Home Blog Page 348

IAS Success Story : शेतात मजुरी केली; ब्रेड अन् भाजीपाला विकून पैसे जमवले; खानदेशच्या मातीतला तरुण बनला IAS अधिकारी

IAS Success Story of Rajesh Patil

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या (IAS Success Story) तरुणांच्या अनेक संघर्ष कथा आपण ऐकत असतो.  या कथा ऐकून आपण भारावून जातो. महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज IAS सारख्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम ठोकावा वाटतो. अशीच एक कथा आहे, महाराष्ट्रातल्या राजेश पाटील यांची.

IAS Success Story of Rajesh Patil

2005 मध्ये पास केली UPSC

IAS राजेश पाटील यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा पास केली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ओडिशामध्ये जिल्हाधिकारी पदावर धुरा सांभाळली. ओडिशामध्ये काम करताना 2008 मध्ये महानदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. या कार्याबद्दल त्यांना (IAS Success Story) अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र केडरमध्ये दाखल होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

IAS Success Story of Rajesh Patil

प्रसंगी शेतात मजुरी केली

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं शिक्षणावर खर्च करणं अशक्य होतं. अशातच पटकन नोकरी मिळवून घरातील आर्थिक जबाबदारी उचलण्याचीही गरज होती. पण, या सगळ्यावर मात करत राजेश पाटील IAS अधिकारी झाले. राजेश पाटील आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी शेतात मजुरी करायचे. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. ते म्हणतात; “IAS होणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं खूप कमी वयात काम करायला शिकलो होतो. अनेकदा भाजी आणि ब्रेड (IAS Success Story) विकून शिक्षणासाठी पैसा उभा केला. अतिशय बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबात मी जन्माला आलो; त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवून पैशाशिवाय शिक्षण थांबू नये यासाठी पडेल ते काम केले.” राजेश यांचे वडील छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करायचे. त्यातून कसाबसा कुटुंबाच खर्च निघायचा. त्यामुळे कमी वयातच त्यांनी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.

IAS Success Story of Rajesh Patil

शिक्षक आणि मित्रांनी दिली साथ (IAS Success Story)

गावात शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नव्हती. गावातील पालक कायम आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजीत असायचे. पण गावातील शिक्षक आणि मित्र राजेश यांच्या मदतीला धावून आले. सुरुवातीला त्यांचा अभ्यास कच्चा होता.  त्यांचे शिक्षक आणि मित्रांनी राजेश यांना अभ्यास करायला (IAS Success Story) प्रोत्सहन दिले. दहावी आणि त्यानंतर बारावीचं शिक्षण झालं. घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत राजेश यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

IAS Success Story of Rajesh Patil

खानदेशच्या छोट्या गावातील राजेश

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे हे छोटे खेडेगाव राजेश यांचे गाव आहे. त्यांचे कुटुंब कष्टकरी आहे. स्वतः राजेश यांनी शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शिक्षण घेतलेले आहे.आयएएस (IAS Success Story) होण्यापूर्वी त्यांची 2000 साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात निवड झाली होती. प्रचंड मेहनती राजेश यांचा UPSC परिक्षेचा प्रवास पुण्यातून सुरु झालेला आहे.

IAS Success Story of Rajesh Patil

IASच व्हायचं होतं

UPSC परीक्षा पास होण्यापूर्वी राजेश यांची स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये निवड झाली होती. पण, त्यांना IAS अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. राजेश पाटील यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे जिल्हाधिकारी (IAS Success Story) होण्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे पुस्तक खूपच लोकप्रिय झाले आहे. त्यांचे ‘मोर ओडिशा डायरी’ हे ओडिशामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाच्या अनुभवकथनाच्या पुस्तकालाही वाचकांनी चांगली पसंती दिली आहे. राजेश यांच्या व्यक्तिमत्वात जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण दिसून येते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतात सर्वात पहिल्यांदा ‘जनता कर्फ्यू’ केव्हा लावला होता? मुलाखतीत हमखास विचारले जाणारे प्रश्न वाचाच

GK Updates 11 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

1) भारतात नोट बंदी केव्हा झाली? (GK Updates)
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

2) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

3) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5 ऑगस्ट 2019

4) राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

5)(GK Updates) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

6) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

7) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश

8) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर

9) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

10) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेडराजा (जि.बुलडाणा)

11) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

12) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : मध्यप्रदेश

13) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश (GK Updates)

14) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम

15) ‘एफआयआर आपके द्वार’, ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

16) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 मध्ये केरळ येथे.

17) भारतात सर्वात पहिल्यांदा ‘जनता कर्फ्यू’ केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020

18) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020

19) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : 5 ऑगस्ट 2020

20) महात्मा गांधी यांना ‘बापू’ ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : नोकरी करतानाच अशी करा सरकारी परीक्षेची तयारी; फॉलो करा ‘या’ टिप्स

Career Tips (8)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवणे हे देशातील जवळपास (Career Tips) सर्वच तरुणांचे स्वप्न असते. मात्र वेळ किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना खासगी नोकरीकडे वळावे लागते. बरेच लोक काही काळानंतर पुन्हा सरकारी नोकरीची तयारीही सुरू करतात, पण त्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागते. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी इलाज ठरू शकते. ही बातमी वाचल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नोकरी सोडण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. वेळेचे व्यवस्थापन आणि उत्तम नियोजन तुम्हाला मदत करू शकते, चला जाणून घेऊया काही महत्वाच्या टिप्स…

योग्य नियोजन करा (Career Tips)

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि सरकारी नोकरीची तयारी करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला उत्तम नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही एकावेळी एकाच परीक्षेवर लक्ष केंद्रित केले तर तयारी चांगली होईल आणि जास्त वेळ लागणार नाही. परीक्षेपूर्वी तुमचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यावर आधारित तुम्ही तुमच्या तयारीचे योग्य नियोजन करू शकाल.

चांगले टाइम टेबल बनवा

तुम्ही विचार करत असाल यात नवीन काय आहे? याआधीही मी वेळापत्रक बनवून तयारी केली आहे, असे तुम्ही म्हणाल. पण यावेळेस काही फरक आहे हे लक्षात घ्या, आता (Career Tips) तुम्ही पूर्णवेळ नोकरी करत आहात, त्यामुळे नोकरीच्या वेळेचा विचार करून चांगले टाईम टेबल बनवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या शिफ्ट नंतर किंवा आधी 2 ते 3 तास अभ्यासासाठी वेळ द्या. तसेच तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर अभ्यासही करू शकता. याशिवाय आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी तयारीला जास्तीत जास्त वेळ देता येवू शकतो.

नेहमी अपडेट रहा

चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्र वाचने हा उत्तम पर्याय आहे. सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी विभाग खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. टीव्हीवर न्यूज चॅनल पाहण्याऐवजी (Career Tips) वर्तमानपत्र वाचता येईल. तुम्ही ट्रेन, बस किंवा कॅबने प्रवास करत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल ब्राउझरच्या मदतीने बातम्या वाचू शकता. ही सवय तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी शब्दसंग्रह सुधारण्यास देखील मदत करेल.

मॉक टेस्ट देत रहा

मॉक टेस्ट दिल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला वेळोवेळी आव्हाने घेताना पाहू शकाल आणि तुमच्या तयारीला आव्हान देण्यासही सक्षम (Career Tips) असाल,त्यामुळे तुम्ही पुढील तयारीसाठी अधिक चांगले नियोजन करू शकाल.

नेहमी सकारात्मक रहा (Career Tips)

जर तुम्ही पूर्णवेळ नोकरीसह सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला तयार करावे लागेल. त्यामुळे सकारात्मक राहा, कठोर परिश्रम करा आणि (Career Tips) आत्मविश्वास बाळगा. तुमचा अभ्यास कमी असला तरीही, विशेषतः परीक्षेपूर्वी ताण घेऊ नका. तयारीसाठी तुम्ही ऑनलाइन कोचिंगची मदत घेऊ शकता. यामुळे जी गोष्ट समजणे कठीण आहे ती बर्‍याच अंशी संपुष्टात येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : खुषखबर!! सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी राज्याच्या ‘या’ पोलीस विभागात नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, औरंगाबाद (Government Jobs) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदांच्या एकुण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, औरंगाबाद

भरले जाणारे पद –

  1. प्रशासकीय अधिकारी 01 पद
  2. उच्च श्रेणी लघुलेखक 01 पद
  3. निम्न श्रेणी लघुलेखक 01 पद
  4. वरिष्ठ श्रेणी लिपिक 01 पद
  5. लिपिक टंकलेखक 02 पदे

पद संख्या – 06 पदे

वय मर्यादा – 65 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Jobs)

मुलाखतीचा पत्ता – बैठक हॉल. पोलीस आयुक्‍त कार्यालय, औरंगाबाद शहर

मुलाखतीची तारीख – 20 मार्च 2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

  1. प्रशासकीय अधिकारी पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी
  2. उच्च श्रेणी लघुलेखक गट – ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी
  3. निम्न श्रेणी लघुलेखक गट – ब राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी
  4. वरिष्ठ श्रेणी लिपिक पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी (Government Jobs)
  5. लिपिक टंकलेखक पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवेतून राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी.

निवड प्रक्रिया – (Government Jobs)

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे. (Government Jobs)

मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर रहायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. स्वपरिचय (बायोडाटा)
  2. पासपोर्ट साइज 3 फोटो (Government Jobs)
  3. कोणतेही शासकीय ओळखपत्र
  4. सेवानिवृत्त झाल्याबाबत पीपीओची मूळ कागदपत्रे व इतर प्रमाणपत्र

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Job

अधिकृत वेबसाईट – aurangabadcitypolice.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : अवघ्या 7 महिला अन् 80 रुपयांचं कर्ज; आज करतात करोडोंची उलाढाल; ‘लिज्जत’ पापडची कशी झाली सुरुवात

Business Success Story of Lijjat Papad

करिअरनामा ऑनलाईन । पापड म्हणलं की ओठावर (Business Success Story) एकच नाव येतं ते म्हणजे ‘लिज्जत पापड’. हा ब्रॅंड आज कोटीत उलाढाल करत आहे. या व्यवसायाने सन 2019 मध्ये 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लिज्जत पापडने देशभरात 45,000 महिलांना रोजगार दिला आहे. ज्या दररोज 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाख पापड बनवतात. या व्यवसायाची सुरुवात अवघ्या 7 महिलांनी केवळ 80 रुपयांचे कर्ज घेऊन केली होती. कामाच्या पहिल्या दिवशी लिज्जतची फक्त 4 पाकिटे तयार झाली.

Business Success Story of Lijjat Papad

अशी झाली सुरुवात

ही 1959 सालची गोष्ट आहे. मुंबईतील गिरगावमध्ये राहणाऱ्या सात गुजराती गृहिणींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारंददास कुंडलिया, बानुबेन एन तन्ना, लागुबेन अमृतलाल गोकाणी, जयबेन व्ही विठ्ठलानी आणि दिवाळीबेन लुक्का (Business Success Story) यांनी छगनलाल करमसी पारेख नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून त्यांच्या व्यवसायासाठी 80 रुपये उसने घेतले.

या अर्धसाक्षर महिलांनी आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्याचा फायदा घेत पापड बनवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत जसवंतीबेन म्हणतात; “आम्ही कमी शिकलेल्या होतो, त्यामुळे आम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाली होती. एकेदिवशी आमच्या असं लक्षात आलं की जर पापड बनवण्याच्या आमच्या कौशल्याचा उपयोग आम्ही व्यवसायात केला तर आम्ही आमच्या पतीवर येणाऱ्या आर्थिक जबाबदारीचं ओझं कमी करू शकतो.”

Business Success Story of Lijjat Papad

असं मिळालं ‘लिज्जत’ नाव (Business Success Story)

15 मार्च 1959 रोजी सातही महिला मुंबईतील गजबजलेल्या भागात एका जुन्या इमारतीच्या टेरेसवर जमल्या आणि त्यांनी पापडाची चार पाकिटे तयार केली. एका वर्षात त्यांनी 6,000 रुपयांहून अधिक किमतीचे पापड विकले. 1962 मध्ये रोख पारितोषिक स्पर्धेत निवड झाल्यानंतर या ब्रँडला ‘लिज्जत’ हे नाव मिळाले.

देशभरात 82 शाखा

या व्यवसायात हळूहळू महिलांची संख्या शेकडो ते हजारो पर्यंत वाढली. 2021 पर्यंत, लिज्जतसोबत काम करणाऱ्या महिलांची संख्या 45,000 पेक्षा जास्त होती. सध्या (Business Success Story) लिज्जतच्या देशभरात 82 शाखा आहेत. लिज्जतची उत्पादने अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांमध्येही विकली जातात. आता लिज्जत कंपनी पापडा व्यतिरिक्त खाकरा, बेकरी उत्पादने आणि अनेक प्रकारचे मसाले देखील बनवते.

Business Success Story of Lijjat Papad

महिलांच्या हाती सगळी धुरा

लिज्जत पापड उद्यमची प्रत्येक महिला सदस्य तिच्या पापड बनवण्याच्या क्षमतेनुसार आणि संस्थेतील स्थानानुसार कमाई करते. इथल्या काही स्त्रिया त्यांच्या पतीपेक्षा (Business Success Story) जास्त कमावतात. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती रवींद्र पराडकर यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की; “आमच्या काही स्त्रिया त्यांच्या पतीपेक्षा जास्त कमावतात. आणि त्यासाठी त्याचे कुटुंबीय त्यांचा आदर करतात.”

लिज्जतमध्ये फक्त ड्रायव्हर, दुकान सहाय्यक आणि मदतनीस म्हणून पुरुषांची भरती केली जाते. कंपनीची रचना अशी आहे की पापड लाटणाऱ्या महिलांचे स्थान वाढतच जाते. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती रवींद्र पराडकर या स्वतः दुसऱ्या पिढीच्या सह-मालक आहेत. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी आईसोबत पापड बनवायला सुरुवात केली.

Business Success Story of Lijjat Papad

कंपनी पद्मश्रीने सन्मानित

नोव्हेंबर 2021 मध्ये, लिज्जत पापड एंटरप्रायझेसच्या सह-संस्थापक, 90 वर्षीय जसवंतीबेन जमनादास पोपट यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या (Business Success Story) प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2005 साली देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लिज्जतला ‘ब्रँड इक्विटी’ पुरस्काराने सन्मानित केले. 2003 मध्ये लिज्जतला देशातील सर्वोत्कृष्ट कुटीर उद्योग पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये, कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सने बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.

Business Success Story of Lijjat Papad

लिज्जतवर चित्रपट बनणार (Business Success Story)

लिज्जतची कथा ही स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाची कथा आहे. चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर ही कथा मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. या चित्रपटात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaGenco Recruitment : शिक्षण फक्त 8 वी पास आणि MahaGencoमध्ये मिळेल जॉब; या लिंकवर करा Apply

MahaGenco Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 8 वी पास असाल आणि सरकारी (MahaGenco Recruitment) नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड

पद संख्या – 4 पदे

पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaGenco Recruitment)

1) वायरमन / Wireman – 02 पदे
उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

2) वेल्डर / Welder (Gas And Electric) – 02 पदे
उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी – फी नाही (MahaGenco Recruitment)

मिळणारे वेतन – 5,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (MahaGenco Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

वायरमन – APPLY

वेल्डर – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी-आशा सेविकांना अच्छे दिन!! तुमच्या मानधनात होणार ‘इतकी’ वाढ

Maharashtra Budget 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Maharashtra Budget 2023) आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांना मोठा दिलासा देत त्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली आहे. तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एकूण 20 हजार पदे भरणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

सध्या राज्यातील आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे 3 हजार 5000 रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे 4 हजार 700 रुपये एवढे आहे. या मानधनात 1500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच अंगणवाडी सेविकांचं (Maharashtra Budget 2023) मानधन हे 8 हजार 325 वरून 10 हजार रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 वरून 7 हजार 200 रुपये करण्यात येत आहे. याशिवाय अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे 4425 वरून 5500 रुपये करण्यात आले आहे, अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.

महिलांसाठी फडणवीस यांच्या घोषणा – (Maharashtra Budget 2023)

  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार.
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार.
  • महिलांना एसटी प्रवास करताना तिकीटात सरसकट 50 टक्के सवलत
  • चौथे सर्व समावेशक महिला धोरण जाहीर करणार (Maharashtra Budget 2023)
  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये देणार
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये देणार

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची ‘लेक लाडकी’ योजना; मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख

Maharashtra Budget 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचा अर्थ संकल्प सादर करताना अर्थमंत्री (Maharashtra Budget 2023) देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये रोख मिळणार आहेत. ‘लेक लाडकी’ या नावानं ही योजना फडणवीस यांनी जाहिर केली आहे.

काय आहे ‘लेक लाडकी’ योजना?

यावेळी फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक (Maharashtra Budget 2023) कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, सहावीत 6,000 रुपये, अकरावीत 11,000 रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.

महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास (Maharashtra Budget 2023)

राज्यातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी (Maharashtra Budget 2023) करताना 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15  वर्षांपर्यंत महिलेला पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. ही अट शिथील करुन इतर सवलती देण्यात येणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Urdu Shikshak Bharti 2023 : राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त

Urdu Shikshak Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात उर्दू शिक्षकांची भरती (Urdu Shikshak Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. सध्या राज्यात उर्दू प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 12 पदे रिक्त असून ही उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले (Urdu Shikshak Bharti 2023) आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

यासाठी राज्यात प्रस्तावित 30 हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक (Urdu Shikshak Bharti 2023) समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे रिक्त असल्याने दोन-तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Lok Sabha Secretariat Recruitment : भारतीय संसदेत नोकरीचा गोल्डन चान्स!! ग्रॅज्युएट्स उमेदवार करु शकतात अर्ज

Lok Sabha Secretariat Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । देशातील होतकरू तरुणांसाठी (Lok Sabha Secretariat Recruitment) संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसदीय दुभाषी पदाच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे.

संस्था – संसद, भारत सरकार

पद संख्या – 13 पदे

भरले जाणारे पद – दुभाषी

  • इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी –  8 पदे
  • डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यासाठी – 5 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Lok Sabha Secretariat Recruitment)

1. इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –

मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.

2. प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी –

संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

जास्तीत जास्त 35 वर्षे

निवड प्रक्रिया –

  1. Oration Test (Lok Sabha Secretariat Recruitment)
  2. Written Test
  3. Simultaneous Interpretation Test
  4. Personal Interview
  5. Document Verification

आरक्षण तपशील –

Lok Sabha Secretariat Bharti 2023

असा करा अर्ज –

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी या पदासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केली आहे याची खात्री करण्यासाठी या जाहिरातीतून बारकाईने जा. (Lok Sabha Secretariat Recruitment)
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

मिळणारे वेतन –

संसदीय दुभाषी Level 10 – Rs. 56,100/- ते 1,77,500/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (Lok Sabha Secretariat Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://pvp.nic.in/Interpreter/

अधिकृत वेबसाईट – https://loksabha.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com