PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेने जाहीर केली 320 पदांवर भरती; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या (PMC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

भरली जाणारी पदे –

  1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 पदे
  2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 20 पदे
  3. उप संचालक – 01 पद
  4. पशुवैदयकीय अधिकारी – 02 पदे
  5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – 20 पदे
  6. कनिष्ठ अभियंता – 10 पदे (PMC Recruitment 2023)
  7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – 40 पदे
  8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – 03 पदे
  9. मिश्रक/ औषध निर्माता – 15 पदे
  10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 01 पद
  11. अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 पदे

पद संख्या – 320 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023

अर्ज फी – (PMC Recruitment 2023)

  1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
  2. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-

वय मर्यादा –

Pune Mahanagarpalika Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.
ब) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)
अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

3. उप संचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण
अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व (PMC Recruitment 2023) वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

4. पशुवैदयकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

6. कनिष्ठ अभियंता – अ) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.
अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – (१) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
२) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.

३) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. (PMC Recruitment 2023)

४) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.

अनुभव : पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

9. मिश्रक/ औषध निर्माता – अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.
ब) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)

क) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य

ड) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

10. पशुधन पर्यवेक्षक – ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.

अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

11. अग्निशामक विमोचक / फायरमन – १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. (PMC Recruitment 2023)

३) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.

४) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

मिळणारे वेतन – 

  1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) वेतन श्रेणी एस-२३ : Rs. ६७७००- २०८७०० दरमहा
  2. वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस २०: Rs. ५६१००-१७७५०० दरमहा
  3. उप संचालक वेतन श्रेणी एस – १८: Rs. ४९१००-१५५८०० दरमहा
  4. पशुवैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा
  5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा (PMC Recruitment 2023)
  6. कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणी एस-१४: Rs. ३८६०० १२२८०० दरमहा
  7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर वेतन श्रेणी एस – १३: Rs. ३५४००-११२४०० दरमहा
  8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १३: Rs.३५४००-११२४०० दरमहा
  9. मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १०: Rs.२९२०० ९२३०० दरमहा
  10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वेतन श्रेणी एस ८ : Rs. २५५००-८११०० दरमहा
  11. अग्निशामक विमोचक / फायरमन वेतन श्रेणी एस ६ : Rs. १९९००-६३२०० दरमहा

असा करा अर्ज – (PMC Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  3. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
  4. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
  5. उमेदवारांनीअर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  6. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया –

  1. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
  2. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल.
  3. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
  4. उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही. (PMC Recruitment 2023)
  5. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  6. परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

काही महत्वाच्या तारखा –

Pune Mahanagarpalika Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com