पदवी प्रमाणपत्राची छपाई आता विद्यापीठातच

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांची छपाई आता विद्यापीठातच केली जाणार आहे.विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाची वार्षिक किमान 50 लाख रुपयाची बचत होणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळांतर्गत परीक्षा मुद्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या 117 व्या पदवी प्रदान समारंभापासून पदवी प्रमाणपत्रे , गुणपत्रके ट्रान्सक्रिप्ट आणि लेजर्स यांची छपाई केली जाणार आहे.

संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि मुद्रण कक्ष यांच्या समनवयातून पदवी प्रमाणपत्राच्या विदा प्रक्रिया ,छपाईसाठी विद्यापीठाच्या sppu एज्युकेट फाउंडेशनच्या माध्यमातून संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता पर्यंत विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची छपाई खाजगी मुद्रकांकडून करून घेत होते. मात्र आता विद्यापीठातच ही व्यवस्था निर्माण करण्यात आल्याने विद्यापीठाची किमान 50 लाख रुपयाची बचत होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com