागपूर – 100 पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org      AIIMS Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर

पद संख्या – 3803 जागा (नागपूर – 100 पदे)

शैक्षणिक पात्रता – B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा

शुल्क – खुला प्रवर्ग –  1500 रुपये , SC/ ST/ EWS – 1200 रुपये

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे (SC / ST- 5 वर्ष सूट, OBC  – 3 वर्ष सूट )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत      AIIMS Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

SSC Constable Recruitment 2020 | 5846 जागांसाठी मेगा भरती

BOI Recruitment 2020 | बँक ऑफ इंडिया मध्ये 28 पदांची भरती

Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल (Indian Navy ) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in./

Indian Navy Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

इंजिन ड्राइव्हर – II- 1 जागा 

इंजिन ड्रायव्हर- 2 जागा 

ग्रीसर – 1 जागा 

शैक्षणिक पात्रता – 10th Pass

वयाची अट – 18 ते 25 वर्ष

अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन      Indian Navy Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in./

अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, {फॉर स्टाफ ऑफिसर (सिव्हिलियन रिक्रूटमेंट सेल)}, मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड, कोची – 682004

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

BOI Recruitment 2020 | बँक ऑफ इंडिया मध्ये 28 पदांची भरती

डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेडमध्ये विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.deccanbank.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

वयोमर्यादा – 50 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2020

ई-मेल पत्ता – [email protected]

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.deccanbank.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

 

BOI Recruitment 2020 | बँक ऑफ इंडिया मध्ये 28 पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ इंडिया अंतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-8-2020आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/   BOI Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

अधिकारी – 14 जागा

लिपिक – 14 जागा

पात्रता – 

अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी

लिपिक – 10 वी पास

वयाची अट –  18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण – मुंबई    BOI Recruitment 2020

शुल्क – खुला प्रवर्ग  – 500 रुपये , राखीव प्रवर्ग – 50 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 1 ऑगस्ट 2020 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16-8-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

UPSC Recruitment 2020 | 559 जागांसाठी भरती

इंडियन नेव्हीमध्ये भरती

Mahavitaran Nashik Bharti | 149 जागांची भरती

Google Classroom सुरु करणारं महाराष्ट्र ठरलं देशातील पहिलं राज्य

मुंबई । कोरोना संकटाने भविष्यातील आव्हानांची आज आपल्याला ओळख करून दिली आहे. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. अशा वेळी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत आजच्या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आपल्याला याबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवितांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावं असा सूरही त्यांनी आळवला. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं.

 

वडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन कमावलं नाव

हॅलो करिअरनामा ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत असताना या परीक्षांची माहिती मिळाली आणि मग हळूहळू अधिक माहिती मिळवत त्यांनी या परीक्षा देण्याचे निश्चित केले. आणि अभ्यास सुरु केला.  मार्गी या संस्थेतून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वेळोवेळी मार्गीचे प्रविण चव्हाण यांनी मागर्दर्शन केल्यामुळे गोष्टी सोप्या होत गेल्या असे ते म्हणतात.

ऋषिकेश यांनी तीनवेळा पूर्व परीक्षा दिली आहे. ते म्हणतात, ‘या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पूर्व परीक्षा हा अवघड टप्पा असतो. कारण इथेच पुढची चाळण लागणार असते. माझी पूर्व परीक्षा सुटत नव्हती तेव्हा पुन्हा प्रविण चव्हाण यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सल्ला दिला. त्यांनी दिलेल्या १०० प्रश्नपत्रिकांपैकी ९२ प्रश्नपत्रिका मी सोडविल्या त्यामुळे पूर्व परीक्षा पार करणे सोपे झाले.’ मुख्य परीक्षेसाठीही निबंध लेखनाचा बराच सराव केल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही पातळीवर यश मिळवत त्यांनी ६८८ रँक मिळविला आहे. त्यांना जिल्हाधिकारी पद हवे असल्याने सध्या मिळेल ते पद स्वीकारून पुन्हा तयारी करणार असल्याचे ते सांगतात.

कुपोषित मुलांसाठी काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांना त्यांच्या या यशामुळे अत्यंत आनंद झाला आहे. या क्षेत्रात यश मिळवू इच्छिणाऱ्या तसेच नव्याने या क्षेत्राचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम ठेवला पाहिजे तसेच हे क्षेत्र आव्हानात्मक असल्याने मानसिक स्थिरता ही महत्वाची असते असे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधी ठरवून तेवढ्याच काळात स्वतःला झोकून देऊन पर्यटन केले पाहिजेत आणि जरी यश आले नाही तरी आपला दुसरा एखादा प्लान बी तयार असला पाहिजे असे ते म्हणतात.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

जिल्हा रुग्णालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा रुग्णालय अंतर्गत  जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी  मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 100 रुपये

वेतन- 80,000 ते 90,000 रुपये पर्यंत

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख –7-8-2020

नोकरीचे ठिकाण – जालना

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा निवड समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जालना

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये २२० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रियेमध्ये मुदतवाढ झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२० 19-8-2020 (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – सहाय्यक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 220 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

सहाय्यक- 30 वर्ष 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी – 27 वर्ष 

प्रशिक्षणार्थी – 25 वर्ष 

सर्व पदांसाठी – ST/SC – 5 वर्ष सूट , OBC- 3 वर्ष सूट

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑगस्ट २०२० 19-08-2020 (मुदतवाढ) .

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या अंतिम स्पर्धकांमध्ये त्यांची निवड झाली होती. सौंदर्य आणि हुशारी अशा दोन्ही गुणांनी समृद्ध ऐश्वर्या श्योरान यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांनी ९३ वा रँक पटकाविला आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थी असणाऱ्या ऐश्वर्या यांनी केवळ कठोर परिश्रम, जिद्द आणि इच्छाशक्ती यांच्या बळावर हे यश मिळविले आहे. माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय यांच्या नावावरून माझे नाव ऐश्वर्या ठेवण्यात आले होते असे त्या सांगतात. आईची ईच्छा होती की मुलीने मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात नाव करावे. आईच्या इच्छेसाठी मिस इंडिया पर्यंत गेले मात्र मला नेहमीच प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. असे त्या म्हणाल्या. म्हणूनच मॉडेलिंग क्षेत्रातून थोडा ब्रेक घेऊन त्यांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यास करायला सुरुवात केली. हा मार्ग सोपा नव्हता मात्र त्यांनी मेहनतीने हे यश मिळविले आहे.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या ऐश्वर्या यांनी कोणता क्लास लावला नाही. अभ्यास करत असताना सोशल मीडियापासून दूर राहणे, फोन स्विच ऑफ ठेवणे अशा काही उक्तीचा त्यांनी अवलंब केला. तसेच लहानपणापासून अभ्यासाची सवय असल्याचा फायदा त्यांना यावेळी झाला. त्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थी होत्या मात्र नंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यांचे वडील अजय कुमार एनसीसी तेलंगणा बटालियन चे कमांडिंग ऑफिसर आहेत. मॉडेलिंग मधून थेट प्रशासकीय सेवेत आल्यामुळे त्यांचे ट्विटरवर अनेकजण अभिनंदन आणि कौतुक करत आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com