IAS Success Story : शेतात मजुरी केली; ब्रेड अन् भाजीपाला विकून पैसे जमवले; खानदेशच्या मातीतला तरुण बनला IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या (IAS Success Story) तरुणांच्या अनेक संघर्ष कथा आपण ऐकत असतो.  या कथा ऐकून आपण भारावून जातो. महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज IAS सारख्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम ठोकावा वाटतो. अशीच एक कथा आहे, महाराष्ट्रातल्या राजेश पाटील यांची.

IAS Success Story of Rajesh Patil

2005 मध्ये पास केली UPSC

IAS राजेश पाटील यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा पास केली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ओडिशामध्ये जिल्हाधिकारी पदावर धुरा सांभाळली. ओडिशामध्ये काम करताना 2008 मध्ये महानदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. या कार्याबद्दल त्यांना (IAS Success Story) अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र केडरमध्ये दाखल होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

IAS Success Story of Rajesh Patil

प्रसंगी शेतात मजुरी केली

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं शिक्षणावर खर्च करणं अशक्य होतं. अशातच पटकन नोकरी मिळवून घरातील आर्थिक जबाबदारी उचलण्याचीही गरज होती. पण, या सगळ्यावर मात करत राजेश पाटील IAS अधिकारी झाले. राजेश पाटील आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी शेतात मजुरी करायचे. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. ते म्हणतात; “IAS होणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं खूप कमी वयात काम करायला शिकलो होतो. अनेकदा भाजी आणि ब्रेड (IAS Success Story) विकून शिक्षणासाठी पैसा उभा केला. अतिशय बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबात मी जन्माला आलो; त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवून पैशाशिवाय शिक्षण थांबू नये यासाठी पडेल ते काम केले.” राजेश यांचे वडील छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करायचे. त्यातून कसाबसा कुटुंबाच खर्च निघायचा. त्यामुळे कमी वयातच त्यांनी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.

IAS Success Story of Rajesh Patil

शिक्षक आणि मित्रांनी दिली साथ (IAS Success Story)

हे पण वाचा -
1 of 56

गावात शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नव्हती. गावातील पालक कायम आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजीत असायचे. पण गावातील शिक्षक आणि मित्र राजेश यांच्या मदतीला धावून आले. सुरुवातीला त्यांचा अभ्यास कच्चा होता.  त्यांचे शिक्षक आणि मित्रांनी राजेश यांना अभ्यास करायला (IAS Success Story) प्रोत्सहन दिले. दहावी आणि त्यानंतर बारावीचं शिक्षण झालं. घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत राजेश यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

IAS Success Story of Rajesh Patil

खानदेशच्या छोट्या गावातील राजेश

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे हे छोटे खेडेगाव राजेश यांचे गाव आहे. त्यांचे कुटुंब कष्टकरी आहे. स्वतः राजेश यांनी शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शिक्षण घेतलेले आहे.आयएएस (IAS Success Story) होण्यापूर्वी त्यांची 2000 साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात निवड झाली होती. प्रचंड मेहनती राजेश यांचा UPSC परिक्षेचा प्रवास पुण्यातून सुरु झालेला आहे.

IAS Success Story of Rajesh Patil

IASच व्हायचं होतं

UPSC परीक्षा पास होण्यापूर्वी राजेश यांची स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये निवड झाली होती. पण, त्यांना IAS अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. राजेश पाटील यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे जिल्हाधिकारी (IAS Success Story) होण्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे पुस्तक खूपच लोकप्रिय झाले आहे. त्यांचे ‘मोर ओडिशा डायरी’ हे ओडिशामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाच्या अनुभवकथनाच्या पुस्तकालाही वाचकांनी चांगली पसंती दिली आहे. राजेश यांच्या व्यक्तिमत्वात जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण दिसून येते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com