Home Blog Page 347

Career Tips : कसं व्हायचं CBI मध्ये अधिकारी? जाणून घ्या पात्रता, परीक्षा अन् पगराविषयी संपूर्ण माहिती

Career Tips (9)

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या मोठमोठ्या (Career Tips) घटनांमुळे CBI म्हणजेच ‘सेंट्रल इन्वेस्टीगेशन ब्युरो’ ही संस्था चांगलीच चर्चेत राहिली आहे. CBI चे अधिकारी कसे मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि कारवाई करतात याबद्दल तरुणाईच्या मनात बरंच आकर्षण पहायला मिळतं. दिल्लीच्या मंत्र्यांच्या घरी छापे पडल्यानंतर CBI ची काम करण्याची पद्धत सामान्य लोकांना समजू लागली आहे. म्हणूनच आपणही एक CBI ऑफिसर व्हावं अशी इच्छा बऱ्याच तरुणांच्या मनात आहे. पण नक्की यासाठी काय शिक्षण असणं गरजेचं आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला CBI मध्ये नोकरी कशी मिळवावी याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Career Tips (9)

CBI अधिकारी काय करतात? (Career Tips)

देशातील आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा समावेश असलेल्या मोठ्या गुन्ह्यांचा तपास सीबीआय अधिकारी करतात. त्यांच्या ऑपरेशनच्या तीन मुख्य क्षेत्रांशी संबंधित गुन्हेगारी गुप्तचर माहिती गोळा करण्यात देखील ते सामील असतात. भ्रष्टाचारविरोधी, आर्थिक गुन्हे आणि विशिष्ट गुन्हेही CBI अधिकारी हाताळतात.

CBI अधिकारी होण्यासाठी आवश्यक पात्रता

  1. तुमच्याकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रकारची किमान 50% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
  2. तुमचे वय 20-30 वर्षांच्या दरम्यान असावे.
  3. तुम्हाला येथे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. (Career Tips)
  4. तुम्हाला UPSC किंवा SSC सारखी प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागेल.
  5. तसेच तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे.
  6. CBI ने वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे भौतिक मापदंड निश्चित केले आहेत.

 

Career Tips (9)

निवड प्रक्रिया –

भारतात सीबीआय अधिकारी होण्याचे तीन मार्ग आहेत.

1. पहिला मार्ग म्हणजे एसएससी-सीजीएल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि दुसरी यूपीएससीद्वारे. सीबीआयमध्ये गट क ते उपनिरीक्षकापर्यंत सर्व खालच्या विभागातील भरती SSC द्वारे केली जाते. त्यानंतरच्या प्रमोशनद्वारे एसएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही सीबीआयमध्ये एसपी होऊ शकता.

2. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही UPSC प्रवेश परीक्षा चांगल्या रँकसह उत्तीर्ण केली तर तुम्ही IPS अधिकारी होऊ शकता. नंतर, तुम्ही सीबीआयमध्ये बदली करुन गहेवू शकता. येथे तुमची SSC-CGL च्या विपरीत थेट अधिकारी स्तरावर नियुक्ती केली जाते. (Career Tips)

3. तिसरा मार्ग UPSC द्वारे देखील गाठता येतो. येथे तुम्हाला UPSC द्वारे उपअधीक्षक (DSP) पदासाठी घेतलेल्या परीक्षेला बसावे लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही थेट A ग्रेड CBI अधिकारी होऊ शकता.

Career Tips (9)

इतका मिळतो पगार (पदानुसार) –

  1. क्राइम असिस्टेंट पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4200/-
  2. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर पीबी-3 रु.15600-39100/- ग्रेड पे-6600/-
  3. ऑफिस सुपरिटेंडेंट पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4600/-
  4. स्टेनो ग्रेड ‘A’ / Sr. PS पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4800/- (Career Tips)
  5. स्टेनो ‘B’/प्राइवेट सेक्रेटरी पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4600/-
  6. पर्सनल असिस्टेंट पीबी-2 रु.9300-34800/-ग्रेड पे-4200/-
  7. स्टेनो ग्रेड डी / सीनियर क्लर्क स्टेनो पीबी-1 रु.5200-20200/-ग्रेड पे-2400/-
  8. जूनियर अकाउंट्स ऑफिसर पीबी-2 रु.9300-34800/-ग्रेड पे-4200/-

सीबीआयमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी असल्याने, त्यांच्या श्रेणींमध्ये फरक आहे, अशा परिस्थितीत सर्वांचे पगार सारखे नसून वेगळे असतात. सुरुवातीच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर, सीबीआय (Career Tips) अधिकाऱ्याचे सरासरी मासिक वेतन 40,000 रुपये आहे आणि त्याशिवाय इतर अनेक भत्तेही मिळतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली? ‘हे’ प्रश्न मुलाखतीत विचारले जावू शकतात

GK Updates 12 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1930 मध्ये बॉलीवूडची स्थापना झाली, यानंतर 1934 मध्ये हिमांशू राय यांनी सुरू केलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये (Bombay Talkies) भारतीय सिनेमाच्या विकासाला वेग आला.

प्रश्न : सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो अन् कुठे मावळतो ?
उत्तर : नॉर्वेला (Norway) मावळत्या सूर्याचा देश म्हणतात कारण, तिथे सूर्य सर्वात आधी नॉर्वेत मावळतो. तर सर्वात आधी सूर्य उगवतो तो देश म्हणजे जपान होय. (GK Updates)

प्रश्न : IQ चा फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे ?
उत्तर : IQ चे फुल फॉर्म म्हणजे Intelligence Quotient.(IQ) ही बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रमाणित टेस्टिंगमधून काढलेली गणना आहे. ‘IQ’ हा शब्द जर्मन शब्द Intelligenz-Quotient पासून आला आहे, 1912 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस आधुनिक मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पद्धतींसाठी प्रथम वापरला. परंतु आजही ‘IQ’ हा शब्द अजूनही जगभरात सगळीकडे वापरला जातो.

प्रश्न : एक लीटरमध्ये हेलिकॉप्टर नेमकं किती मायलेज देतं? (GK Updates)
उत्तर : हेलिकॉप्टर एका तासात 50 लिटर ते 60 लिटर इंधन वापरते. आणि एक मैल उडण्यासाठी 1 गॅलन इंधन लागतं. त्याची सरासरी काढण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 180 किलोमीटर मानला, तर हेलिकॉप्टर 1 लिटर इंधनात 3 ते ४ किलोमीटर उडू शकतं.

प्रश्न : भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी आढळला ?
उत्तर : 30 जानेवारी 2020 (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment : महावितरण सोलापूर अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 10 वी /ITI पास करु शकतात अर्ज

Mahavitaran Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment) लिमिटेड, सोलापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे 10 वी पास आणि ITI प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर

भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment)

शिकाऊ उमेदवार 10th + ITI in relevant field

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
  3. Online Apprenticeship Registration केल्यानंतर सोलापुर मंडलांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयांना Online Apprenticeship Application करावेत.
  4. Online Application करताना Candidate Type मध्ये ITI Passed असे select करण्यात यावे, ITI Passed व्यतिरिक्त इतर Select केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. (Mahavitaran Recruitment)
  5. Online Application करताना वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका, एस.एस.सी उत्तीर्ण प्रमाणपत्र, एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (अ.जा.(SC), अ.ज. (ST) व इ.मा.व. (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांकरीता) या सर्व कागदपत्रे Upload करावेत.
  6. चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  7. जानेवरी-२०२० मार्च २०२३ या कालावधीमध्ये वीजतंत्री/ तारतंत्री या शाखेतून आय. टी. आय. उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांचे Online Application स्विकारले जातील.
  8. शिकाऊ उमेदवारांना Online Application करण्याचे (Mahavitaran Recruitment) अंतिम मुदत ३०.०४.२०२३ पर्यंत राहील, Online Application व वरील सर्व कागद पत्रांच्या छायांकित प्रतीसह लेखी स्वरुपात अर्ज स्वीकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 10 वी पास/ITI साठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात मेगाभरती सुरु

Government Jobs (23)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण (Government Jobs) झालेल्या उमेदवरांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात (Directorate of Vocational Education and Training) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2023 आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

संस्था – व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training)

एकूण पद संख्या – 772 पदे

भरतीचा तपशील – (Government Jobs)

1. निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम

शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा ITI
(ii) 02 वर्षे अनुभव

पद संख्या – 316 पदे

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in

2) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI, 05 वर्षे अनुभव

पद संख्या – 46 पदे

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Government Jobs)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in

3) वसतीगृह अधीक्षक

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण , शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव

पद संख्या – 30 पदे

वय मर्यादा – 23 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ – www.dvet.gov.in

4) वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता – (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

पद संख्या – 270 पदे

वय मर्यादा – 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (Government Jobs)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; पहा कोण करू शकतं अर्ज

Job Alert (19)

करिअरनामा ऑनलाईन । अमरावती महानगरपालिकेत विवध रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

संस्था – अमरावती महानगरपालिका, अमरावती

पद संख्या – 7 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1) फिजिशियन (औषध) / Physician (Medicine) – 01 पद

एमडी औषध / डीएनबी

2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ / Obstetrician & Gynecologists – 01 पद

एमडी / एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी

3) बालरोगतज्ञ / Pediatrician – 01 पद

एमडी Pead / डीसीएच / डीएनबी

4) नेत्ररोग तज्ज्ञ / Ophthalmologist – 01 पद

एमएस नेत्ररोग तज्ज्ञ / DOMS

5) त्वचारोगतज्ज्ञ / Dermatologist – 01 पद

एमडी (Skin / VD) DVD, डीएनबी

6) मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist – 01 पद

एमएस मानसोपचारतज्ज्ञ / DPM / डीएनबी (Job Alert)

7) ईएनटी विशेषज्ञ / ENT Specialist – 01 पद

एमएस ENT / DORL / डीएनबी

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँक दुसरा माळा, राज कमल चौक अमरावती, 444601.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – amtcorp.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Job Vacancy : रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा Apply

Teachers Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ (Teachers Job Vacancy) ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, संगणक शिक्षक, संगीत शिक्षक या पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे

भरली जाणारी पदे –

  1. पर्यवेक्षक 03 पदे
  2. पूर्व प्राथमिक शिक्षक 10 पदे
  3. शिक्षक 56 पदे (Teachers Job Vacancy)
  4. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक 03 पदे
  5. कला आणि हस्तकला शिक्षक 03 पदे
  6. संगणक शिक्षक 03 पदे
  7. संगीत शिक्षक 02 पदे

पद संख्या – 80 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज फी – Rs.100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्यसाठी E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. पर्यवेक्षक – B.A.B.Ed./B.Com.B.Ed. / B.Sc.B.Ed. / M.A.B.Ed./M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed. (5 Years experience in school)

2. पूर्व प्राथमिक शिक्षक – H.S.C./B.A/B.Sc/B.COM and Montessori / E.C.C.Ed./P.T.C.

3. शिक्षक – D.Ed./B.A.B.Ed. / B.Com.B.Ed./B.Sc.B.Ed./B.Sc. B.Ed. / M.A.B.Ed./ M.Sc.B.Ed/ M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed.

4. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक – B.A.B.P.Ed/B.SC.B.P.Ed / B.Com.B.P.Ed

5. कला आणि हस्तकला शिक्षक – A.T.D./BFA/G.D./AM (Teachers Job Vacancy)

6. संगणक शिक्षक – B.Sc. (IT/CS)/M.Sc. (IT/CS)/ BCA/MCA/B.Eng

7. संगीत शिक्षक – B.A./M.A., Sangeet Visharad

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. उत्कृष्ट विषयाचे ज्ञान असलेले उमेदवार आणि D.Ed./B.Ed. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. (Teachers Job Vacancy)
  4. अर्ज शाळेच्या कार्यालयातून 11/03/2023 ते 21/03/2023 वेळ सकाळी 10.00 वाजेपर्यंत घ्यायचे आहेत.
  5. तुमचा C.V., रीतसर भरलेला अर्ज आणि तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत आणि कव्हर लेटर कार्यालयात सबमिट करण्याचा शेवटचा दिवस 27/03/2023 वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 सुट्टीचे दिवस वगळून आहे.
  6. जे उमेदवार [email protected] वर ई-मेल द्वारे अर्ज पाठवत आहेत त्यांनी दिलेल्या तारखांसह अर्ज/ फी जमा करावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Teachers Job Vacancy)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Update 2023 : शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल; MPSCकडून मोठा दिलासा! परिपत्रक केलं जारी

MPSC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (MPSC Update 2023) बातमी आहे. आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. 3 मार्च रोजी राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

विविध कारणामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा (MPSC Update 2023) उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी 2 मार्च 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष राज्यात सरकारी नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थांना आता अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने 2 मार्च 2023 रोजी याबाबतचा निर्णय घेतला आहे. सामान्य (MPSC Update 2023) प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी करून वयाची मर्यादा शिथिल केल्याचे जाहीर केले आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून विविध पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींना विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.

कोणत्या पदांसाठी मिळणार वयोमर्यादेमध्ये शिथिलता – (MPSC Update 2023)

  1. उपअभियंता, विद्युत , गट अ
  2. उपसंचालक, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
  3. मुख्य खोदन अभियंता, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
  4. सहाय्यक रसायनी, गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
  5. सहाय्यक प्रशासन अधिकारी,गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास योजना
  6. सहाय्यक आयुक्त, तांत्रिक, महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब
  7. सहाय्यक संचालक, राज्य रेशीम सेवा गट अ (MPSC Update 2023)
  8. रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा, श्रेणी एक, गट ब
  9. सहाय्यक संचालक, गट ब सांस्कृतिक कार्य संचालनालय
  10. महाराष्ट्र राज्यपत्रीत नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

या सर्व जाहिरातीमध्ये अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यास अंतिम दिनांक 3 एप्रिल 2023 पर्यंत असेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Update 2023 : प्राध्यापक होण्यासाठी आता PhDची सक्ती नाही; काय आहे UGC चा नवा नियम?

UGC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC Update 2023) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवरील भरतीसाठी PHD अनिवार्य नसेल. प्राध्यापक होण्यासाठी आता यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) मधील पात्रता पुरेशी असणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा (UGC Update 2023)

देशातील विद्यापीठांमध्ये अध्यापन करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. याआधी विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी पीएचडी पदवी अनिवार्य होती. पण आता नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

उस्मानिया विद्यापीठ (OU) कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन यूजीसी अध्यक्षांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल’ विकसित केले जात आहे, ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील (UGC Update 2023) असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक पद्धतीतील शिक्षणासोबतच नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी!! CDAC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; लगेच करा Apply

CDAC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र, (CDAC Recruitment 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक, परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई (Centre for Development of Advanced Computing)

भरले जाणारे पद –

  1. सहाय्यक – 1 पद
  2. परिचर – 1 पद
  3. कनिष्ठ सहाय्यक – 3 पदे
  4. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 2 पदे
  5. तांत्रिक सहाय्यक – 2 पदे

पद संख्या – 09 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज फी – रु. 500/-

वय मर्यादा – (CDAC Recruitment 2023)

  1. सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक – 35 वर्षे
  2. परिचर, कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. सहाय्यक – a. Graduate in any discipline
b. Minimum six month’s certificate course in computers.

c. 7 years of working experience in relevant field or 5 years for a post graduate.

2. परिचर a. Graduation in Commerce/ Arts / Science.
b. Knowledge of computer operation.

3. कनिष्ठ सहाय्यक a. Graduation in Commerce/ Arts / Science
b. Six months certificate course in computer operations (CDAC Recruitment 2023)

c. 3 years of working experience in relevant field for Graduate and 1 year experience for a Post Graduate.

4. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक a. First Class Diploma in Engineering/Computer applications OR
b. First class degree in Computer Science/ Electronics/ IT/Computer applications or relevant domain OR

c. Graduate with first class and DOEACC ‘B’ Level.

5. तांत्रिक सहाय्यक a. First Class Diploma in Engineering/Computer applications OR
b. First class degree in Computer Science/ Electronics/ IT/Computer applications or relevant domain OR

c. Trade certificate with NCVT where basic qualification for admission to the Course in Matriculation or equivalent OR

d. First class Graduate and DOEACC ‘A’ Level. (CDAC Recruitment 2023)

मिळणारे वेतन –

1. सहाय्यक Starting basic salary of Level 5 as per Pay Matrix i.e. Rs 29200/- plus allowances as applicable to the Central Government employees stationed in Mumbai.
2. परिचर Starting basic pay of Level 2 as per Pay Matrix i.e. Rs 19900/- plus allowances as applicable to the Central Government employees stationed in Mumbai.
3. कनिष्ठ सहाय्यक Starting basic salary of Level 4 as per Pay Matrix .e. Rs 25500/- plus allowances as applicable to the Central Government employees stationed in Mumbai. (CDAC Recruitment 2023)
4. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Starting basic pay of Level 7 of Pay matrix i.e. Rs 44900/- plus allowances as applicable to the Central Government employees stationed in Mumbai.
5. तांत्रिक सहाय्यक Starting basic salary of Level 6 as per Pay Matrix Rs 35400/- plus allowances as applicable to the Central Government employees stationed in Mumbai.

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. C-DAC कडे हार्ड कॉपी/प्रिंट केलेले अर्ज पाठवू नयेत.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (CDAC Recruitment 2023)
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांवर भरती; महिन्याचा 45 हजार पगार 

Job Alert (18)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तक्रार निवारण प्राधिकारी पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

भरले जाणारे पद – तक्रार निवारण प्राधिकारी / Ombudsman

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव असावा.
3. उमेदवार नाशिक जिल्हातील रहिवाशी असावा.
4. उमेदवार राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तसेच (Job Alert) कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र.
5. शारीरिकदृष्टया सुदृढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023

वय मर्यादा – 14 मार्च 2023 रोजी 66 वर्षापर्यंत.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 45,000/- रुपये दरमहा (Job Alert)

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Collector (Rohyo), Nashik.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com