Home Blog Page 350

SSC Exam 2023 : 10वी च्या पेपर दिवशीच वडिलांचा मृत्यू; न खचता लेकीने लिहला पेपर; प्राचीच्या धिराचं कौतुक करावं तेवढं थोडंच

SSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वीच्या परीक्षा सुरु झाल्या (SSC Exam 2023) आहेत. अशातच महत्वाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर आली. याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये शोक पसरला. याचवेळी घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना त्याच दिवशी मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिच्या जोवची घालमेल सुरु होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेवून कुटुंबियांनी तिला धीर देत परीक्षेला जाण्यासाठी प्रवृत्त केलं. घरात वडिलांचा मृतदेह असताना मोठ्या धैर्याने तिने पेपर दिला. भंडारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या प्राची राधेश्याम सोंदरकर या मुलीबाबत हा मन सुन्न करणारा प्रसंग घडला आहे.

गेल्या महिन्यात झाला होता अपघात (SSC Exam 2023)

सोंदरकर कुटुंबीय भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम इथले रहिवासी आहेत. राधेशाम सोंदरकर हे प्राचीचे वडील. त्यांचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदूरवरुन घरी जात असताना मेंढा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे.

गंभीर वातावरणात सुरु होता अभ्यास

एकीकडे राधेशाम यांच्यावर नागपुरात उपचार सुरु असतानाच तोंडावर दहावीची परीक्षा होती. घरातील कर्त्या पुरुषाचा अपघात झाल्याने घरात शोकाकूल वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुलीने या संकटकाळात खचून न जाता, वडिलांनी मुलींनाच मुलासमान जपत, “पोरी, अभ्यास कर, (SSC Exam 2023) उच्चशिक्षण घेऊन पुढे जा, खूप मोठी हो, स्वत:च्या पायावर उभी रहा,” हा वडिलांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवत दहावीच्या परीक्षेची तयारी चालू ठेवली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातील गंभीर वातावरणातही प्राची दिवस रात्र अभ्यास करत होती.

सकाळी 6 वाजता बातमी येवून धडकली (SSC Exam 2023)

अशातच सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोबाईल खणाणला आणि प्राचीने फोन उचलला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच मुलगी नि:शब्द झाली. वडिलांच्या मृत्यूची बातमी गल्लीत वाऱ्यासारखी पसरली, शेजारी एकवटले, बघता-बघता घरासमोर गर्दी झाली, शोकाकूल (SSC Exam 2023) वातावरणात आई, आजी, काका, काकू, लहान बहीण सगळे शोक करु लागले. वडिलांच्या अचानक जाण्याने प्राचीचा धीर खचला होता. वडिलांच्या दु:खाचे ओझे मनावर बांधूनच प्राचीने न रडता आपले ध्येय पूर्ण करायचे ठरवले. परीक्षेला जाण्याची तयारी करून तीने देसाईगंज वडसा येथील परीक्षा केंद्र गाठलं. यावेळी तिला तीच्या घरच्यांनी खंबीर साथ दिली.

शिक्षकांनी दिला आधार

प्राचीच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. दामोधर सिंगाडे यांना घटनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडवण्यासाठी धीर देऊन वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यास (SSC Exam 2023) सांगितलं. प्राचीने देखील घरी वडिलांचा अंत्यविधी असताना तिने धैर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे. प्राचीचा हा धाडसी निर्णय तमाम विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देणारा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2023 : SBI जनरल इन्शुरन्समध्ये 150 जागांवर भरती; पात्रता फक्त 12वी/ डिप्लोमा

SBI Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड अंतर्गत बिझनेस (SBI Recruitment 2023) करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 150 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – SBI जनरल इन्शुरन्स लिमिटेड

भरले जाणारे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर

पद संख्या – 150 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (SBI Recruitment 2023)

मिळणारे वेतन – रु. 7000/– ते 20,000/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

असा करा अर्ज – (SBI Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

Application Details – (SBI Recruitment 2023)
SBI General Insurance Ltd Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.sbigeneral.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment : 10 वी पास/ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात भरती; या लिंकवर करा अर्ज

MSRTC Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (MSRTC Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  विविध पदांच्या एकूण 134 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संभाजी नगर

भरले जाणारे पद –

  1. ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  2. पदवी शिकाऊ

पद संख्या – 134 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSRTC Recruitment)

उमेदवार 10th पास तसेच ITI प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे Driving License असावे.

नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजी नगर

वय मर्यादा – 18 ते 34 वर्षे

अर्ज फी  –

खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-

मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

आवश्यक कागदपत्रे –

1) Aadhar card

2) Caste certificate

3) Photograph, Signature (MSRTC Recruitment)

4) Email ID, Mobile Number

5) School Leaving Certificate

6) ITI Mark Sheet (Post wise)

7) 10th pass mark sheet

8) 12th pass mark sheet (rank-wise)

9) Engineering Mark Sheet (Post wise)

काही महत्वाच्या लिंक्स – (MSRTC Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – 

  1. ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी – APPLY
  2. पदवी शिकाऊ – APPLY

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 60 हजार पगाराची सरकारी नोकरी!! गेल गॅस लि.मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

Government Jobs (21)

करिअरनामा ऑनलाईन । गेल गॅस लिमिटेड मध्ये रिक्त पदे (Government Jobs) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 120 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

संस्था – गेल गॅस लिमिटेड

पद संख्या – 120 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 10 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

1. सिनियर असोसिएट (टेक्निकल) – 72 पदे

50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी तसेच 02 वर्षे अनुभव आवश्यक.

2. सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी) – 12 पदे

50% गुणांसह फायर/फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBA (मार्केटिंग/ऑइल & गॅस/पेट्रोलियम & एनर्जी/एनर्जी & इंफ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिजनेस) तसेच  02 वर्षे अनुभव आवश्यक.

3. सिनियर असोसिएट (मार्केटिंग) – 06 पदे (Government Jobs)

CA/CMA (ICWA) किंवा 50% गुणांसह MBA (फायनान्स) तसेच 02 वर्षे अनुभव आवश्यक

4. सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स) – 06 पदे

कंपनी सेक्रेटरी पदावर 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

5. सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) – 02 पदे

कंपनी सेक्रेटरी पदावर 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

6. सिनियर असोसिएट (HR) – 06 पदे

50% गुणांसह MBA/MSW/PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन /HR मॅनेजमेंट) तसेच 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

7. ज्युनियर असोसिएट (टेक्निकल) – 16 पदे

50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक. (Government Jobs)

वय मर्यादा –

10 एप्रिल 2023 रोजी 32 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/PWD: फी नाही]

मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.gailgas.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 110 तरुणांना नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?

BEL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे रिक्त पदांच्या (BEL Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता-I पदाच्या एकूण 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

भरले जाणारे पद – प्रकल्प अभियंता-I

पद संख्या – 110  पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 17 मार्च 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही–

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEL Recruitment 2023)

B.E./B.Tech./B.Sc Engg.

मिळणारे वेतन – Rs. 40,000/- ते 55,000/- दरमहा (BEL Recruitment 2023)

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – 32 वर्ष

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट bel-india.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (BEL Recruitment 2023)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bel-india.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जे बाहेर फुकट आणि दवाखान्यात विकत मिळते ते काय? UPSC मुलाखतीत विचारले जाणारे 8 प्रश्न

GK Updates 6 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

1. जे बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन मिळते ते काय आहे?

उत्तर – ऑक्सिजन.

2. एका महिला उमेदवाराला विचारण्यात आलेला प्रश्न, जर तुम्ही सकाळी उठला आणि तुम्ही गर्भवती असल्याचे आढळले तर?

उत्तर – (GK Updates) मला खूप आनंद होईल आणि माझ्या पतीसोबत ही बातमी आनंदाने साजरी करेन.

3. 01 लिटर पाण्यात किती थेंब असतात?

उत्तर – सुमारे 20 हजार थेंब.

4. महिला वर्षातून एकदा कोणती वस्तू खरेदी करते?

उत्तर – राखी

5. चित्रकाराला हिंदीत काय म्हणतात?

उत्तर – चित्रकार

6. सोन्याचे ATM मशीन कोणत्या देशात आहे?

उत्तर – दुबईमध्ये (GK Updates)

7. कन्याकुमारी ते जम्मू हे रेल्वेने किती अंतर आहे?

उत्तर – 3,711 किमी.

8. काचेचा रंग कोणता?

उत्तर – पांढरा रंग. (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : या तरुणाने रिस्क घेतली; गुगलची नोकरी सोडली अन् जिद्दीने UPSC मध्ये पहिली रॅंक मिळवली

IAS Success Story Anudeep Durishetty

करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये नोकरी मिळणे हे तरुणांसाठी (IAS Success Story) एखाद्या स्वप्नातील नोकरीपेक्षा कमी नाही. पण  असेही काही जिद्दी तरुण आहेत जे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी बड्या पगराच्या नोकरीवर पाणी सोडताना दिसतात. अनेकदा असं दिसतं, की एवढी मोठी रिस्क घेवून त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो; पण त्यांच्या हेतुत मात्र बदल होत नाही. आज आम्ही अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने UPSC परीक्षेसाठी गुगलची नोकरी सोडली आणि अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर यश मिळवले. हे यश किरकोळ नसून त्यांनी या परिक्षेत संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. 2017 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनुदीप दुरीशेट्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा UPSC चा प्रवास कसा होता ते पाहूया…

 

IAS Success Story Anudeep Durishetty

तेलंगणाचे आहेत अनुदीप दुरिशेट्टी

अनुदीप दुरिशेट्टी हे तेलंगणाचे आहेत. येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी BITS पिलानी येथून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांना गुगल कंपनीत नोकरी मिळाली.

Google मध्ये नोकरीसह UPSC चा अभ्यास

अनुदीप गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. पण त्यांचे या नोकरीत फारसे मन रमले नाही, कारण त्यांचे स्वप्न काही वेगळेच होते. खरे तर त्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी नोकरी करतच UPSC चा अभ्यास सुरु ठेवला. तसेच अनुदीप यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली होती मात्र ते मुलाखतीत तो नापास झाले. त्यामुळे नोकरीच्या काळातही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.

IAS Success Story Anudeep Durishetty

अनेक प्रयत्नांमध्ये अपयश

2013 मध्ये अनुदीप पुन्हा एकदा UPSC परीक्षेस बसले. या परीक्षेत त्यांना 790 वी रँक मिळाली. या रॅंकमुळे त्यांना भारतीय महसूल सेवा मिळाली. मात्र त्यांना IAS व्हायचे असल्यामुळे त्यांना मिळालेल्या IRS पदावर ते समाधानी नव्हते.  तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. ते पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिले. अनेकवेळा अपयश येवूनही ते थांबले नाहीत. ‘तुमच्या उणिवा ओळखा आणि काम करत राहा’; असा सल्ला तरुणांना ते नेहमी देतात.

IAS Success Story Anudeep Durishetty

अखेर प्रथम क्रमांक मिळवलाच

अनुदीप यांनी शेवटच्या प्रयत्नात यश मिळवले. हे यश किरकोळ नव्हते. तर, 2017 मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावला होता. अशा प्रकारे त्यांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Oxford Education : रयतमध्ये शिकता येणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम; शरद पवार यांची माहिती

Oxford Education

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम (Oxford Education) या आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. “ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल;” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अॅड. रवींद्र पवार, डॉ. भगीरथ शिंदे, प्रभाकर देशमुख, (Oxford Education) राजेंद्र फाळके, सुभाष शिंदे, एम. बी. शेख, संजीव पाटील, राजकुमार पाटील, प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, आपल्याला आता काळाची पावले ओळखून बदल केले पाहिजेत. कारण रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार (Oxford Education) केला आहे. आता शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह त्याच्या विस्ताराकडे रयतने विशेष लक्ष दिल्याने जागतिक पातळीवरही रयतची मोहर उमटली जाणार आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. धान्य पैसा रयतेच्या नावाने उभा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यास हातभार लागला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Exam 2023 : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!! मुलाला कॉपी पुरवण्यासाठी पालकच सरसावले; शिक्षकासोबत खडाजंगी (Video)

HSC Exam 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र 12 वीच्या परीक्षा सुरु (HSC Exam 2023) असून परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापलं गेलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत 12 वी ची परीक्षा सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला. कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला आहे. मुलांना कॉपी देण्यासाठी परीक्षा गृहात सोडत नसल्याने हा वाद झाला. तसेच ‘इतर पालकांना सोडलं (HSC Exam 2023) मग आम्हाला का नाही,’ असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर उघडपणे कॉपी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी मोठ्या उमेदीने सामोरे जात होते. पण इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुका त्यानंतर गणिताचा पेपर फुटणे यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आघात झाला आहे. फुटलेला पेपर परत होईल का? याबाबत शिक्षण (HSC Exam 2023) विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी मोठ्या संख्येत बारावीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ती प्रतारणा होत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा (HSC Exam 2023)

बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून मोठा (HSC Exam 2023) गाजावाजा करण्यात आला होता. यंदा बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेत त्रुटी राहिल्याने यंदाची 12वीची परीक्षा कॉपीमुक्त होण्याऐवजी कॉपीयुक्त होत असल्याचं चित्र सर्रास दिसत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EIL Recruitment 2023 : इंजीनियर्ससाठी खुशखबर!! Engineers India Ltd.मध्ये सरकारी नोकरीसाठी आजच अर्ज करा

EIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत (EIL Recruitment 2023) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 42 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.

संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड

भरले जाणारे पद –

  1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – 21 पदे
  2. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – 21 पदे

पद संख्या – 42 पदे

अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत

वय मर्यादा – (EIL Recruitment 2023)

  1. सामान्य उमेदवार – 25 वर्षे
  2. OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार – 28 वर्षे
  3. SC/STउमेदवार – 30 वर्षे
  4. PWD उमेदवार
  5. सामान्य – 35 वर्षे
  6. OBC-NCL – 38 वर्षे
  7. SC/ST – 40 वर्षे

काही महत्वाच्या तारखा –

Engineers India Limited Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Full-time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks
  2. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – Full time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks

मिळणारे वेतन –

  1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Rs.60,000-18,0000/- दरमहा
  2. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) Rs.60,000-18,0000/- दरमहा (EIL Recruitment 2023)

असा करा अर्ज –

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो म्हणजे एकतर MT (बांधकाम) किंवा MT (इतर) साठी.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. (EIL Recruitment 2023)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.
  6. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया –

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. निवडलेल्या उमेदवारांना पुढे गटचर्चा आणि मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
  3. निवडलेल्या उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि त्याची माहिती उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर ई-मेलद्वारे दिली जाईल. (EIL Recruitment 2023)
  4. मुलाखतीसाठी पात्र अशा सर्व उमेदवारांना III AC स्लीपर रेलचे भाडे अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मेलिंग पत्त्यावरून मुलाखत केंद्रापर्यंत सर्वात लहान मार्गाने दिले जाईल.
  5. सर्व उमेदवारांना www.engineersindia.com या वेबसाइटला भेट देऊन निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अपडेट राहण्याची विनंती केली आहे.

रिक्त पदांचा तपशील –
Engineers India Limited Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – engineersindia.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com