Home Blog Page 881

पदवी प्रमाणपत्राची छपाई आता विद्यापीठातच

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांची छपाई आता विद्यापीठातच केली जाणार आहे.विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाची वार्षिक किमान 50 लाख रुपयाची बचत होणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळांतर्गत परीक्षा मुद्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या 117 व्या पदवी प्रदान समारंभापासून पदवी प्रमाणपत्रे , गुणपत्रके ट्रान्सक्रिप्ट आणि लेजर्स यांची छपाई केली जाणार आहे.

संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि मुद्रण कक्ष यांच्या समनवयातून पदवी प्रमाणपत्राच्या विदा प्रक्रिया ,छपाईसाठी विद्यापीठाच्या sppu एज्युकेट फाउंडेशनच्या माध्यमातून संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता पर्यंत विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची छपाई खाजगी मुद्रकांकडून करून घेत होते. मात्र आता विद्यापीठातच ही व्यवस्था निर्माण करण्यात आल्याने विद्यापीठाची किमान 50 लाख रुपयाची बचत होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. न्यायमूर्ती अशोक बूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला.

परिक्षांची तारिख बदलू शकते मात्र परिक्षा रद्द होऊ शकत नाही. ३० सप्टेंबर पर्यंत परिक्षा न घेणार्‍या राज्यांनी युजीसीने चर्चा करावी असे सुप्रिम कोर्टाने आपल्या निर्णयावेळी म्हटले आहे. जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करु शकतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन किंवा संमिश्र पद्धतीने घेण्याची मुभाही आयोगाने दिली. या परीक्षा ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या होत्या. यूजीसीच्या निर्देशांविरोधात आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्याशिवाय युवासेने तर्फेही याचिका दाखल केली होती.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर अकाउंटवर आलेल्या मेसेजला गंमतीदार वाटणारी गंभीर प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली आहे. स्पर्धा परीक्षेतील लांबलेलं यश आणि लग्नाचा मुद्दा याची सांगड घालत या तरुणाने आपली व्यथा मांडल्याचं दिसत आहे.

काय आहे ही प्रतिक्रिया – “मी यंदा परीक्षा पास होऊन, तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..आता तिचं लग्न होईल..विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका..परीक्षा झाल्याचं पाहिजे..

अर्थात ही प्रक्रिया खरोखर असल्याचं कुठेही समोर आलं नाही. ही प्रतिक्रिया कोणत्या अकाउंटवरुन आलेली नाही, तो केवळ रिप्लाय असल्याचं व्हायरल इमेजमधून स्पष्ट होत आहे. तरीही काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पाठिंबा तर काहींनी विरोध दर्शवल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

वर्षभराचं ऑनलाईन शिक्षण आता केवळ ७०८ रुपयांत ; ‘सुगत लर्निंग’चा अभिनव उपक्रम

करिअरनामा | कोरोना महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे शिक्षण. गाव-खेडं असुदे किंवा मोठी शहरं, दुर्गम आदिवासी पाडे असोत किंवा मेट्रो सिटीज – सर्वांनाच ऑनलाईन शिक्षणाचा बदल स्वीकारावा लागत आहे. साताऱ्यातील सुगत लर्निंग अकॅडमीने या अडचणीतही अधिक विद्यार्थ्यांना माफक पैशांत शिक्षण देण्याचं व्रत हाती घेतलं आहे. इयत्ता ८ वी ते १० वी च्या कोणत्याही वर्गाची, गणित आणि विज्ञान विषयाची वार्षिक ऑनलाईन शिकवणी केवळ ७०८ रुपयांत द्यायला सुगत अकॅडमीने सुरुवात केली आहे. या अभिनव उपक्रमाची जबाबदारी सुमित सुनीता सुभाष आणि सोनम पोवार या तरुण शिक्षकांनी घेतली असून या प्रकल्पाची अधिक माहिती त्यांनी दिली आहे.

सध्याच्या कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणपद्धती जम बसवत आहे. परंतु अजूनही, शालेय पातळीवर ऑनलाईन शिक्षणप्रणाली ही केवळ व्हिडिओ लेक्चर्स या माध्यमाभोवती फिरताना दिसत आहे. खरं तर शालेय वयोगटातील मुलांना त्यांचा अभ्यासक्रम केवळ समजून घेणे पुरेसे नाही, तर त्यासोबत महत्त्वाचा मुद्दा उरतो तो सरावाचा! अशावेळी मुलांना / विद्यार्थ्यांना व्हिडीओसोबतच योग्य सराव करून घेणारे माध्यम अतिशय फायदेशीर ठरेल.

याच सर्व गोष्टींचा विचार करून, sugatlearning.com  ही वेबसाईट काम करते. या वेबसाईटवर मुलांना व्हिडिओ लेक्चर सोबतच विस्तृत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी गृहपाठ दिला जातो. तसेच, मुलांची स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याकरिता बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देखील करून घेतला जातो. या वयोगटाच्या एकाग्रतेचा वेळ लक्षात घेऊन व्हिडीओ लेक्चरची लांबी २०-२५ मिनिटे एवढीच ठेवण्यात आली आहे. थोडक्यात, विद्यार्थ्याला व्हिडिओ लेक्चर सोबतच बहुपर्यायी प्रश्न संच आणि विस्तृत प्रश्नांचा संच दिला जातो. अर्थात,आपण जो अभ्यास करतो आहे, तो योग्य मार्गावर चालला आहे का, हे तपासणे देखील गरजेचे आहे. त्यासाठीच, या सर्व प्रश्नांची विस्तृत उत्तरे देखील मुलांना त्याच वेबसाईट वर उपलब्ध असतात. असे जरी असले, तरी मुलांना शंका उरतातच. त्यामुळेच मुलांना पडणाऱ्या शंकांचे निरसन करण्याची सोय देखील या वेबसाईटवर आहे.

वार्षिक शिक्षणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी –  sugatlearning.com वेबसाईट वरील एका पाठाच्या शेवटी मुलांकडे त्या संपूर्ण पाठाचे व्हिडिओ लेक्चर्स, २०-३० बहुपर्यायी प्रश्न आणि ४०-५० विस्तृत प्रश्न असा मोठा खजिना असतो.

हे सर्व जरी असले तरी महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आर्थिक बाजू! परंतु, दर्जेदार शिक्षण कोणत्याही आर्थिक स्तरात अडकून न राहता सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, हा आमचा या साईटमागचा हेतू असल्याचं सुमित आणि सोनम यांनी सांगितलं. या उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षभराच्या गणित आणि विज्ञानाच्या एकत्रित अभ्यासक्रमाची फी नाममात्र ७०८ रुपये आहे.

विज्ञानविषयक डेमो लेक्चर पाहण्यासाठी –
https://youtu.be/Tkxm7sJbjXs

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुलांना पूर्ण वेळ मोबाईल उपलब्ध असेलच, अशी शक्यता कमी असते. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ‘सुगत’ने केला आहे. सुगतचे व्हिडिओ लेक्चर कमी कालावधीचे असल्यामुळे दिवसातून कोणत्याही वेळेला मुलांकडे ३०-४० मिनिटे मोबाईल उपलब्ध असला, तरी त्यांचा अभ्यास होऊ शकतो. पालकांना, मुलांना ऑनलाईन पैसे देताना बऱ्याचदा अडचण येते, काही शंका असतात. या सर्व शंकांसाठी तुम्ही थेट शिक्षकांशी बोलून त्या सोडवू शकता. पैसे भरण्याचे ऑनलाईन सोडून इतरही मार्ग उपलब्ध असल्याने पालकांना याची चिंता करण्याचं कारण नाही.

शिक्षणक्षेत्रातील हा नवीन बदल समजून घेऊन त्यात सहभागी व्हायचं असेल तर sugatlearning.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क – 84210-27310

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

MPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय
– राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी सात नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
– राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
– वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
– टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
– मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आठ महानगरपालिका व सात नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
– नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेणार असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

आम्ही असे कधीच म्हटले नाही कि आम्ही परीक्षा घेणार नाही. जून महिन्यापेक्षा आज कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. जून महिन्यात परीक्षा घेतली नाही तर आपण आता परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात कसे टाकू शकतो. जूनमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला कि आत्ता आपण ज्या सेमिस्टर झाल्या आहेत त्यांचे अग्रिकेत मार्ग विद्यार्थ्यांना देऊन त्यांना पास करायचे. तसेच यानंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेणार असाही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना वाटते कि परीक्षा झाली तर माझे गुण वाढू शकतील असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा मार्ग असेल असं ठाकरे यांनी नमूद केले.

दरम्यान, अमेरिकेत सरकारने शाळा सुरु केली आणि १ लाख विद्यार्थी कोरोना बाधित झाले. हे असे आपल्या इथे झाले तर काय करायचे? असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचारला. कोरोनाचे संकट गडद झालेले असताना परीक्षा घेऊन आपण विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही. मात्र नंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा सरकार विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेईल अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

पदविका प्रवेश अर्जासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालयाकडून (डी टी ई) दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (पॉलीटेकनिक) तसेच हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेकनॉलॉजी आशा डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून राबविण्यात आली होती.अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी उशीर  होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रकियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी आहेत.

दरम्यान तात्पुरती गुणवत्तायादी 7 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून  त्याबाबतचे आक्षेप 10 सप्टेंबरपर्यन्त नोंदवता येतील. त्यानंतर 12 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशी डीटीईचे  संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.

महाविद्यालयात कोट्यातील राखीव जागांसाठी अर्ज भरणे ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची प्रक्रिया ‘कट ऑफ डेट’ पर्यंत सुरु राहणार आहे. 4 सप्टेंबरनंतर पडताळणी होऊन हे अर्ज स्थलांतरावरील, तसेच प्रक्रियेव्यतिरिक्त जागांसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती डीटीईकडून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल. नवीन पॉलिसीअंतर्गत एमएसएमईसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य केले जाईल.

50 हजार लोकांना नोकरी मिळेल या आशेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या स्टार्टअप पॉलिसीमुळे 50,000 लोकांना 50,000 नोकर्‍या मिळतील, तर राज्यात 1 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतील. एका अहवालानुसार, स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना मदत करण्यासाठी राज्याचे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने पुढील योजनांवर काम करत आहे.

येथे अर्ज करा, निवेदनात म्हटले आहे की स्टार्टअप पॉलिसी अधिसूचनेच्या तारखेपासून 5 वर्षांसाठी वैध असेल. या जिल्हा उद्योग केंद्रात एमएसएमईकडून ऑनलाईन अर्ज केले जातील. यानंतर, त्यांना 72 तासात सुविधा मिळू शकतात. केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या मदतीची घोषणा केली आहे. यामध्ये व्यवसाय वाढीस प्रोत्साहन तसेच कर्ज व्याजवरील अनुदानाचा समावेश आहे.

PHDCCI (PHD Chamber of Commerce and Industry) चेंबरच्या सदस्यांची संख्या दीड लाखाहून अधिक आहे आणि त्यातील 70 टक्के एमएसएमई आहेत. भारताला औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी चेंबर सरकारशी जवळून काम करत आहे.

जिल्हा परिषद, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, वर्धा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

पदाचे नाव आणि  पदसंख्या –

आयुष वैद्यकीय अधिकारी – 24 जागा

अधिपरिचारिका – 24 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10 जागा

पात्रता – 

आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/ BUMS/ BDS

अधिपरिचारिका – GNM/ B.Sc Nursing

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT/ 12th DMLT

नोकरीचे ठिकाण – वर्धा

अर्ज पद्धती – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नेट परीक्षेच्या अर्जासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए ) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. या उमेदारानाही संधी मिळण्यासाठी सीएसआयआर – युजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदत दिली आहे.

राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु असेल. तसेच 10 सप्टेंबरला रात्री 11.50 वाजेपर्यंत शुल्क स्वीकारले जाईल. 11 ते 17 दरम्यान अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. अधिक माहिती एनटीएच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com