CET CELL Update : CET सेलकडून मोबाईल ॲप लाँच; घरबसल्या एका CLICK वर मिळेल सर्व माहिती

करिअरनामा ऑनलाईन । CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (CET CELL Update) अपडेट आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) लवकरच मोबाइल ॲप्लिकेशनची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या सीईटी परीक्षेचा अर्ज आणि केंद्रीभूत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच या अर्जांच्या प्रवेशाबाबत अद्ययावत माहितीही या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे.

सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा काही तालुक्यांच्या स्तरावरही आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे. यंदा सीईटी सेलकडून राज्यात सुमारे 240 केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कक्षामार्फत प्रवेशपत्रे आणि गुणपत्रिकांवर प्रमाणीकरणासाठी (CET CELL Update) बार कोड आणि क्यूआर कोड छापला जाणार आहे. तसेच यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये दिली जाणार आहे.

परीक्षा केंद्रांवर मनुष्यबळ वाढवणार (CET CELL Update)

परीक्षा केंद्रांवर मनुष्यबळाच्या अभावी गैरसोयींना सामोरे जावे लागू नये, यासाठी यंदा अतिरिक्त मनुष्यबळ दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र प्रमुख, एक सर्व्हर व्यवस्थापक, एक नेटवर्क तज्ज्ञ, 25 परीक्षार्थी उमेदवारांमागे एक समवेक्षक, 100 परीक्षार्थींमागे एक सुरक्षारक्षक, तसेच (CET CELL Update) प्रत्येकी एक महिला व एक पुरुष तपासनीस, सफाई कामगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याबरोबर केंद्रावर प्रत्येक100 परीक्षार्थींमागे एक पुरुष आणि एक महिला पोलिस हवालदार केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com