Oxford Education : रयतमध्ये शिकता येणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम; शरद पवार यांची माहिती

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम (Oxford Education) या आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. “ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल;” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अॅड. रवींद्र पवार, डॉ. भगीरथ शिंदे, प्रभाकर देशमुख, (Oxford Education) राजेंद्र फाळके, सुभाष शिंदे, एम. बी. शेख, संजीव पाटील, राजकुमार पाटील, प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, आपल्याला आता काळाची पावले ओळखून बदल केले पाहिजेत. कारण रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार (Oxford Education) केला आहे. आता शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह त्याच्या विस्ताराकडे रयतने विशेष लक्ष दिल्याने जागतिक पातळीवरही रयतची मोहर उमटली जाणार आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. धान्य पैसा रयतेच्या नावाने उभा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यास हातभार लागला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com