HSC Exam 2023 : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!! मुलाला कॉपी पुरवण्यासाठी पालकच सरसावले; शिक्षकासोबत खडाजंगी (Video)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र 12 वीच्या परीक्षा सुरु (HSC Exam 2023) असून परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापलं गेलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत 12 वी ची परीक्षा सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला. कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला आहे. मुलांना कॉपी देण्यासाठी परीक्षा गृहात सोडत नसल्याने हा वाद झाला. तसेच ‘इतर पालकांना सोडलं (HSC Exam 2023) मग आम्हाला का नाही,’ असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर उघडपणे कॉपी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी मोठ्या उमेदीने सामोरे जात होते. पण इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुका त्यानंतर गणिताचा पेपर फुटणे यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आघात झाला आहे. फुटलेला पेपर परत होईल का? याबाबत शिक्षण (HSC Exam 2023) विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी मोठ्या संख्येत बारावीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ती प्रतारणा होत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा (HSC Exam 2023)

बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून मोठा (HSC Exam 2023) गाजावाजा करण्यात आला होता. यंदा बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून राबवल्या जातील अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेत त्रुटी राहिल्याने यंदाची 12वीची परीक्षा कॉपीमुक्त होण्याऐवजी कॉपीयुक्त होत असल्याचं चित्र सर्रास दिसत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com