Home Blog Page 349

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेने जाहीर केली 320 पदांवर भरती; काय आहे पात्रता?

PMC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या (PMC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

भरली जाणारी पदे –

  1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 पदे
  2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 20 पदे
  3. उप संचालक – 01 पद
  4. पशुवैदयकीय अधिकारी – 02 पदे
  5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – 20 पदे
  6. कनिष्ठ अभियंता – 10 पदे (PMC Recruitment 2023)
  7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – 40 पदे
  8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – 03 पदे
  9. मिश्रक/ औषध निर्माता – 15 पदे
  10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 01 पद
  11. अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 पदे

पद संख्या – 320 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023

अर्ज फी – (PMC Recruitment 2023)

  1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
  2. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-

वय मर्यादा –

Pune Mahanagarpalika Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.
ब) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)
अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

3. उप संचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण
अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व (PMC Recruitment 2023) वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

4. पशुवैदयकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

6. कनिष्ठ अभियंता – अ) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.
अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – (१) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
२) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.

३) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. (PMC Recruitment 2023)

४) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.

अनुभव : पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

9. मिश्रक/ औषध निर्माता – अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.
ब) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)

क) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य

ड) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

10. पशुधन पर्यवेक्षक – ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.

अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

11. अग्निशामक विमोचक / फायरमन – १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. (PMC Recruitment 2023)

३) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.

४) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

मिळणारे वेतन – 

  1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) वेतन श्रेणी एस-२३ : Rs. ६७७००- २०८७०० दरमहा
  2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस २०: Rs. ५६१००-१७७५०० दरमहा
  3. उप संचालक वेतन श्रेणी एस – १८: Rs. ४९१००-१५५८०० दरमहा
  4. पशुवैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा
  5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा (PMC Recruitment 2023)
  6. कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणी एस-१४: Rs. ३८६०० १२२८०० दरमहा
  7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर वेतन श्रेणी एस – १३: Rs. ३५४००-११२४०० दरमहा
  8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १३: Rs.३५४००-११२४०० दरमहा
  9. मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १०: Rs.२९२०० ९२३०० दरमहा
  10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वेतन श्रेणी एस ८ : Rs. २५५००-८११०० दरमहा
  11. अग्निशामक विमोचक / फायरमन वेतन श्रेणी एस ६ : Rs. १९९००-६३२०० दरमहा

असा करा अर्ज – (PMC Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  3. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
  5. उमेदवारांनीअर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  6. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया –

  1. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
  2. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल.
  3. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
  4. उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही. (PMC Recruitment 2023)
  5. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  6. परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

काही महत्वाच्या तारखा –

Pune Mahanagarpalika Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CPCB Recruitment 2023 : सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 10वी ते B. Tech उमेदवारांसाठी जॉब; इथे करा Apply

CPCB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात (CPCB Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 163 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

पद संख्या – 163 पदे

भरली जाणारी पदे – (CPCB Recruitment 2023)

1. शास्त्रज्ञ ‘बी’ 63 पदे

2. सहाय्यक कायदा अधिकारी 06 पदे

3. सहायक लेखाधिकारी 01 पद

4. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16 पदे

5. तांत्रिक पर्यवेक्षक 01 पद

6. सहाय्यक 03 पदे

7. लेखा सहाय्यक 02 पदे

8. कनिष्ठ तंत्रज्ञ 03 पदे

9. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 15 पदे

10. अप्पर डिव्हिजन लिपिक 16 पदे (CPCB Recruitment 2023)

11. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड-II 03 पदे

12. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 15 पदे

13. निम्न विभाग लिपिक 05 पदे

14. फील्ड अटेंडंट 08 पदे

15.  मल्टी-टास्किंग स्टाफ 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

  1. उमेदवारांनी पदानुसार इयत्ता 10वी/12वी/ डिप्लोमा/ BE/ B.Tech/ बॅचलर डिग्री/ संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  2. उमेदवाराकडे किमान अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा – 

  1. सायंटिस्ट बी पोस्टसाठी उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (CPCB Recruitment 2023)
  2. सहाय्यक कायदा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक आणि लेखा सहाय्यक पदांसाठी उच्च वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
  3. उर्वरित पदांसाठी, शेवटच्या तारखेपर्यंत 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार.
  4. नियमानुसार वयोमर्यादा शिथिलता स्वीकारली जाते.

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी 1000/₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/₹150/-]

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली/संपूर्ण भारत.

मिळणारे वेतन –

  1. सायंटिस्ट ‘B’ – 56,100-1,77,500/-
  2. असिस्टंट लॉ ऑफिसर – 44,900-1,42,400/-
  3. असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – 44,900-1,42,400/-
  4. सिनियर सायंटिफिक असिस्टंट – Rs.35,400-1,12,400/-
  5. टेक्निकल सुपरवाइजर – Rs.35,400-1,12,400/-
  6. असिस्टंट – Rs.35,400-1,12,400/- (CPCB Recruitment 2023)
  7. अकाउंट्स असिस्टंट – .35,400-1,12,400/-
  8. ज्युनियर टेक्निशियन – Rs.25,500-81,100/-
  9. सिनियर लॅब असिस्टंट – Rs.25,500-81,100/-
  10. उच्च श्रेणी लिपिक (UDC) – Rs.25,500-81,100/-
  11. डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II – (Rs.25,500-81,100/-)
  12. ज्युनियर लॅब असिस्टंट – Rs.19,900-63,200/-
  13. निम्न श्रेणी लिपिक (LDC) – Rs.19,900-63,200/-
  14. फील्ड अटेंडंट – Rs.18,000-56,900/-
  15. मल्टी टास्किंग स्टाफ – Rs.18,000-56,900/-

निवड प्रक्रिया – (CPCB Recruitment 2023)

लेखी परीक्षा तसेच कौशल्य/व्यापार चाचणी आणि मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://cpcb.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CIDCO Recruitment 2023 : 10 वी पास असाल तर CIDCOमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा; इथे आहे लिंक

CIDCO Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शहर आणि औद्योगिक विकास (CIDCO Recruitment 2023) महामंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदाच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (City and Industrial Development Corporation)

भरले जाणारे पद –  ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

पद संख्या – 04 पदे (CIDCO Recruitment 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs. 6,000/– 8,050/- दरमहा

असा करा अर्ज – (CIDCO Recruitment 2023)

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – cidco.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : हे आहेत देशातील ‘5’ सर्वात लोकप्रिय कोर्स, एक केलात तर लाईफ होईल सेट

Career Tips (7)

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विविध विद्यापीठांमध्ये दरवर्षी (Career Tips) लाखो विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या विद्यापीठांतील अनेक विद्यार्थ्यांना उत्तम ठिकाणी चांगल्या पॅकेजची नोकरीही मिळते. असे अनेक कोर्सेस आहेत जे दरवर्षी लाखो विद्यार्थी दत्तक घेतात आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळते. कोर्स निवडताना तुम्ही कोणता कोर्स निवडत आहात हे लक्षात घेणं गरजेचं आहे.  कारण तुमचे करिअरही या कोर्सेसशी निगडीत आहे. म्हणूनच आज आम्ही अशाच 5 कोर्सेसबद्दल बोलणार आहोत जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरही घडले आहे.

1. चार्टर्ड अकाउंटन्सी (Chartered Accountancy)

तुम्हाला अकाउंटिंग किंवा फायनान्सशी संबंधित गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. चार्टर्ड अकाउंटन्सी एखाद्या व्यक्तीसाठी किंवा गटासाठी ऑडिटिंग, अकाउंटिंग, आर्थिक मूल्यांकन आणि कर भरणे या विषयांचे ज्ञान देते. या शिक्षणानंतर सनदी लेखापाल (Career Tips) म्हणजेच CA म्हणून तुम्ही जबाबदारी पर पडू शकता. विद्यार्थ्याला या क्षेत्राची आवड असेल तर तो या क्षेत्रात करिअर करू शकतो. 12 वी नंतर, विद्यार्थी फाउंडेशन कोर्स करू शकतात, तर ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी थेट प्रवेश पर्याय उपलब्ध आहे.

2. कंपनी सचिव (Company Secretary)

कंपनी सेक्रेटरी (CS) हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो 10+2 पूर्ण केल्यानंतर किंवा मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी पूर्ण केल्यानंतर करता येतो. 10+2 नंतर कंपनी सेक्रेटरी कोर्स करण्यासाठी, एखाद्याला ICSI CSEET परीक्षा द्यावी लागते, त्यानंतर कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (9 महिने) आणि शेवटी (Career Tips) कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल प्रोग्राम (15 महिने) तसेच उमेदवारांनी संबंधित प्रवाहात पदवी पूर्ण केली असल्यास ते 2 वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. ज्या उमेदवारांनी 12वी पूर्ण केली आहे आणि कंपनी सेक्रेटरी कोर्स करू इच्छितात त्यांच्यासाठी ICSI CSEET परीक्षा देणे अनिवार्य आहे.

3. MBA (Master of Business Administration) (Career Tips)

मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MBA हा 2 वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे जो अनेक क्षेत्रात करता येतो. एमबीए कोर्स भविष्यातील व्यावसायिक लोक आणि उद्योजकांमध्ये व्यवसाय आणि व्यवस्थापन कौशल्ये निर्माण करण्यास मदत करतो. MBA केल्यानंतर (Career Tips) विद्यार्थ्याला हव्या त्या उद्योगात करिअर करणे खूप सोपे जाते. भारतातील आघाडीच्या एमबीए महाविद्यालयांमध्ये IIM बंगलोर, IIM अहमदाबाद, IIM लखनौ, IIM कलकत्ता आणि MDI गुडगाव यांचा समावेश आहे. भारतातील बहुतांश एमबीए महाविद्यालये अग्रगण्य आणि प्रस्थापित कंपन्यांमध्ये थेट प्लेसमेंट आणि एमबीए नोकऱ्या देतात. या अभ्यासक्रमात 50 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे उमेदवारच एमबीएसाठी अर्ज करू शकतात.

4. MCA (Master of Computer Applications)

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स किंवा MCA मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन संगणक प्रोग्रामिंग, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम हा अभ्यासक्रम शिकता येतो. MCA हा BCA पदवीधरांसाठी 2 वर्षांचा आणि इतर प्रवाहातील पदवीधरांसाठी 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. बीसीए कोर्स करण्यासाठी, उमेदवारांनी (Career Tips) बीसीएमध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून एकूण 50% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. काही प्रवेश परीक्षांमध्ये NIMCET, Mah MCA CET, TANCET, IPU CET इत्यादींचा समावेश होतो. सॉफ्टवेअर प्रोग्रामर, सिस्टम अॅनालिस्ट, प्रोग्रामर, सिस्टीम इंजिनिअर इत्यादी बनण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

5. एरोनॉटिकल अभियांत्रिकी (Aeronautical Engineering)

एरोनॉटिकल अभियांत्रिकी फ्लाइंग मशिनरीशी संबंधित आहे, ज्यामध्ये यंत्रसामग्रीची रचना आणि बांधकाम तसेच विमान चालवण्याचे तंत्र यांचा समावेश आहे. उमेदवार या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. या कोर्सद्वारे अभियंते व्यावसायिक आणि लष्करी विमाने आणि क्षेपणास्त्रांचे (Career Tips) डिझाइन, निर्मिती, चाचणी आणि विश्लेषण करतात आणि प्रशिक्षण घेतात. या कार्यक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी, उमेदवारांना JEE Main, JEE Advanced, AMECET, IISAT इत्यादी अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : ‘या’ आहेत भारतातील सर्वात पहिल्या आणि प्रसिद्ध महिला; स्पर्धा परीक्षा देताना ही माहिती असायलाच हवी

GK Updates 8 Mar

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील पहिल्या महिला कोण? यासारखे प्रश्न (GK Updates) कधीकधी खूप गोंधळात टाकतात. कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना भारताच्या विविध क्षेत्रातील पहिल्या महिलांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रत्येक क्षेत्रातील पहिल्या महिलांविषयी सांगणार आहोत. खाली दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे निश्चितच तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालतील आणि ऐन परीक्षा किंवा मुलाखतीच्यावेळी तुमचा गोंधळ होणार नाही.

1. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर : प्रतिभा देवीसिंह पाटील

2. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
उत्तर : सरोजिनी नायडू

माहिती – (GK Updates)
सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस १३ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत
सरोजिनी नायडू यांना “भारताची कोकिळा” म्हणून ओळखले जाते.
“ब्रोकन विंग”, “द गोल्डन थ्रेशोल्ड”, “द बर्ड ऑफ टाईम” या महत्त्वाच्या साहित्यकृती त्यांनी लिहल्या आहेत.

3. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : इंदिरा गांधी

4. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : सुचेता कृपलानी

5. भारताच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत?
उत्तर : विजयालक्ष्मी पंडित

6. भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण आहेत?
उत्तर: राजकुमारी अमृत कौर

7. भारतातील पहिली महिला स्पीकर कोण आहे?
उत्तरः मीरा कुमार (GK Updates)

8. राज्य विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत?
उत्तर: शानो देवी

9. इंग्रजी वाहिनी ओलांडणारी पहिली भारतीय महिला?
उत्तर: आरती साहा

10. जिब्राल्टर सामुद्रधुनी पार करणारी पहिली भारतीय महिला?
उत्तर: आरती प्रधान

11. भारतातील पहिली मिस वर्ल्ड कोण आहे?
उत्तर: रीथा फारिया

12. भारतातील पहिली मिस युनिव्हर्स कोण आहे?
उत्तरः सुस्मिता सेन

13. पहिली मिस इंडिया कोण आहे?
उत्तर: प्रमिला एस्थर अब्राहम

14. पहिली महिला IPS कोण आहे?
उत्तर : किरण बेदी (GK Updates)

15. पहिली महिला IAS कोण होती?
उत्तरः अण्णा मल्होत्रा

16. पहिल्या महिला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोण होत्या?
उत्तरः अण्णा चंडी

17. उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या?
उत्तर: लीला सेठ

18. पहिली महिला दंडाधिकारी कोण होत्या?
उत्तर: ओमाना कुंजम्मा

19. भारताची मुख्य निवडणूक आयुक्त बनणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर: व्ही.एस. रमादेवी

20. नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
उत्तर: मदर तेरेसा

21. भारतरत्न जिंकणारी पहिली महिला कोण?
उत्तर : इंदिरा गांधी

22. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार? (GK Updates)
उत्तरः एम एस सुब्बुलक्ष्मी

23. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
उत्तर: कर्णम मल्लेश्वरी

24. अंतराळात पोहोचणारी पहिली भारतीय महिला?
उत्तर: कल्पना चावला

25. राज्यसभेवर नियुक्त पहिली महिला?
उत्तर: रुक्मिणीदेवी अरुंदळे

26. दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणारी पहिली महिला?
उत्तर: देविका राणी रोरीच

27. INC (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) च्या पहिल्या महिला अध्यक्षा
उत्तरः अॅनी बेसेंट (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment : NHM अंतर्गत सिंधुदुर्ग येथे ‘या’ पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

NHM Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग येथे रिक्त (NHM Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 73 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 व 16 मार्च 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग

पद संख्या – 73 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 व 16 मार्च 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHM Recruitment)

1) वैद्यकीय अधिकारी (पीजी) / Medical Officer (PG) – 01 पद
युनानी (पीजी) (महाराष्ट्र परिषद नोंदणी) तसेच 02 वर्षे अनुभव

2) वैद्यकीय अधिकारी (युजी) / Medical Officer (UG) – 05 पदे
बीएएमएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी)

3) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 23 पदे

एम.बी.बी.एस. (महाराष्ट्र परिषद नोंदणी)

4) विशेषज्ञ / Specialist – 33 पदे
एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी / ईएनटी

5) सुपरस्पेशालिस्ट / Super Specialist – 03 पदे
डीएम – नेफ्रोलॉजी / कार्डिओलॉजी, MCH – Uro

6) दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeon – 01 पद
बीडीएस / एमडीएस (महाराष्ट्र परिषद नोंदणी) सह 02 वर्षे अनुभव

7) सुविधा व्यवस्थापक / Facility Manager – 01 पद
बी.ई./ आयटी /बी.एस्सी

8) ऑडिओलॉजिस्ट / Audiologist – 01 पद

ऑडिओलॉजी मध्ये पदवी सह 02 वर्षे अनुभव

9) फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist – 01 पद
फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी (BPT) सह 01 वर्षे अनुभव

10) डायलोसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician – 03 पदे
10+2 विज्ञान शाखा आणि डायलिसिस तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सह 01 वर्षे अनुभव

11) सामाजिक कार्यकर्ता / Social Worker – 01 पद
सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्यात तत्त्वज्ञानात मास्टर

वय मर्यादा –

  1. कार्यकर्म सहायक – 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
  2. वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ – 61 वर्षे ते 70 वर्षे (NHM Recruitment)
  3. समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, समाज कार्यकर्ता, आहारतज्ञ् – 59 ते 65 वर्षे

अर्ज फी –

जनरल/ओबीसी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]

मिळणारे वेतन – 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, NHM कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Recruitment 2023 : 10वी/12वी/ग्रॅज्युएटसाठी सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! SSC मध्ये भरतीसाठी करा APPLY

SSC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. सरकारच्या कर्मचारी निवड आयोग अंतर्गत एकूण 5369 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)

भरले जाणारे पद – निवड पोस्ट

पद संख्या – 5369 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – (SSC Recruitment 2023)

Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) 10th/12th/Graduates & above

मिळणारे वेतन –

वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) – Rs. 5,200/- to Rs. 34,800/

काही महत्वाच्या तारखा –

SSC Bharti 2023

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  6. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  7. प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
  8. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  9. अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास (SSC Recruitment 2023)
  10. अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  11. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
  12. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

निवड प्रक्रिया –

The SSC selection process includes a Computer Based Examination, which will have the following sections:

  1. Written Exam
  2. Trade/ Skill Test (SSC Recruitment 2023)
  3. Document Verification
  4. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा  – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET CELL Update : CET सेलकडून मोबाईल ॲप लाँच; घरबसल्या एका CLICK वर मिळेल सर्व माहिती

CET CELL Update

करिअरनामा ऑनलाईन । CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (CET CELL Update) अपडेट आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) लवकरच मोबाइल ॲप्लिकेशनची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सीईटी परीक्षेचा अर्ज आणि केंद्रीभूत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच या अर्जांच्या प्रवेशाबाबत अद्ययावत माहितीही या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे.

सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा काही तालुक्यांच्या स्तरावरही आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे. यंदा सीईटी सेलकडून राज्यात सुमारे 240 केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कक्षामार्फत प्रवेशपत्रे आणि गुणपत्रिकांवर प्रमाणीकरणासाठी (CET CELL Update) बार कोड आणि क्यूआर कोड छापला जाणार आहे. तसेच यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये दिली जाणार आहे.

परीक्षा केंद्रांवर मनुष्यबळ वाढवणार (CET CELL Update)

परीक्षा केंद्रांवर मनुष्यबळाच्या अभावी गैरसोयींना सामोरे जावे लागू नये, यासाठी यंदा अतिरिक्त मनुष्यबळ दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक, एक नेटवर्क तज्ज्ञ, 25 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक समवेक्षक, 100 परीक्षार्थींमागे एक सुरक्षारक्षक, तसेच (CET CELL Update) प्रत्येकी एक महिला व एक पुरुष तपासनीस, सफाई कामगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याबरोबर केंद्रावर प्रत्येक100 परीक्षार्थींमागे एक पुरुष आणि एक महिला पोलिस हवालदार केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : UPSC/MPSC मुलाखतीत विचारले जाणारे कल्पनेपलीकडील प्रश्न; उत्तरं वाचून चक्रावून जाल

GK Updates 7 Mar (1)

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न: एक भिंत बांधायला आठ माणसांना दोन दिवस लागतात, तर तीच भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल?

उत्तर: ती भिंत आधीच तयार असल्यामुळे वेळ लागणारच नाही.

प्रश्न: उन्हात न सुकणारी गोष्ट कोणती?

उत्तर: घाम

प्रश्न: संगणक आणि कॅल्क्युलेटरला हिंदीत काय म्हणतात?

उत्तर: (GK Updates) संगणकाला संगणक आणि कॅल्क्युलेटरला कॅल्क्युलेटर म्हणतात.

प्रश्‍न : अशी कोणती गोष्ट आहे जी सतत वाढत राहते?

उत्तरः माणसाचे वय

प्रश्न: कोणत्या प्राण्याला 32 मेंदू असतात?

उत्तर: जळू

प्रश्न: कोणता प्राणी 3 वर्षे झोपतो?

उत्तर: गोगलगाय (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Delhi High Court Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी दिल्ली हाय कोर्टात नोकरीचा गोल्डन चान्स!! या लिंकवर लगेच APPLY करा

Delhi High Court Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात (Delhi High Court Recruitment) असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 127 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली

पद संख्या – 127 पदे

भरली जाणारी पदे – (Delhi High Court Recruitment)

1. वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant)- 60 पदे

(आरक्षण : जनरल- 11, EWS-10, OBC NCL-23, SC-9, ST-7)

2. वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) – 67 पदे

(आरक्षण : जनरल-29, EWS-6, OBC NCL-17, SC-10, ST-5)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023

परीक्षेची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / Senior Personal Assistant –

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

2. वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant – (Delhi High Court Recruitment)

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.

वय मर्यादा –

01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 1000/- रुपये [SC/ST/PWD – 800/- रुपये]

निवड प्रक्रिया –

दिल्ली उच्च न्यायालयात वैयक्तिक आणि वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदासाठी निवड चार टप्प्यातील चाचणीनंतर केली जाईल. (Delhi High Court Recruitment)

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.delhihighcourt.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

Senior Personal Assistant – APPLY

Personal Assistant – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com