दिनविशेष 07 ऑगस्ट ।  राष्ट्रीय हातमाग दिन

करिअरनामा । देशात दरवर्षी  07 ऑगस्टला “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा केला जातो.  आजचा दिवस देशातील हातमाग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि हातमाग उद्योगाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो.  हा दिवस देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हातमागच्या योगदानावर प्रकाश टाकतो आणि विणकरांच्या उत्पन्नात वाढ करतो.

राष्ट्रीय हातमाग दिवसाचा इतिहास:

हातमाग उद्योगाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केले आहे.

हे पण वाचा -
1 of 209

1905 मध्ये ब्रिटीश सरकारने बंगालच्या फाळण्याच्या विरोधात कलकत्ता टाऊन हॉलमध्ये सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 07 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवडला गेला.  देशांतर्गत उत्पादने व उत्पादन प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने या चळवळीचे लक्ष्य होते.

पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नईच्या मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी हॉलमध्ये करण्यात आले होते.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-